(चालू घडामोडी) Current Affairs | 1 December 2019

भारतीय नौदलामध्ये डोर्नियर विमानांची सहावी तुकडी सेवेत

 • भारतीय नौदलामध्ये डॉर्नियर विमानांची सहावी तुकडी सेवेत रुजू झाली आहे. “इंडियन नेव्हल एयर स्क्वॉड्रॉन 314” असे या तुकडीचे नाव आहे, ज्याला ‘रॅप्टर्स’ देखील म्हणतात. नौदल प्रमुख व्हाईस अॅडमिरल एम. एस. पवार यांनी या तुकडीला सेवेत नेमले आहे.
 • ठळक मुद्दे: ही तुकडी गुजरातच्या पोरबंदर शहरात तळ ठोकणार आहे.
 • डोर्नियर विमानांमुळे पाकिस्तानालगतच्या सागरी सीमेजवळच्या किनारपट्टीच्या भागात पाळत ठेवली जाणार आहे.
 • या तुकडीमुळे उत्तर अरबी समुद्रामध्ये पाळत ठेवणे सोपे होणार आहे.

नवी दिल्लीत ‘UNDP अॅक्स्सेलेरेटर लॅब’ उघडण्यात आली

 • संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्यावतीने (UNDP) नवी दिल्लीत ‘अॅक्स्सेलेरेटर लॅब’ उघडण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रदूषणासारख्या देशाला भेडसावणार्‍या गंभीर समस्यांवर कल्पक उपाययोजना शोधल्या जाण्यास मदत मिळणार आहे.
 • नवकल्पनेच्या माध्यमातून उद्दिष्टे साध्य करण्यासाठी UNDP याने NITI आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सोबतही भागीदारी केली आहे.
 • उपक्रमाविषयी: संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्यावतीने (UNDP) जगभरात त्याचा संशोधनात्मक ‘अॅक्स्सेलेरेटर लॅब’ नावाचा उपक्रम राबवविला जातो.
 • या उपक्रमाच्या माध्यमातून देशाला भेडसावणार्‍या समस्यांवर कल्पक उपाययोजना सुचविण्यासाठी तांत्रिक मदत पुरवली जाते.

सूर्यापेक्षा 70 पट आकाराच्या कृष्णविवराचा लागला शोध :

 • आमच्या आकाशगंगेत सूर्याच्या आकारापेक्षा 70 पट महाप्रचंड अशा ‘राक्षसी’ कृष्णविवराचा (ब्लॅक होल) शोध लागला असून तारे, ग्रह कसे उत्क्रांत झाले याबद्दल जे सांगितले जाते त्या सिद्धांतालाच आव्हान मिळत आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले.
 • तसेच आकाशगंगेत अंदाजे 100 दशलक्ष ताऱ्यांसारखे दिसणारे ब्लॅक होल्स (महाप्रचंड ग्रह/तारे कोसळून जे अस्तित्वात आले ते म्हणजे ब्लॅक होल्स) आहेत. ही कृष्ण विवरे इतकी घट्ट आहेत की, त्यातून सूर्यप्रकाशही पलीकडे जाऊ शकत. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की, आमच्या आकाशगंगेतील स्वतंत्र असे एकेक कृष्णविवर हे सूर्याच्या 20 पटीपेक्षा जास्त नाही, असे संशोधकांनी म्हटले. या नव्या शोधामुळे आतापर्यंतचा समज भुईसपाट झाला.
 • तर आंतरराष्ट्रीय तुकडीला फार मोठ्या कृष्णविवराचा शोध लागला. तिचे नेतृत्व नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल आॅब्झर्वेटरी आॅफ चायनाने (एनएओसी) केले होते. हे संशोधन जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झाले. त्यात कृष्ण विवराचे नामकरण एलबी-1 असे केले गेले असून, ते पृथ्वीपासून 15 हजार प्रकाशवर्षे दूर आहे.

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा

 • भारताने पाकिस्तानचा ४-० असा धुव्वा उडवत डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटाची पात्रता गाठली आहे. अनुभवी लिएण्डर पेसने पदार्पणवीर जीवन नेदुनशेझियानच्या साथीने दुहेरीतील ४४वा सामना जिंकत आपल्या विक्रमात सुधारणा केली.
 • पेस-जीवन या भारतीय जोडीपुढे पाकिस्तानच्या षोड्शवर्षीय मोहम्मद शोएब आणि हुझैफा अब्दुल रेहमान जोडीचा निभाव लागला नाही. फक्त ५३ मिनिटांत पेस-जीवनने ६-१, ६-३ अशा फरकाने विजय मिळवला.
 • मग परतीच्या एकेरीच्या सामन्यात सुमित नागलने युसफ खलिलला ६-१, ६-० असे नामोहरम केले. त्यामुळे उभय संघांनी पाचवी लढत न खेळण्याचा निर्णय घेतला. डेव्हिस स्पर्धेत तीन लढतींनंतर विजयी संघ ठरला, तरी चौथी लढत खेळणे अनिवार्य असते.
 • दुहेरीच्या लढतीत हुझैफा आणि मोहम्मद जोडीने चांगली सुरुवात केली. परंतु पेस-जीवनने ३-१ अशी आघाडी घेत मग सेटवरील नियंत्रण सुटू दिले नाही. दुसऱ्या गेममध्ये तर पेस-जीवनने निर्विवाद वर्चस्व गाजवले.

यापुढे माजी पंतप्रधान व त्यांच्या परिवाराला मिळणार 5 वर्षे SPG सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारचे संसदेत बिल

 • यापुढच्या काळात अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजी सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करणारे एसपीजी सुरक्षा संशोधन विधेयक बुधवारी लोकसभेत मांडण्यात आले. नव्या बदलानुसार केवळ विद्यमान पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबाला एसपीजी सुरक्षा कव्हर मिळणार असून माजी पंतप्रधान व त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबतच राहत असल्यास त्या कुटुंबालादेखील पाच वर्षे एसपीजी सुरक्षा कव्हर मिळणार आहे.
 • एसपीजीचे कर्तव्य हे पंतप्रधानांची सुरक्षा करण्याचे आहे असे नमूद करून त्यात काही बदल आवश्यक होते ते सरकारने केले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले. संबंधित व्यक्तीचे स्थान पाहूनच एसपीजी सुरक्षा द्यायची की नाही याचा निर्णय होतो.
 • मुळातच एसीपीजी अनेकदा प्रतिष्ठेसाठी वापरली गेल्याची उदाहरणे आहेत, मात्र यापुढच्या काळात एसपीजी सुरक्षा केवळ आणि केवळ पंतप्रधानांसाठीच असेल. माजी पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांनाही ते पायउतार झाल्यानंतर ही सुरक्षाव्यवस्था पाच वर्षांसाठी दिली जाईल, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here