(चालू घडामोडी) Current Affairs | 14 January 2020

‘नासा’च्या चंद्र, मंगळावरील स्वारीत भारतीय वंशाचे कर्नल राजा चारी

 • अमेरिकेच्या हवाई दलातील भारतीय वंशाचे कर्नल राजा जॉन वुरपुतुर चारी (४१) यांची नासाच्या आगामी चंद्र, मंगळ मोहिमेसाठी निवड झाली आहे. २०२० मधील या मोहिमेसाठी नासाने ११ नव्या अंतराळवीरांची निवड जवळपास निश्चित केली आहे.
 • नासाच्या या ११ नव्या अंतराळवीरांनी दोन वर्षांपेक्षा अधिक काळाचे अंतराळ यात्री प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. नासाने आपल्या ‘आर्टेमिस’ कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर २०१७ मध्ये या यशस्वी अंतराळयात्रींना १८ हजार अर्जदारांमधून निवडले होते. यात चारी यांचाही समावेश होता. येथे एका कार्यक्रमात प्रत्येक अंतराळवीरांना परंपरेने दिली जाणारी चांदीची पीन देण्यात आली.
 • नासाचे प्रशासक जिम ब्रिडेंस्टाइनने ह्यूस्टनमध्ये बोलताना सांगितले की, २०२० मध्ये अमेरिका अंतराळयात्रींना अंतराळात पाठविणे पुन्हा सुरुवात करणार आहे. आमच्या प्रगतीचे हे एक महत्त्वाचे वर्ष असेल. अंतराळयात्री जेव्हा आपला अंतराळ प्रवास पूर्ण करतील तेव्हा त्यांना सोन्याची एक पीन देण्यात येईल.
 • नव्या अंतराळवीरांना आयएसएस, चंद्र आणि मंगळ मोहिमांवर पाठविले जाऊ शकते. नासाच्या नियोजनानुसार महिला अंतराळयात्रीला २०२४ पर्यंत चंद्रावर पाठविण्याचा विचार आहे. चारी हे अमेरिकी हवाई दलात कर्नल आहेत.

ऑस्करची नामांकने जाहीर :

 • जगभरात प्रतिष्ठा असलेल्या 92व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कराची नामांकने जाहीर झाली असून टॉड फिलिप्सचा ‘जोकर’ सर्वाधिक 11 नामांकनांचा मानकरी ठरला आहे.
 • तर क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’, मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘द आयरिश मॅन’ आणि सॅम मेंडीसचा ‘1917’ या चित्रपटांना प्रत्येकी 10 नामांकने जाहीर झाली आहेत.
 • दक्षिण कोरियातील चित्रपट निर्माते बोंग जून हो यांच्या ‘पॅरासाइट’ला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट पटकथा यासह सहा नामांकने मिळाली आहेत.

स्वदेशी ‘तेजस’ विमान: जहाजावर अरेस्टेड लँडिंग करणारे भारताचे पहिले विमान

 • नौदलात दाखल होण्याच्या मार्गावर असलेल्या स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ या वजनाने हलक्या लढाऊ विमानाने दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी INS विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवर यशस्वीपणे अरेस्टेड लँडिंग केले.
 • या अरेस्टेड लँडिंगनंतर नौदलासाठी डबल इंजिन तेजस विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • INS विक्रमादित्य ही मुंबईतील पश्चिम कमांड मुख्यालयाचा एक भाग असून मुंबई अंतर्गत अरबी समुद्रात ही चाचणी झाली.
 • ही यशस्वी लँडिंग कमांडर जयदीप मावलंकर यांनी केली.
 • या यशामुळे भारत आता अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि चीन यासारख्या देशांच्या निवडक गटात प्रवेश करणार ज्याने 200 मीटर लांबीच्या धावपट्टीवर अरेस्टेड लँडिंग करण्यास सक्षम असे विमान विकसित केले आहे.
 • सामान्य अवस्थेत धावपट्टीवर उतरण्यासाठी 1 किलोमीटरची धावपट्टी लागते. अरेस्टेड लँडिंगमध्ये एका लवचिक तारेच्या मदतीने विमानाला रोखले जाते.
 • तेजस विमान: तेजस देशात विकसित करण्यात आलेले पहिले एक इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे.
 • या विमानाला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजंसीने रचले आणि विकसित केले आहे.
 • तेजस भारतीय हवाई दलाच्या 45 व्या स्क्वाड्रन ‘फ्लाइंग ड्रॅगर्स’ चा भाग आहे.
 • हवाई दलाने डिसेंबर 2017 मध्ये HALला 83 तेजस जेट तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती.
 • पहिल्यांदा ‘तेजस’ विमान 1980च्या दशकात रशिया, फ्रान्स आणि रशियाकडून तंत्रज्ञान घेवून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केले होते.

नवी दिल्लीत 14 जानेवारीपासून  ‘रायसीना संवाद’ याचा प्रारंभ

 • 14 जानेवारी ते 16 जानेवारी 2020 या काळात दरवर्षी प्रमाणे नवी दिल्लीत ‘रायसीना संवाद 2020’ ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 • कार्यक्रमाचा विषय: “21@20: नेव्हिगेटींग द अल्फा सेंचुरी”
 • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे या संमेलनाचे मुख्य वक्ते आहेत. या बैठकीला संबोधित करणार्‍या इतर मंत्र्यांमध्ये यजमान भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांचा समावेश आहे.
 • तसेच इराण, डेन्मार्क, मालदीव, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया, भूतान, दक्षिण आफ्रिका, झेक प्रजासत्ताक, एस्टोनिया आणि उझबेकिस्तानमधले प्रतिनिधी यात भाग घेणार आहेत.
 • यावर्षी मोठ्या संख्येनी जगभरातल्या परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती भू-राजनैतिक परिषदेत असणार आहे. परिषदेत 90 देशांमधून 150 हून अधिक वक्ता आणि 550  प्रतिनिधी भाग घेणार आहेत.
 • कार्यक्रमाविषयी: ‘रायसीना संवाद’ ही नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे. 2016 सालापासून तीन दिवस चालणारी ही परिषद भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन (दिल्लीतली स्वायत्त वैचारिक संस्था) यांच्यावतीने संयुक्त रूपात आयोजित केली जाते.
 • “रायसीना” हे नाव नवी दिल्लीमधल्या ‘रायसीना टेकडी’ या ठिकाणावरून ठेवले गेले आहे, जे भारत सरकार तसेच राष्ट्रपती भवन, राष्ट्रपतीसाठीचे घर आहे.
 • हा कार्यक्रम जागतिक समुदायाला भेडसावणार्‍या सर्वात आव्हानात्मक मुद्द्यांना सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे. इथे धोरण, व्यवसाय, माध्यमे आणि नागरी समाजातले सर्व जागतिक नेते नवी दिल्लीत एकत्र येतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आंतरराष्ट्रीय धोरणांच्या विस्तृत विषयावर चर्चा करतात.

जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरू

 • चीनमध्ये जगातील सर्वांत मोठा आणि संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप सुरू करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या टेलिस्कोपची चाचणीच तीन वर्षे घेण्यात येत होती. तर हा टेलिस्कोप बनविण्यासाठी चीनला तब्बल 20 वर्षे लागली. हा टेलिस्कोप जगभरातील खगोल शास्त्रज्ञांसाठी खुला करण्यात आला आहे.
 • चीनमध्ये एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आहे की, हजारो किमी लांबीचे रस्ते आणि गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी काही महिनेच लागतात. मात्र, या टेलिस्कोप निर्मितीच्या कामाने चीनला मोठा वेळ खर्ची घालावा लागला आहे. हा टेलिस्कोप गुईझोऊ प्रांतामध्ये बांधण्यात आला आहे. 2016 पासून याची चाचणीच घेण्यात येत होती.
 • हा टेलिस्कोप प्युर्टोरिकाच्या अरेसिबो ऑब्झर्व्हेटरीपेक्षा 2.5 पटींनी संवेदनशील आहे. प्युर्टोरिकास्थित ऑब्झर्व्हेटरीमध्ये जगातील दुसरा मोठा सिंगल डिश रेडिओ टेलिस्कोप कार्यरत आहे. याचा वापर अंतराळात दूरवर जीवजंतूंचा शोध आणि एलियन्सचा शोध घेण्यासाठी करण्याच येतो.
 • चीनचा टेलिस्कोप एका सेकंदात 28 जीबी माहिती गोळा करण्यात सक्षम आहे. यामुळे त्याला फाईव्ह हंड्रेड मीटर अपार्चर स्पेरिकल रेडिओ टेलिस्कोप (फास्ट) असे नाव देण्यात आले आहे. फास्टची अंतराळातील रेंज चार पटींनी जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here