महिलांनी स्वावलंबी होता यावा आणि आर्थिक दृष्ट्या त्या सक्षम व्हाव्यात याकरिता देखील अनेक योजना राबवल्या जातात अगदी याच पद्धतीने महिलांसाठी एक सरकारची एक योजना 2023 24 च्या अर्थसंकल्पात संकल्पना अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी घोषित केली आहे.
महिला सन्मान बचत पत्र योजना-
महिलांना आर्थिक दृष्ट सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याकरिता खास करून या योजनेची आपण करण्यात आलेली आहे साधारणपणे एक एप्रिल 2023 पासून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिला एकापेक्षा जास्त खाते उघडू शकतात या योजनेमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर यामध्ये महिला 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकतात या योजनेत महिला शंभरच्या पटीत गुंतवणूक करू शकतात यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा दोन लाख रुपये रुपयांची आहे या योजनेच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून साडेसात टक्के व्याज देण्यात येते या ठिकाणी खाते उघडण्यात येईल-
महिलांना या योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल तर महिला ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, तसेच आयडीबीआय बँक, आणि आयसीआयसीआय बँक खाते उघडू शकतात तसेच पोस्ट ऑफिस आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसोबत व इतर खाजगी बँकांची ही योजना सुरू केली आहे.
असा करा अर्ज-
महिला सन्मान बचत खाते उघडायचे असेल तर याकरिता आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पत्त्याचा पुरावा देणे गरजेचे आहे ही कागदपत्रे घेऊन तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत भेट द्या व तुम्हाला या योजनेमध्ये किती गुंतवणूक करायची आहे ती रक्कम निश्चित करा व अर्ज सोबत सबमिट करा.