(चालू घडामोडी) Current Affairs | 11 January 2020

जागतिक बँकेचा “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स” अहवाल

 • जागतिक बँकेचा ताजा ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये वर्तवविलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा (GDP) वृद्धिदर हा 5 टक्क्यांवर सीमित राहणार.
 • अहवालातल्या ठळक बाबी
 • भारताविषयी: जागतिक बँकेचा अंदाज खरा ठरल्यास भारतीय विकासदराचा तो 11 वर्षांतला नीचांक ठरणार.
 • GDP दरातल्या घसरणीस कारणीभूत असणारे घटकही जागतिक बँकेने नमूद केले आहेत. भारतात खासगी क्षेत्रातून होणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रयशक्तीही घटल्याचे दिसत असून त्याचाही विकासदरास फटका बसणार.
 • पुढील आर्थिक वर्षात वृद्धिदर वेग धरणार व आर्थिक वर्ष 2020-21 अखेर हा दर 5.8 टक्क्यांवर पोहोचणार.
 • जागतिक: वर्ष 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची अंदाजित वाढ 2.5 टक्के राहणार असा अंदाज आहे.
 • दक्षिण आशियाचा GDP वृद्धीदर 2019-20 या वर्षी 5.5 टक्क्यांपर्यंत राहण्याचे अपेक्षित आहे.
 • 2020 या वर्षी प्रगत अर्थव्यवस्थांचा एकत्रित वृद्धीदर 1.4 टक्क्यांपर्यंत खालावणार असा अंदाज आहे.
 • उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर यंदा 4.1 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे अपेक्षित आहे.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचा बारा देशांशी करार

 • येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने शैक्षणिक आदानप्रदान करण्याच्या हेतूने जगातील बारा देशांशी करार करीत हिंदी प्रसाराचा मार्ग प्रशस्त केला आहे.
 • १० जानेवारी हा विश्व हिंदी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. हिंदी आंतरराष्ट्रीय भाषेच्या स्वरूपात सक्षम व्हावी म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने केले जाते.
 • विद्यापीठात के. कुमारस्वामी यांच्या नावावर भारतीय संस्कृती व भाषेचे एक आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध देशातील भारतीय संस्कृती व हिंदी केंद्र या माध्यमातून उपक्रमांचे आयोजन करते. विदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठाने बारा देशांशी करार केले आहे. श्रीलंका, हंगेरी, मॉरिशस, जपान, बेल्जीयम, इटली, जर्मनी, चीन, रशिया, फ्रोन्स, सिंगापूर, केनिया या देशांशी झालेल्या करारांतर्गत विद्यार्थ्यांचे आदानप्रदान होत असते.
 • विश्व हिंदी दिन सर्वप्रथम १० जानेवारी २००६ रोजी साजरा करण्यात आला. तसेच १९७५ पासून विश्व हिंदी संमेलनाच्या पहिल्या आयोजनानंतर आजवर इंग्लंड, त्रिनिनाथ, अमेरिका, मॉरिशस व अन्य देशात या संमेलनाचे आयोजन झाले आहे.

CAA : देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू; केंद्र सरकारची अधिसूचना जारी

 • लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ११ डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. १२५ विरूद्ध १०५ च्या फरकानं राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. आता देशभरात हा कायदा लागू करण्यात आला असून केंद्र सरकारनं याची अधिसूचना जारी केली आहे.
 • सुधारित नागरिकत्व कायद्यात नेमकं काय? धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आगे.
 • कोणाला फायदा नाही ? श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या कायद्याचा लाभ मिळणार नाही.
 • देशातील कोणत्या भागाला असणार नाही हे लागू? ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही.
 • कोणत्या अटींमध्ये करण्यात आलेत बदल? सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी ११ वर्ष राहणं आवश्यक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही अट शिथिल करून ती सहा वर्ष करण्यात आली आहे. यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा, १९५५ मध्ये काही बदल करण्यात आलेत. ज्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे सोनेरी यश :

 • ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे शुक्रवारी गुवाहाटी येथे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
 • पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करताना दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
 • महाराष्ट्राच्या अस्मी बदाडे हिने तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये तर मानस मनकवळे याने पॉमेल हॉर्स प्रकारत सुवर्णपदक प्राप्त केले.
 • तर 17 वर्षांखालील गटात अस्मीने 43.80 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या श्रेया बंगाळे हिने 40.80 गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. या दोघींनीही दोरी आणि चेंडूच्या साहाय्याने अप्रतिम कसरती सादर केल्या.
 • अस्मीने याआधी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये 5 सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवले आहे. अस्मी ही ठाणे येथील ज्ञानसाधना विद्यामंदिरची विद्यार्थी असून ती पूजा आणि मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

मिलन 2020

 • यावर्षी मार्च महिन्यात भारतात ‘मिलन’ (MILAN) नावाचा जगभरातल्या नौदलांचा वार्षिक आंतरराष्ट्रीय सराव होणार आहे. ‘सिनर्जी अक्रॉस द सीज’ या विषयाखाली यंदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 • या बहुपक्षीय सागरी सरावासाठी आमंत्रित केलेल्या 41 देशांच्या नौदलांपैकी तीसने आपली उपस्थिती राहणार असे आश्वासन दिले आहे.
 • ठळक बाबी: हा सराव विशाखापट्टणम येथे होणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2016 मध्ये हा सराव विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता.
 • हा कार्यक्रम एक आठवडा चालणार आहे.
 • या कार्यक्रमामुळे परदेशी नौदलांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध आणखीन वृद्धीगत करण्यास वाव मिळतो. तसेच समान हितसंबंध असलेल्या क्षेत्रात परस्पर संवाद साधण्याची एक उत्कृष्ट संधी मिळू शकते.
 • हा कार्यक्रम व्यवसायिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने आणि सागरी क्षेत्रामधील एकमेकांचे सामर्थ्य आणि उत्कृष्ट पद्धतींमधून शिकण्याच्या उद्देशाने आहे.
 • ‘मिलन’ विषयी: मिलन हा बहुपक्षीय नौदल सराव 1995 साली पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. भारतीय नौदलाकडून अंदमान व निकोबार कमांडच्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
 • निमंत्रणकर्त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यंदा सरावाचे ठिकाण अंदमान व निकोबार येथून तार्किक व प्रशासकीय सोयीसाठी विशाखापट्टणम येथे हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here