सामान्य विज्ञान (भाग 2)

 • हेलिअम (He), नियॅान (Ne), आरगॅान (Ar) यांच्या सारखे निष्क्रिय वायू किंवा राजवायू मुक्त अवस्थेत आढळून येतात.
 • हायड्रोजन(H), ऑक्सिजन(O), क्लोरीन(CI), सोडियम (Na), मॅग्नेशिअम (Mg) इ. मूलद्रव्ये रेणू किंवा संयुगाच्या रुपात आढळतात.
 • राजवायूंच्या बाहयतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असून त्यांच्या बाहयतम कक्षा पुर्णपणे भरलेल्या आहेत. त्या कक्षांना अष्टक म्हणतात.
 • राजवायूंव्यतिरिक्त इतर सर्व मूलद्रव्यांच्या बाहयतम कक्षा अपूर्ण असतात.
 • रासायनिक बदलात धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची तर आधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची अथवा भागीदारी करण्याची प्रवृत्ती असते.
 • ऋणभारीत इलेक्ट्रॉन दिल्यामुळे धनप्रभारीत आयन तयार होतो. त्याला कॅटायन असे म्हणतात.
 • इलेक्ट्रॉन दिल्यानंतर सोडीयमच्या इलेक्ट्रॉनी संरूपणात बदल होऊन तो निऑन (Ne) या निकटतम निष्क्रिय वायूंचे स्थायी इलेक्ट्रॉनी संरूपन प्राप्त करतो.
 • ऋणप्रभारित आयनास अॅनायन (Anion) असे म्हणतात.
 • रेणूंमध्ये अणूंना एकत्र धरून ठेवण्यास जी आकर्षण शक्ती जबाबदार असते त्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध म्हणतात.
 • एका अणूपासून दुसर्‍या अणुकडे इलेक्ट्रॉनच्या स्थानांतरणामुळे तयार होणार्‍या) रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विधुत संयुज बंध म्हणतात.
 • Na व C1 स्वतंत्रपणे धोकादायक असले तरी त्यांचे संयुग मीठ (NaC1) सुरक्षित आहे.
 • सारख्याच किंवा एका मूलद्रव्यापासून तयार होणारी संयुगे दोन आणूमधील देवघेवीमुळे तयार होत नाहीततर संयोग पावणार्याद अणूमध्ये होणार्‍या इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तयार होतात. या बांधाला सहसंयुज बंध’ असे म्हणतात.
 • जेव्हा रेणुमधील दोन अणूमध्ये एकाच इलेक्ट्रॉन जोडीची भागीदारी होऊन बंध तयार होतो. त्या बांधाला एकेरी बंध असे म्हणतात.
 • मिथेन रेणुमध्ये C-H असे चार एकेरी बंध असतात.
 • जेव्हा रेणूंच्या दोन अणूमध्ये दोन इलेक्ट्रॉनच्या जोडयाची भागीदारी होतेतेव्हा ते दोन अणू दुहेरी बंधने बांधले जातात. उदा. इथिलीन (C2H4)
 • जेव्हा दोन अणूमध्ये तीन इलेक्ट्रॉनच्या जोड्यांची भागीदारी होऊन तीन बंध तयार होतात त्याला तिहेरी बंध’ म्हणतात. उदा. अॅसीटिलीन (C2H2) H-C    
 • सामाईक इलेक्ट्रॉनना स्वत:कडे आकर्षित करण्याच्या अणूच्या क्षमतेला या मूलद्रव्याची विधुतऋणता म्हणतात.
 • आयनिक संयुगे पाण्यात विरघळल्याने आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला विचरण असे म्हणतात.
 • शुद्ध पाणी विजेचे दुर्वाहक असते.
 • रेणूपासून आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला आयनीभवण असे म्हणतात.
 • अणुने किंवा अणूंच्या गटाने एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन दिले असता किंवा घेतले असता तयार होणार्याय आयनांना मुलक’ असे म्हणतात.
 • धन आयन किंवा मुलके यांनाच कॅटायन (cation) किंवा आम्लारिधर्मी मुलके असे देखील म्हणतात. उदा. Na+, k+, Mg2+, A13+, NH4+
 • ऋण आयन किंवा मुलके यांनाच अॅनायन किंवा आम्लधर्मी मुलके असे देखील म्हणतात. उदा. C1-, S2-, SO42-, CO32-
 • साधे मुलक एका अणूपासून बनलेले असते व ते धनप्रभारीत किंवा ऋण प्रभारित असते. उदा. K+, Ca2+, A13+, C1-, O2-, N3- इ. 
 • संयुक्त मुलकांमध्ये अणूंचा गट असतो व तो गट दोन किंवा अधिक प्रकारच्या अणूपासून तयार झालेला असतो ते धन प्रभारित व ऋण प्रभारित व ऋण प्रभारित असतात उदा. CO23-, NH4+
 • पदार्थामध्ये होणार्‍यात ज्या बदलात त्याचे फक्त भौतिक गुणधर्म बदलतात कोणताही नवा पदार्थ तयार होत नाही आणि मूळ पदार्थ सहजासहजी परत मिळतो अशा बदलास भौतिक बदल म्हणतात.    
 • उदाहरणे- मीठ पाण्यात विरघळतेपाण्याचे बर्फात रूपांतर होणेपाण्याचे वाफेत रूपांतर होणेइ.
 • ज्या बदलामध्ये भाग घेणार्या् पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते व नवीन तयार झालेल्या पदार्थाचे गुणधर्म हे मूल पदार्थांपेक्षा पुर्णपणे वेगळे असतातअशा बदलाला रासायनिक बदल म्हणतात.
 • उदाहरणे – स्वयंपाकाचा गॅस जळणेकेरोसिन जळणेदुधापासून दही होणेअन्नपदार्थ आंबणेअन्नपदार्थाचे पचन होणे.
 • ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता मुक्त होते त्यांना उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात.
 • ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता शोषली जाते तिला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात.
 • रासायनिक अभिक्रिया म्हणजे अभिक्रियांचे तपशीलवार विवेचन होय.
 • समीकरणाच्या डाव्या बाजूस अभिक्रियाकारके व उजव्या बाजूस उत्पादिते लिहावीत.
 • संतुलित समीकरणामध्ये अभिक्रिया कारके व उत्पादिते यांच्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या दोन्ही बाजूला सारखी असते.
 • ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून फक्त एकच उत्पादित मिळते अशा अभिक्रियांना संयोग अभिक्रिया’ म्हणतात.
 • ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच संयुगापासून दोन किंवा अधिक साधे पदार्थ मिळतात त्या अभिक्रियेला अपघटण अभिक्रिया’ म्हणतात.
 • एखाधा पदार्थातील अणू किंवा अनुगटदुसर्‍या पदार्थातील अणू किंवा अनुगट यांची जागा घेऊन नवीन पदार्थ तयार करत असतीलतर अशा अभिक्रियांना विस्थापन अभिक्रिया’ असे म्हणतात.
 • ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन संयुगांच्या घटकाची आपापसात अदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे तयार होतात अशा अभिक्रियांना दुहेरी अपघटण’ अभिक्रिया म्हणतात.
 • ज्या रासायनिक अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी जास्त कालावधी लागतो अशा अभिक्रियांना मंद अभिक्रिया’ म्हणतात. उदा. भाजीपाला कुजणेलोखंड गंजणेदही होणे.
 • ज्या रासायनिक अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी खूपच कमी कालावधी लागतो. त्यांना शीघ्र अभिक्रिया म्हणतात. उदा. ब्लिचिंग पावडरची प्रक्रिया.
 • रासायनिक अभिक्रियेतअभिक्रियाकारकांच्या उत्पादित संहतीमध्ये एकक कालावधीत घडून येणारा बदल म्हणजेच रासायनिक अभिक्रियेचा वेग’ होय.
 • अभिक्रिया कारकांचे  स्वरूप किंवा क्रियाशीलता रासायनिक अभिक्रियांच्या वेगावर परिणाम करते.
 • रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार्यां अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा वेग जास्त असतो.
 • अभिक्रियेचे तापमान वाढविल्यास अभिक्रियेचा वेगदेखील वाढतो.
 • ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो/बदलतो परंतु त्या पदार्थांमध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाहीअशा पदार्थांना उत्प्रेरक असे म्हणतात.
 • उत्प्रेरकामुळे रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढतो किंवा ती प्रक्रिया कमी तापमानाला होते.
 • अपमार्जकांमध्ये (Detergent) विकारांचा (Enzymes) उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात.
 • आपले स्नायूत्वचाकेस यांची जडणघडण करणारे प्रोटीन म्हणजे कार्बणी संयुगे असतात.
 • आपला अनुवंशिकीय वारसा ठरविणारी RNA व DNA ही न्यूक्लिइक आम्ले कार्बन संयुगे असतात.
 • आपण खातो ते अन्न घटक म्हणजे कार्बोहायड्रेटप्रोटीन मेदयुक्त पदार्थ व जीवनसत्वे ही कार्बन संयुगे असतात.
 • सुगंधी द्रव्येजीवाश्म इंधनेऔषधे व कीटकनाशकेप्लॅस्टिक व रंजकद्रव्ये अशा विविध प्रकारच्या द्र्व्यामध्ये कार्बनसंयुगे असतात.
 • कापूसरेशीमलोकरपॉलिस्टरटेरिलीननायलॉन यांसारखे आपल्या वस्त्रांचे धागे हे कार्बन संयुगांचेच बनलेले असतात.
 • आपले जीवन ‘ कार्बन’ या मूलद्रव्यावर आधारलेले आहे.
 • कार्बन संयुगांची विविधता प्रचंड आहे. त्यांचा विस्तार एकच कार्बन अणू असलेल्या मिथेनपासून ते अब्जावधी कार्बन अणू असलेल्या डी.एन.ए. पर्यंत पसरलेला आहे.
 • कार्बनचा अणूअंक 6 असून त्यातील इलेक्ट्रॉनचे कवचनिहाय वितरण 2, 4 असे आहे.
 • कार्बनची संयुजा 4 आहे.
 • कार्बनकडे मालिका बंधन शक्ति असून त्याच्या खूप लांब साखळ्या बनू शकतात.
 • म्हणून कार्बनची संयुगे मोठया प्रमाणावर तयार होतात व त्यामुळे कार्बन हे अव्दितीय मूलद्रव्य ठरते.
 • बहुसंख्य कार्बन संयुगामध्ये सर्वसाधारणपणे आढळणारे मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन. सर्वात साध्या कार्बन संयुगामध्ये फक्त कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात.त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात.
 • कार्बनच्या चार संयुंजांचे समाधान चार स्वतंत्र अनुंशी एकेरी बंध करून झालेले असते. अशा हायड्रोकार्बनना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात.
 • दुसर्‍या प्रकारात हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणू एकमेकांशी बहुबंधाने जोडलेले असतात.
 • बहुबंधामधील कार्बन अणू हे त्या रेणुमधील इतर कार्बन अणूंपेक्षा वेगळे असतात.
 • मिथेन हा सर्वात साधी संरचना असलेला हायड्रोकार्बन असून त्याच्या रेणूत केवळ एकच कार्बन अणू असतो.
 • इंधन खाणीकोळसा खाणीगोबर गॅस व बायोगॅस मध्ये दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन असतो.
 • ज्वलनशीलतेमुळे मिथेनचा इंधन म्हणून वापर केला जातो.
 • हायड्रोजन व अॅसिटिलीन वायूंचे औधोगिक उत्पादन मिथेनपासून मिळते.
 • इथेन हा संतृप्त हायड्रोकार्बन आहे.
 • इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटाच्या किन्वण प्रक्रियेने मिळविले जाते.
 • इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटांच्या किन्वन प्रक्रियेने मिळविले जाते.
 • पॉलिथिन हे इथिलीन पासून बनविले जाते.
 • अॅसीटिलीन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे.
 • ऑक्सिअॅसिटिलीन च्या ज्योतीचे तापमान नैसर्गिक वायू किंवा हायड्रोजन वायूंच्या जोतीपेक्षा जास्त असते.
 • PVC या बहुवारिकाच्या उत्पादनासाठी लागणार्याग कार्बन संयुगाच्या आधौगिक उत्पादनासाठी अॅसिटीलीन वापरला जातो.
 • सजीवांमधील रुपिकीय आणि कार्यरूपी विचरणास जीवनसृष्टीची विविधता’ असे म्हणतात.
 • वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समुहांना वर्गेकक (Taxa) असे म्हणतात.
 • वर्गीकरणामधील पदानुक्रमात वर्गेककांचा स्तर पुढील प्रमाणे असतो. जातीप्रजातीकुलगणवर्गविभागसंघ.
 • वनस्पतीमधील सर्वात उच्च स्तरीय वर्गेककास विभाग’ म्हणतात. तर प्राण्यातील सर्वोच्च स्तरास संघ (phylum) म्हणतात.
 • सर्वात उच्चस्तरीय वर्गेकक म्हणजे सृष्टी’(Kingdom).
 • सर्व सजीवांची नावे दोन शब्दांच्या समूहाने दर्शवितात. प्रथम नावास प्रजाती नाम तर दुसर्‍या नावास जाती नाम म्हणतात.
 • मनुष्यप्राण्याचे वैज्ञानिक नाव होमो-सेपियन्स’ असे आहे.
 • ही व्दींनामसूत्रीय नामकरण पद्धती कॅरोलस लिनियास ने शोधली.
 • अॅरिस्टॉटल आणि त्याच्या शिष्य थिओफ्रस्टस यांनी प्रथमच व्दिसृष्टी पद्धतीने वनस्पति व प्राणी यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयन्त केला.
 • आर.एच.व्हीटावर यांनी पंचसृष्टी पद्धती अस्तित्वात आणली.
 • चयापचयी क्रिया अभ्यासणारी शाखा म्हणजे शरीरक्रिया शास्त्र’.
 • सस्तन प्राण्याच्या शरीरामध्ये आढळणारे हिमोग्लोबिन हे एक प्रथिन आहे.
 • मानव आणि गोरीला यांच्या हिमोग्लोबिनच्या रेणुच्या संरचनेत फक्त एका अमिनो आम्लाचा फरक असतो.
 • मानव व र्हीसस माकड यांच्या हिमोग्लोबीन रेणुच्या संरचनेत चार अमिनो आम्ले असतात.
 • एखाधा सजीवाच्या भ्रूणापासूनच्या विकासाच्या अभ्यासास भ्रोणिकी’ (Embroyology) असे म्हणतात.
 • मासाकासवपक्षीडुक्करमानव यांचे भ्रूण प्रारंभिक अवस्थेत समान असतात.
 • स्वसंरक्षण यंत्रणेशी निगडीत रक्त गुणधर्माचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा म्हणजे रक्तद्रव्यशास्त्र होय.
 • वर्गीकरणाची अत्याधुनिक पद्धती डी.एन.ए.आर.एन.ए. आणि प्रथिने या जैवरेणूच्या अभ्यासवर आधारित आहे.
 • तंतुरूपी कवकांना बुरशी’ म्हणतात. उदा. पेनिसिलियमम्युकर
 • एकपेशीय कवकांना किन्व’ असे म्हणतात. उदा. सॅकरोमायासिस.
 • ज्या संरचनेत निलहरित जीवाणू आणि शैवाल यांपैकी एक सजीव कवकाबरोबर सहजीवन जगतोत्यांना शैवाक असे म्हणतात.  
 • उस्निया या शैवकाचा उपयोग मसाल्यात केला जातो. (Lichens)
 • जीवाणू हे सूक्ष्मदर्शीकीय एकपेशीय सजीव आहेत. त्यांना आदिकेंद्रकी सजीव असे म्हणतात.
 • हरिता (Mass) या वनस्पतीमद्धे संवहनी संस्थेचे कार्य करणारे संवहनी पट्ट असतात.
 • बीजाणुधानींच्या समुहास शंकू’ असे म्हणतात. उदा. इक्किसेटम.
 • फिलिसिनी हा वनस्पतींचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वनस्पतींना नेचे’ असे म्हणतात.
 • निलवर्णीय देवमाशामध्ये प्राणी हे सुमारे ३५ मी. लांबी एवढे प्रचंड असतात.
 • संघ प्रोटोझुआ – अमिबाएंटामिबाप्लाझामोडियमपॅरॅमेशिअमयुग्लिनाइ.
 • प्लाझामोडियम हा परजीवी आदिजीवी मानवाच्या तांबडया पेशीमध्ये आढळतो.
 • प्लासमोडियममुळे मलेरिया हा रोग होतो. माध्यम अॅनाफेलीस डासाची मादी.
 • संघ पोरीफेराची उदाहरणे- सायकोणयुस्पांजिया (आंघोळीचा स्पंज)हायलोनिमा.
 • हायड्रा हा दंडाकृती आकाराचा गोडया पाण्यात आढळणारा सिलेंटरेट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here