(चालू घडामोडी) Current Affairs | 13 January 2020

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला

 • भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.
 • या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.
 • होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी
 • पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे. होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे. ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.
 • या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत. कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते.

केंद्र सरकार २०० फायटर जेट्स खरेदी करणार

 • भारताच्या हवाई दलात लढाऊ विमानांची कमतरता भासू नये, यासाठी केंद्र सरकार लवकरच २०० फायटर जेट्स विमान खरेदी करणार
 • हिंदुस्तान अॅरोनॉटिकल्स लिमिटेडकडून तयार करण्यात येत असलेले ८३ तेजस लढाऊ विमानांचे कंत्राट शेवटच्या टप्प्यात.
 • ८३ लढाऊ विमाना शिवाय ११० अन्य विमानांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण २०० लढाऊ विमान खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही ८३ तेजस लढाऊ विमानांच्या कंत्राटाला लवकरच अंतिम रूप देणार आहोत.
 • भारतीय हवाई दलात सध्या मिराज २०००, सुखोई ३० एमकेईआय आणि मिग-२९ यासारखे लढाऊ विमान आहेत. याशिवाय जॅग्वार आणि मिग २१ बायसन यांचाही समावेश आहेत. परंतु, ही विमाने आता काळाच्या ओघात जुनी झाली आहेत. विशेष म्हणजे, मिग २७ या लढाऊ विमानाने अखेरचे उड्डान केले आहे. कारगिल युद्धाच म्हत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या मिग २७ या लढाऊ विमानाचे जोधपूर एअरबेसवर जवळपास ४ दशके सेवा दिल्यानंतर अखेरचे उड्डाण केले.

बॅडमिंटन : केंताे मोमोताने पहिल्यांदा जिंकला मलेशिया मास्टर्स किताब

 • अव्वल मानांकित केंताे माेमाेताने रविवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावला. त्याने फायनलमध्ये डेन्मार्कच्या व्हिक्टर एलेक्सनवर मात केली.
 • त्याने २४-२२, २१-११ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने पहिल्यांदाच याच स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महिला गटात चीनची चेन फेई किताबाची मानकरी ठरली.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात महाराष्ट्र अग्रस्थानी कायम :

 • खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने रविवारीदेखील अपेक्षेप्रमाणे अग्रस्थान कायम ठेवले.
 • रविवारी महाराष्ट्राला एकूण चार सुवर्णपदके मिळाली. सायकलिंगमध्ये पूजा दानोळे आणि मधुरा वायकर यांच्या रूपाने तर अ‍ॅथलेटिक्समध्ये अभय गुरव आणि पूर्वा सावंत यांनी सुवर्णपदके पटकवली.
 • तर याबरोबरच महाराष्ट्राने पदकतालिकेत 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 15 कांस्य यांच्यासह एकूण 36 पदकांची कमाई केली आहे.
 • महाराष्ट्राला रविवारी सायकलिंगमधून (मुलींच्या गटात) दोन सुवर्णपदके मिळाली. पूजा दानोळेने 15 किलोमीटर आणि मधुरा वायकरने 20 किलोमीटर गटात सुवर्णपदकांची कमाई केली.
 • मधुराने 20 किलोमीटर अंतराची शर्यत 30 मिनिटे 36 सेकंद अशी वेळ देत जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here