(चालू घडामोडी) Current Affairs | 26 December 2019

संगिता रेड्डी: FICCI संस्थेचे नवे अध्यक्ष

 • अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असलेल्या संगिता रेड्डी ह्यांनी FICCI या संस्थेची अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
 • ठळक बाबी: संगिता रेड्डी सन 2019-20 या वर्षासाठी हे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. त्यांनी HSIL कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप सोमनी ह्यांच्याकडून पदभार घेतला.
 • वॉल्ट डिस्नेच्या APAC कंपनीचे भारतातले अध्यक्ष आणि स्टार अँड डिस्ने इंडियाचे अध्यक्ष उदय शंकर यांना संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून पदोन्नती दिली गेली आहे.
 • HUL कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता ह्यांनी संस्थेच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धात अंजुमची हॅट्ट्रिक :

 • भारताच्या आघाडीच्या रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी 63व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत आपली घोडदौड कायम राखली आहे. अंजुम मुद्गिलने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली.
 • तर याचप्रमाणे अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंग देसवालने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात राष्ट्रीय जेतेपद पटकावले आहे. महाराष्ट्राच्या हर्षदा निथावे आणि अनिकेत जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • मनू भाकरने सरबज्योत सिंगच्या साथीने कनिष्ठ मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक मिळवताना राष्ट्रीय स्पर्धेतील सातव्या सुवर्णाची नोंद केली. तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील वरिष्ठ, कनिष्ठ आणि सांघिक गटांमध्ये चार सुवर्णपदके जिंकली होती.
 • अंजुमने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान मिळवताना 1172 गुण मिळवले. मग अंतिम फेरीत सुवर्णलक्ष्य साधताना अंजुमने 449.9 गुण मिळवले, तर तमिळनाडूच्या एन. गायत्रीला 2.6 गुण कमी मिळाले.

कोहली ठरला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू :

 • मागील दहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांवर वर्चस्व गाजवणारा भारताचा कर्णधार विराट कोहली याला ‘द क्रिकेटर’ या पाक्षिकाने दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.
 • तर पाक्षिकाने गेल्या 10 वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 50 क्रिकेटपटूंची यादी तयार केली असून, त्यात पुरुष आणि महिलांचा समावेश आहे.
 • भारताकडून कोहलीसह रविचंद्रन अश्विन 14 व्या, रोहित शर्मा 15 व्या, महेंद्रसिंग धोनी 35 व्या आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा 36 व्या स्थानावर आहे. तसेच महिला क्रिकेटपटू मिताली राज 40 व्या स्थानी आहे.

देशातील सव्वालाख गावांत मार्चपर्यंत मोफत वाय-फाय :

 • भारत नेटशी जोडलेल्या देशभरातील सव्वा लाख गावांत मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हरियाणातील रेवाडी येथे केली.
 • तर येत्या चार वर्षांत देशभरातील 6 लाख गावांपैकी 15 टक्के गावांचे रुपांतर डिजिटल गावांत केले जाईल, असे सांगत त्यांनी बुधवारी रेवाडीस्थित गुरुवारा गाव डिजिटल गाव म्हणून घोषित केले.
 • देशभरातील 1.3 लाख ग्राम पंचायती भारत नेट प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. अडीच लाख ग्रामपंचायती भारत नेट आॅप्टिकल फायबरशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
 • इंटरनेट सेवा लोकप्रिय करण्यासाठी भारतनेटशी जोडल्या गेलेल्या सर्व गावांना मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सुविधा दिली जाईल. सध्या 48 हजार गांवात वाय-फाय सुविधा आहे.
 • अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी रेवाडी गावाचे रुपांतर डिजिटल गावांत झाल्याने आनंद होत आहे. यामुळे गावकऱ्यांना शहर, तालुक्याला न जात गावातच एक क्लिकवर सरकारी योजना व सेवा उपलब्ध होईल. या गावांतील प्रत्येक घर वाय-फाय सुविधा उपलब्ध असेल. एक लाख गावांचे रुपांतर डिजिटल गावांत करण्याच्या  घोषणेनंतर भिवाडी नजीक अल्वरस्थित करींदा गावात व्हीएनएल कंपनीने डिजिटल गावांचे प्रारुप तयार केले होते. तत्कालीन दूरसंचार सचिवांनीही हा एक चांगला उपक्रम असल्याचे म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here