(चालू घडामोडी) Current Affairs | 12 December 2019

नागरिकत्व विधेयक संसदेत मंजूर :

 • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 125 तर, विरोधात 105 मते पडली. विधेयकावरून घूमजाव करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग केला. तर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.
 • राज्यसभेत 240 सदस्य असून पाच सदस्यांनी गैरहजर राहण्यासाठी रितसर परवानगी मागितली होती. त्यामुळे वरिष्ठ सभागृहात 235 सदस्य उपस्थित राहणार होते. पण, प्रत्यक्ष मतदानावेळी 230 सदस्य सभागृहात होते.
 • तसेच शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामविलास पासवान असे पाच खासदार गैरहजर होते.

पाकवर नजर ठेवण्यासाठी RISAT-2BR1 अवकाशात :

 • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन अर्थ इमेजिंग सॅटलाइट रिसॅट-2 बीआर 1 चे प्रक्षेपण केले.
 • तर पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही हा भारताचा अत्यंत भरवशाचा उपग्रह प्रक्षेपक आहे. पीएसएलव्हीची ही 50 वी मोहीम होती.
 • RISAT-2BR1 हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट आहे. या उपग्रहाचे वजन 628 किलो आहे.
 • RISAT-2B मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. RISAT-2 ची जागा घेण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या RISAT-2B उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते.
 • रिसॅट उपग्रहांची मालिका असून प्रामुख्याने हेरगिरीसाठी या उपग्रहांचा उपयोग करण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. शत्रुच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
 • तसेच काही दिवसांपूर्वीच इस्रोने कार्टोसॅट-3 या अर्थ इमेजिंग सॅटेलाइटचे प्रक्षेपण केले होते. RISAT-2BR1 या उपग्रहासोबत इस्रोने अन्य देशांच्या आणखी नऊ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. यातले सहा उपग्रह अमेरिकेचे तर, इस्रायल, इटली आणि जापानचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.

सहारा वॉरियर्स टीम सलग दुसऱ्यांदा आयपीए राष्ट्रीय स्पर्धेचा चॅम्पियन ठरला

 • सहारा वॉरियर्सने सलग दुसऱ्यांदा आयपीए राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०१९ चा किताब जिंकला. सहारा वॉरियर्सने तगड्या जिंदर पँथर्स संघाला फायनलमध्ये पराभूत केले.
 • सहारा इंडिया परिवाराच्या लोगोच्या जर्सीवर उतरलेल्या टीमने सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. संघातील खेळाडू क्रिस मॅकेन्झी, सिद्धांत शर्मा, अंगद कलाँ, सतिंदर गारचा यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. संघाला काश्मीरचे युवराज विक्रमादित्य सिंग यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. सहाराने चालू हंगामात जयपूर व दिल्लीमध्ये इंडियन पोलो संघटनेच्या ४ मोठ्या स्पर्धा जिंकल्या.

WADA ने सर्व आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धांसाठी रशियावर चार वर्षांची बंदी घातली

 • सरकारपुरस्कृत उत्तेजक चाचणी प्रकरणामुळे जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीने (WADA) सर्व आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धांसाठी रशियावर चार वर्षांची बंदी घातली आहे, ज्यामध्ये येत्या 2020 टोकियो ऑलंपिक आणि 2022 कतार फुटबॉल विश्वचषक या स्पर्धांचा देखील समावेश आहे.
 • याशिवाय, रशिया हिवाळी ऑलंपिक आणि पॅरालंपिकमध्येही सहभाग घेऊ शकणार नाही.
 • WADAने स्पष्ट केले की, रशियावर असे आरोप होते की ते ‘उत्तेजक चाचणी’साठी आपल्या खेळाडूंचे चुकीचे नमुने पाठवत आहेत आणि तपासातही हे सिद्ध झाले की, रशियाने नमून्यांमध्ये छेडछाड केली आहे.
 • आता WADAच्या नियमांनुसार, रशियातले जे खेळाडू उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळले नाहीत, ते न्यूट्रल खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. म्हणजेच या बंदीमुळे स्पर्धेत रशियाच्या खेळाडूंना रशियाच्या ध्वजांतर्गत सहभागी होता येणार नाही. तसेच खेळाडूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सहभागी होता येणार नाही.

भारताच्या शस्त्रसाठ्यात अद्यावत अमेरिकन ‘अ‍ॅसॉल्ट रायफल्स’ दाखल

 • भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेअंतर्गत १० हजार अमेरिकन ‘सिग सउर अ‍ॅसॉल्ट रायफल्स ‘ (American SiG Sauer assault) ची पहिली खेप भारताला मिळाली आहे.
 • या अत्याधुनिक रायफलचा वापर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना समूळ नष्ट करण्यासाठी केला जाणार आहे.
 • भारताने लष्कराला अधिक सक्षम बनवण्साठी व अद्यावत शस्त्रसाठ्याने परिपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने तब्बल ७२ हजार ४०० रायफल निर्मितीचे कंत्राट दिले होते.सद्यस्थितीस या रायफल जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सेनेच्या उत्तर कमांडकडे सोपवण्यात आल्या आहेत.
 • भारतीय लष्कराची ही उत्तर कमांड जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियान राबवते, तसेच पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या सर्व कारवायांना सडतोड प्रत्युत्तर देते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here