(चालू घडामोडी) Current Affairs | 11 December 2019

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाची १६ डिसेंबरपासून सुरुवात

 • विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली.१६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे.
 • अधिवेशनात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयके, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे. विधान परिषदेत सात अशासकीय विधेयकांवर चर्चा होणार आहे.
 • तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बारकोडचे सहसंशोधक जार्ज लॉरर यांचे निधन :

 • किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातील व्यवहार सर्वासाठीच ज्यामुळे सोपे झाले, त्या बारकोडचे सहसंशोधक व अमेरिकी अभियंता जॉर्ज लॉरर यांचे उत्तर कॅरोलिनातील वेंडेल येथील निवास्थानी निधन झाले.
 • तर बहुतेक वस्तूंवर जी काळ्या रेघांची पट्टी दिसते त्याला बारकोड असे म्हणतात. तो 12 अंकांचा एक सांकेतांक असतो ज्यावरून ते उत्पादन ओळखता येते. आज जगात विक्रीसाठी असलेल्या बहुतांश वस्तूंवर बारकोड लावलेला असतो.
 • आयबीएम कंपनीत काम करीत असताना जॉजॅ लॉरर यांनी युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड म्हणजे बारकोड विकसित केले होते. हा बारकोड वाचण्यासाठी लागणारा स्कॅनरही त्यांनी विकसित केला.
 • तसेच या बारकोडमध्ये आधी टिंबांचा समावेश होता त्याऐवजी लॉरर यांनी पट्टय़ांचा समावेश केला. बारकोडमुळे उद्योग जगतात मोठी क्रांती घडून आली असे आयबीएमच्या संकेतस्थळावर त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत म्हटले आहे.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताची विक्रमी पदकझेप!

 • भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅफ) सलग १३व्यांदा अग्रस्थान राखले. आतापर्यंतची विक्रमी पदकझेप घेताना भारताच्या खात्यावर ३१२ पदकांची नोंद होती. यात १७४ सुवर्ण, ९३ रौप्य आणि ४५ कांस्यपदकांचा समावेश होता. २०१६मध्ये गुवाहाटी आणि शिलाँग येथे झालेल्या ‘सॅफ’ स्पर्धेतील ३०९ पदकांचा आकडा या वेळी भारताने ओलांडला. परंतु १५ सुवर्णपदके कमी मिळवली.
 • यजमान नेपाळला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर श्रीलंकेला तिसरे स्थान मिळाले. १९८४पासून भारताने ‘सॅफ’ स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. या वेळी ४८७ खेळाडूंच्या पथकाने ही वर्चस्वपताका कायम राखली. मंगळवारी अखेरच्या दिवशी भारताने १८ पदकांची (१५ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य) भर घातली. स्क्वॉशमध्ये भारताने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले.

जर्मनवॉच क्लायमेट रिस्क इंडेक्स 2020

 • ‘जर्मनवॉच’ या संस्थेकडून ‘क्लायमेट रिस्क इंडेक्स 2020’ ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बदलत्या हवामानामुळे येणार्‍या संकटांमुळे होणार्‍या नुकसानीच्या घटनांचा देशावर किती परिणाम झाला याबाबत हा अहवाल आहे.
 • या यादीत जापान प्रथम स्थानी आहे. जापान नैसर्गिक संकटाने सर्वाधिक प्रभावित झालेला आहे. जापानच्या पाठोपाठ फिलीपिन्स, जर्मनी, मादागास्कर, भारत आणि श्रीलंका या देशांचा क्रमांक लागतो.
 • ठळक बाबी: 2018 साली जापान, फिलिपिन्स तसेच जर्मनी या देशांवर सर्वाधिक परिणाम झाला. सन 1999 ते सन 2018 या कालावधीत प्यूर्तो रिको, म्यानमार आणि हैती या देशांमध्ये सर्वाधिक नैसर्गिक संकटे आलीत.
 • सन 1999 ते सन 2018 या कालावधीत दहा सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये सात कमी उत्पन्न असणारे किंवा निम्न-मध्यम उत्पन्न असणारे देश, दोन उच्च-मध्यम उत्पन्न असणारे देश (थायलँड आणि डोमिनिक) आणि एक उच्च उत्पन्न असणारी प्रगत अर्थव्यवस्था (प्यूर्तो रिको) आहे.
 • जापान, फिलीपिन्स, भारत, श्रीलंका अश्या आशियाई तसेच आग्नेय आशियाई देशांवर हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होत आहे.
 • सन 1999 ते सन 2018 या कालावधीत जगभरात निर्माण झालेल्या 12000 हून अधिक नैसर्गिक संकटांमुळे 495,000 लोकांचा मृत्यू झाला आणि अंदाजे 3.54 महादम डॉलरच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
 • विकसित किंवा औद्योगिक देशांपेक्षा कमी विकसित देशांवर बदलत्या हवामानाचा जास्त परिणाम होतो.
 • 2018 साली उष्णतेच्या लाटांमुळे जर्मनी, जापान आणि भारत हे देश सर्वात जास्त प्रभावित झाले.

मानवी विकास निर्देशांकात प्रगती

 • सन २०१९च्या मानवी विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताची प्रगती झाल्याचे समोर आले आहे. देशाने १३०वरून १२९ क्रमांकावर झेप घेतली असल्याचे संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात २००५-०६पासून २०१५-१६पर्यंत सुमारे २७ कोटी एक लाख नागरिक गरिबीतून बाहेर आले असल्याचे ‘यूएनडीपी’चे भारतातील प्रतिनिधी शोको नोडा यांनी सांगितले. मागील वर्षी भारत ‘एचडीआय’मध्ये १३०व्या स्थानावर होता.
 • जवळपास तीन दशकांच्या वेगवान विकासामुळे सातत्याने प्रगती होत गेली. त्यामुळे आयुर्मान, शिक्षण आणि आरोग्यविषयी सुविधांच्या लाभासह पूर्ण दारिद्र्यामध्ये नाट्यमय कपात झाली, असेही त्या म्हणाल्या. ‘एचडीआय’नुसार अन्य कोणत्याही प्रदेशात इतक्या वेगाने मानवी विकास झालेला नाही. १९९० ते २०१८दरम्यान दक्षिण आशिया सर्वाधिक वेगाने विकास होणारा प्रदेश होता. त्यापाठोपाठ पूर्व आशिया आणि पॅसिफिकमधील विकासदर ४३ टक्के होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here