(चालू घडामोडी) Current Affairs | 13 December 2019

Citizenship Amendment Bill : कायदा अस्तित्वात; विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

 • नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता याचं कायद्यात रूपांतर झालं आहे. गुरूवारी रात्री राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. लोकसभेनंतर राज्यसभेतही या विधेकाला मंजुरी देण्यात आली आहे.
 • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं १२५ तर, विरोधात १०५ मतं पडली. त्यानंतर गुरूवारी रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. एएनआयनं यासंबंधीतील वृत्त दिलं आहे.
 • धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये करण्यात आली आहे.

ग्रेटा थनबर्ग ठरली टाइमच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ ची मानकरी

 • न्यूयॉर्क:‘आमच्या अंगावर केवळ पोकळ शब्द फेकून आमचं भवितव्य कुस्करण्याची तुमची हिंमत तरी कशी होते…’ न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या जोडीनं चाललेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत असा खडा सवाल नेत्यांना करणारी अवघ्या सोळा ग्रेटा थनबर्ग टाइम मॅगझीनच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ ल पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
 • हा सन्मान प्राप्त करणारी ग्रेटा ही सर्वात कमी वयाची तरुण व्यक्ती ठरली आहे. गेल्या वर्षी शाळा बुडवून स्वीडनच्या संसदेबाहेर प्रथम निदर्शक म्हणून उभी राहिली. ‘पृथ्वी व पर्यावरण वाचवा’ असा आर्त टाहो तिनं फोडला. त्या क्षणापासून जगभर ज्वाळेसारखी ही चळवळ पसरली.
 • आता शंभराहून अधिक देशांत शुक्रवारी ‘वसुंधरा मेळावे’होतात. ग्रेटाच्या कामाचं विविध स्तरातून कौतुक होत असून ‘राइट लाईव्हलीहूड’ या पर्यायी नोबेल पुरस्काराचीही ती विजेती ठरली आहे.

वेस्टर्न इंडिया स्क्वॉश स्पर्धात ऐश्वर्या, यशला विजेतेपद :

 • महाराष्ट्राच्या ऐश्वर्या खूबचंदानीने समांथा चाईला 3-0 अशा फरकाने पराभूत करत ‘सीसीआय’ वेस्टर्न इंडिया स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद मिळवले.
 • तर मुलींच्या 19 वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावणाऱ्या ऐश्वर्याने महिलांच्या अंतिम सामन्यात समांथाला 11-8, 11-6, 11-3 असे नामोहरम केले.
 • गोव्याच्या यश फडतेने पुरुषांच्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित दिल्लीच्या गौरव नंद्रजोगला 11-8, 10-12, 11-6, 11-6 असे पराभूत केले.
 • मुलांच्या 17 वर्षांखालील गटाचे जेतेपद पटकावताना तमिळनाडूच्या अभिषेका श्ॉननने महाराष्ट्राच्या युवना गुप्ताला 11-8, 13-11, 4-11, 11-7 असे नमवले.

निता मेहताकडे नँशनल चँम्पियनशिप आणि 2020 च्या विश्वस्तरीय स्पर्धेचे नेतृत्व :

 • चूल आणि मूल या नियमांची चौकट मोडून राज्यातील लाखो महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत समाजात आत्मसन्मान मिळाला आहे. या महिला समाजातील अन्य महिलांसाठी पथदर्शी ठरत आहेत. यामधीलच एक नाव निता मेहता.एक गृहिणी ते नँशनल चँम्पियनशिप आणि 2020 च्या विश्वस्तरीय स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व हा प्रवास सर्वसामान्य गृहिणींना निश्चितच प्रेरणादायी आहे.
 • तर एशियन गेम्स् वुमन्स पाँवरलिफ्टींग चँम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करीत 2020 मध्ये होणाऱ्या विश्वस्तरीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे.
 • निता यांनी आपल्या गटामध्ये स्काटमध्ये शंभर किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले, बेंचप्रेस मध्ये 47.5 किलो वजन उचलत सिल्व्हर पदक मिळविले तर डेटलेफ्ट मध्ये 115 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले.

बोगेनविले: जगातला नवा देश बनण्याच्या मार्गावर

 • पापुआ न्यू गिनीपासून स्वातंत्र्य मिळवून जगातला सर्वात नवीन देश होण्याची घोषणा 11 डिसेंबर 2019 रोजी बोगेनविले या प्रदेशाच्या दक्षिण प्रशांत क्षेत्राच्या बोगेनविले सार्वमत आयोगाकडून करण्यात आली. बोगेनविले सार्वमत आयोगाचे अध्यक्ष बर्ट्टी अहेरन यांनी ही घोषणा केली आहे.
 • आता स्वातंत्र्यासाठी बोगेनविले आणि पापुआ न्यू गिनी यांच्या नेत्यांदरम्यान वाटाघाटी होणे आवश्यक आहे. त्यानंतर पापुआ न्यू गिनीच्या संसदेत अंतिम निर्णय घेतला जाणार. अद्याप संयुक्त राष्ट्रसंघाकडून या निर्णयाला मान्यता मिळालेली नाही.
 • बोगेनविले प्रदेशातल्या लोकांनी अलीकडेच पापुआ न्यू गिनीपासून वेगळे होण्याविषयी मतदान केलेले आहे. सुमारे 85 टक्के पात्र मतदारांनी दोन आठवड्यांच्या मतदानात 181,000 हून अधिक मत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here