(चालू घडामोडी) Current Affairs | 20 January 2020

परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात रिझर्व्ह बँक सहाव्या क्रमांकावर

 • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) इतर देशांच्या प्रमुख केंद्रीय बँकांच्या तुलनेत परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात सहावा सर्व मोठा खरेदीदार ठरला आहे. RBIने भारत सरकारच्या ‘सार्वभौम सुवर्ण बाँड’साठी 2019 या वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांमध्ये 25.2 टन खरेदी केले होते त्यामुळे RBI सहाव्या क्रमांकाचा खरेदीदार झाला.
 • जागतिक सुवर्ण परिषद (WGC) यांच्या अहवालानुसार,
 • RBI कडे 625.2 टन सुवर्ण (सोने) आहे आणि ते प्रमाण परकीय चलन साठ्याच्या 6.6 टक्के आहे.
 • 2019 या साली भारताच्या आधी अनुक्रमे चीन, रशिया, कझाकस्तान, तुर्की, पोलंड या देशांच्या केंद्रीय बँका परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात सर्वात मोठे खरेदीदार ठरले.
 • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) गेल्या ऑक्टोबर 2019 या महिन्यामध्ये 7.5 टन सोने खरेदी केले होते आणि परकीय चलन साठा 450 अब्ज डॉलरपर्यंत भक्कम केला.

श्रीलंकेला भारताकडून ५ काेटी डाॅलर्सची मदत

 • भारताने श्रीलंकेला सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी ५ काेटी डाॅलर्स देण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डाेभाल लंकेच्या दाैऱ्यावर आहेत. या भेटीत त्यांनी राष्ट्रपती गाेटाबाया राजपाक्षे यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवरही चर्चा केली. त्यात संरक्षण, गुप्तचर व सागरी सुरक्षेच्या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
 • डाेभाल शनिवारी काेलंबाेला दाखल झाले. या भेटीत त्यांनी अनेक मुत्सद्यांचीहीदेखील भेट घेतली. द्विपक्षीय सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, गुप्तचर माहिती, सागरी सुरक्षा इत्यादी मुद्दे दाेन्ही देशात चर्चिण्यात आले, अशी माहिती राष्ट्रपती राजपाक्षे यांनी ट्विट करून दिली. गुप्तचर पातळीवर तंत्रज्ञानविषयक देवाण-घेवाण ही बैठकीचे महत्त्वाचे सार आहे.
 • सागरी सुरक्षेच्या पातळीवर श्रीलंका, मालदिव, भारत यांचा एक गट तयार करण्यात येणार आहे. काेलंबाेला भेट देणारे डाेभाल हे उच्च पातळीवरील भारतीय अधिकारी असून त्यांचा हा दुसरा दाैरा आहे. या आधी त्यांनी नाेव्हेंबरमध्ये भेट दिली हाेती. २०१४ पासून केंद्रातील सरकारने उपखंडातील देशांना प्राधान्याने मदतीचे धोरण स्वीकारले आहे.

Mumbai Marathon 2020 : इथिओपियाच्या धावपटूंनी मारली बाजी

 • प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या रविवारी होणारी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा नेहमीप्रमाणेच यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. मुंबई मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकांनीही भाग घेतला होता.
 • या स्पर्धेत जवळपास ५५ हजार ३२२ धावपटू सहभागी झाले होते. यातील ४२.१९५ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ९ हजार ६६० धावपटू, २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १५ हजार २६० तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या ‘ड्रीम रन’मध्ये १९ हजार ७०७ स्पर्धक, १० किमी शर्यतीत ८ हजार ३२, वरिष्ठांच्या मॅरेथॉनमध्ये १ हजार २२ आणि अपंगांच्या शर्यतीत १ हजार ५९६ धावपटू सहभागी झाले होते.
 • आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत इथिओपिअन धावपटूंनी बाजी मारली. पुरुष गटातील पहिले तिनही क्रमांक इथिओपिअन खेळाडूंनी पटकावले. तसेच महिला गटातील पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर इथिओपिअन महिलांनी आपले नाव कोरले.
 • मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार डॉलर, २५ हजार डॉलर आणि १७ हजार अमेरिकी डॉलर्सचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच पहिल्या तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे पाच लाख, चार लाख आणि तीन लाख रुपये बक्षिस स्वरुपात देण्यात आले.

भारताचा ‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन प्रोजेक्ट’

 • भारत सरकारच्या भू-शास्त्र मंत्रालयाने आवश्यक त्या उपाययोजना करून भूकंपामुळे येणार्‍या आपत्तींना कमी करण्यासाठी देशभरात ‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन प्रोजेक्ट’ नावाचा प्रकल्प राबवत आहे.

‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन’ म्हणजे काय?

 • ‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन’ ही भूगर्भीय आणि भूभौतिकीय वैशिष्ट्यांच्या आधारे भूकंप-प्रवण क्षेत्र ओळखण्याची एक प्रक्रिया आहे.

या प्रक्रियेत खालील बाबींना गृहीत धरल्या जाते –

 • धरणीकंप
 • दरडी कोसळणे
 • मातीच्या थरांचा प्रतिसाद
 • लिक्विफॅक्शन ससेप्टीबिलिटी
 • पर्वत कोसळण्याचा धोका
 • भूकंपांमुळे येणारा पूर
 • आतापर्यंत ही प्रक्रिया सिक्किम, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, गुवाहाटी, जबलपूर, देहरादुन, अहमदाबाद आणि गांधीधाम या शहरांमध्ये पूर्ण झालेली आहे.
 • जगापुढे, जापान हे एक आदर्श उदाहरण आहे जिथे मायक्रोझोनेशन तंत्र चांगल्या प्रकारे अंमलात आणले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here