अर्थव्यवस्थेची ओळख

अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि व्याख्या :
1) लोकांच्या विविथ गरजा भागवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उत्पादक उपक्रमांचे एकत्रीकरण.
2) लोकांना रोजगार व उत्पन्नाची साधने पुरवणारी व्यवस्था.
3) वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करणारे संघटन.
व्याख्या :
 • विशिष्ट भुप्रदेशातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादनवितरण आणि पुरवठा यांच्याशी संबधित उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था’ होय.
 • ऑक्सफर्डच्या मते अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट देश/प्रदेशातील उत्पादनव्यापारवित्तपुरवठा यातील आंतरसंबंध.
अर्थव्यवस्थेचे प्रकार :
उत्पादन साधनांचे स्वामित्व व व्यवस्थापन यांच्या आथारे अर्थव्यवस्येचे प्रमुख प्रकार खालील प्रमाणे.
 • भांडवलशाही अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साथनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा अर्थव्यवस्थेतील उत्पादकाचा मुख्य हेतू असतो. उदा. अमेरिकन संघराज्ये
 • समाजवादी अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्येत उत्पादनाचे घटक एकत्रित रित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन सरकारकडून केले जाते समाजाचे हित साथावे हा मुख्य हेतू असतो उदा. चीन.
 • मिश्र अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्थेत सार्वजानिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रांचे सह- आस्तित्व असते. उदा भारत.
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्टये :
 • भौगोलिक क्षेत्र – प्रत्येक अर्थव्यवरयेचे सुनिश्चित क्षेत्र व सीमा असतात भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ ३२८७२६३ चौ. किमी आहे प्रथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापेकी २.८ टक्के भूक्षेत्र भारताच्या ताब्यात आहे.
 • भारतात २९ राज्ये व ७ केंद्रशसित प्रदेश आहेत
नैसार्गिक साधन सामग्री :
 • निसर्गाकडून विनामूल्य उपलब्ध झालेल्या भूमीपाणीजंगलेखनिज साठे यांचा समावेश नैसर्गिक साधन सामग्रीत करण्यात येतो.
 • अर्थव्यवस्थेची उत्पादन पातळी साधन सामग्रीची उपलब्धता आणि वापर यावर अवलंबून असेत.
लोकसंख्या :
 • देशातील लोकसंखेच्या आकारमानावर श्रमपुरवठा अवलंबून असतो.
 • लोकसंख्येची गुणवत्ता शिक्षण प्रशिक्षण आणि आरोग्यसेवा यांच्याव्दारा सुधारता येते.
 • पर्याप्त लोकसंख्या आदर्श आकारमान दर्शवते
 • पर्याप्तपेक्षा अधिक लोकसंख्या म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या होय त्यामुळे साधन संपत्तीवरील ताण वाढतो.
 • पर्याप्त लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या म्हणजे न्यून लोकसंख्या होय. यामुळे उपलब्ध साधन संपलीचा पर्याप्त वापर होत नाही.
सार्वभौमत्व :
 • सार्वभौमत्व म्हणजे राज्यातील सर्वोच्च सत्ता किंवा अधिकार होय.
 • सरकारने कायदे करणे व त्यांची कार्यवाही करणे यासाठी सार्वभौम अधिकार आवश्यक असतात.
 • स्वंतत्र आणि सार्वभौम राष्ट्रच देशाच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासंबंधीचे निर्णय घेऊ शकते.
क्षेत्रीय विभाजन :
उत्पादक उपक्रमांचे तीन क्षेत्रात वर्गीकरण केले आहे

 • प्राथमिक क्षेत्र:- याला कृर्षा क्षेत्र असेही म्हणतात नैरार्गिक साधन सामग्रीवर आधारीत व्यवसायांचा यात समावेश होतो.उदा. शेती आणि पशूपालन कुक्कुट पालनमत्स्यव्यवसायजंगल व्यवसाय व खाणकाम भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत निम्यापेक्षा अधिक लोकसंख्या प्राथमिक क्षेत्राशी संलग्न आहे.
 • द्वितीय क्षेत्र:- याला औदयोगिक क्षेत्र असेही म्हणतात – यात कारखात दारीबांधकामवीजनै वायू पाणी पुरवठा इ व्यवसायांचा समावेश होतो.
 • तृतीय क्षेत्र:- याला सेवा क्षेत्र असेही म्हणतात यात वाहतूकदळणवळणबँकाविमाव्यवसायव्यापारवित्त आरोग्यशिक्षणउपहार गृहमनोरंजन यासारख्या सेवांचा समावेश होतो.
 • भारतात सध्या राष्ट्रीय उत्पादनातील व्दितीय व तृ तीय क्षेत्राचे योगदान वाढत आहे. भारताच्या आर्थिक विकासात वाढ होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here