दहावीचा भूगोलचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीची परीक्षा होणार नाही

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. त्यात आता शिक्षण विभागाने दहावीचा भूगोल पेपर आणि नववी, अकरावीच्या परीक्षाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

दहावीचा भूगोल पेपर रद्द करण्यात आला आहे. मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आपली भूमिका लवकरच स्पष्ट करेल. त्याचबरोबर इयत्ता 9 आणि 11 वी परीक्षाही होणार नाही. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत विद्यार्थ्यांना मार्क्स दिले जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here