(चालू घडामोडी) Current Affairs | 13 November 2019

भारत 23 ते 29 जानेवारी दरम्यान 2023 पुरुष हॉकी विश्वचषक आयोजित करेल

  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) आज जाहीर केले की भारत पुरुषांच्या स्पर्धेचे आयोजन करेल तर स्पेन आणि नेदरलँड्स या संघांचे सह-यजमान म्हणून निवड करण्यात येणार आहे.
  • २०२२ महिला विश्वचषक स्पर्धा १ ते २२ जुलै या कालावधीत होणार आहे. स्वित्झर्लंडच्या लॉझने येथे एफआयएच कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
  • एफआयएचने पुढे सांगितले की पुरुष व महिला वर्ल्ड कप या दोन्ही ठिकाणांची घोषणा यजमान देशांनी नंतरच्या तारखेला केली जाईल.

आंध्र प्रदेशात सर्व तेलुगु शाळा आता इंग्रजी माध्यमाच्या :

  • आंध्र प्रदेशातील तेलुगु माध्यमाच्या सर्व शाळांचे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये रूपांतर करण्यास आंध्र प्रदेश सरकारने मान्यता दिली आहे. तर राज्यात पंचायत राज, महापालिका आणि सरकारी अशा तेलुगु माध्यमाच्या जवळपास 44 हजार शाळा आहेत. या निर्णयाबद्दल तेलुगु देसम पार्टी आणि भाजपने निषेध नोंदविला आहे.
  • तसेच मंडल प्रजा परिषद आणि जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी या वर्गाचे 2020-21 मध्ये, इयत्ता नववीच्या वर्गाचे 2021-22 मध्ये आणि इयत्ता दहावीच्या वर्गाचे 2022-23 या शैक्षणिक वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या
  • शाळांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या वर्गासाठी आदेशाची प्रथम अंमलबजावणी करण्यात येणार आहेत.
  • तथापि, शालेय शिक्षण आयुक्त तेलुगु आणि ऊर्दू हे सक्तीचे विषय करण्याबाबत योग्य निर्णय घेणार आहेत. शिक्षणाचा अधिकार कायद्याने विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षणाचा हक्क दिला आहे त्याचे आम्ही संरक्षण करणार आहोत आणि तेलुगु भाषेला कमी लेखणार नाही, तेलुगु भाषा सक्तीचा विषय म्हणून शिकविण्यात येणार आहे., मात्र काही वर्षांत शिकविण्याचे माध्यम हे तेलुगुऐवजी इंग्रजी राहणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता स्पर्धेत आकाश त्रिपाठी देशात प्रथम :

  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) घेतलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आकाश कमलेश त्रिपाठी या विद्यार्थ्याने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • तर प्रथमच घेतलेल्या अशा प्रकारच्या या स्पर्धेत देशभरातील 1000 महाविद्यालयांतील 30,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
  • तसेच नवसारी येथील स्नेह आर. मेहता दुसर्या, तर आयआयटी जोधपूरमधील हर्षित शर्मा तिसर्या क्रमांकावर राहिला. अंतिम फेरीत 20 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना टीसीएसमध्ये संधी देण्याची तयारी दर्शविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here