बारावीनंतर मुलांना वेगवेगळ्या कोर्स आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) नं बारावी पास विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज दिली आहे.स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने स्टेनोग्राफर भरती परीक्षेचं नोटीफिकेशन प्रसिद्ध केलंय.
बुधवारी 2 ऑगस्ट रोजी हे नोटीफिकेशन काढण्यात आलंय. याबात अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 23 ऑगस्टपर्यंत आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर पदासाठी तुम्हाला www.ssc.nic.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे ही परीक्षा दोन टप्प्यात होणार असून ऑक्टोंबर महिन्यात याबाबतची पहिल्या टप्प्यातील परीक्षा होणार आहे या मधील पहिला टप्पा हा कम्प्युटरवर आधारित असेल तर दुसऱ्या टप्प्यात स्किल टेस्ट होईल.
१२ आणि १३ ऑक्टोबर रोजी या भरतीसाठीची पहिल्या टप्प्याची परीक्षा होईल शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा
स्टेनोग्राफर ग्रुप सी १८ ते ३०
स्टेनोग्राफर ग्रुप डी १८ ते २७
राखीवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत नियमानुसार सवलत मिळेल
वेतनश्रेणी
स्टेनोग्राफर ग्रुप सी स्केल – ९३००/-३४८००पे बँड – ४२०० किंवा ४६०० (वेतन ग्रेड
सुरुवातीचा पगार – ५२००बेसिक पे -१४५००स्टेनोग्राफर
ग्रुप डीपे स्केल – ५२००-२०२००पे बँड – २४००(वेतन ग्रेड
सुरुवातीचा पगार – ५२००बेसिक पे – ७६००