(चालू घडामोडी) Current Affairs | 16 December 2019

सरकारने प्रथमच ‘औषध किंमत नियंत्रण अध्यादेश-2013’ लागू केला

 • सरकारने प्रथमच ‘औषध किंमत नियंत्रण अध्यादेश-2013’ लागू केला असून, त्याद्वारे औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी किंमती नियंत्रणाच्या अंतर्गत असलेल्या 21 औषध वा औषधी-घटकांच्या किंमतीत वाढविण्यात येत आहे.
 • नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) यांच्या नियंत्रणात असलेल्या औषधांच्या सध्याच्या कमाल मर्यादेच्या किंमतींमध्ये 50 टक्के वाढ केली जाणार आहे. ही वाढ एकदाच केली जाणार.
 • या निर्णयामुळे, BCG लस, पेनिसिलिन, मलेरिया आणि कुष्ठरोगावरील औषधे (डॅप्सोन), फ्युरोसेमाइड सारखी जीवनरक्षक औषधे (हृदय, यकृत किंवा मूत्रपिंडाच्या आजारामध्ये वापरली जाणारी), ‘क’ जीवनसत्त्व, काही प्रतिजैविके आणि अँटी-अॅलर्जी औषधे यासारख्या औषधांच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे.

NASAने ‘बेन्नू’ लघुग्रहावरील नमुने संकलित करण्यासाठी ठिकाणांची निवड केली

 • NASA या अंतराळ संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ‘बेन्नू’ लघुग्रहाच्या पृष्ठभागावर नमुने संकलित करण्यासाठी ठिकाणांची निवड केली असून त्यांना “नाईटिंगेल” म्हणून ओळख दिली गेली आहे.
 • या जागा बेन्नूच्या उत्तर गोलार्धात शोधल्या गेल्या आहेत. ‘सॅन्डपीपर’, ‘ओस्प्रे’, ‘किंगफिशर’ आणि ‘नाईटिंगेल’ अशी नावे त्या जागांना दिली गेली आहेत.
 • मोहिमेविषयी:  ‘बेन्नू’ लघुग्रहाच्या पृष्ठभागाचे नमुने घेण्यासाठी NASA ने तीन वर्षांपूर्वी ‘OSIRIS-REx’ (ऑरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन, रिसोर्स आयडेन्टिफिकेशन, सिक्यूरिटी-रेगोलिथ एक्सप्लोरर) नावाचे अंतराळयान पाठवले होते. यानाने 17 ऑगस्ट 2018 रोजी 2.3 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून पहिल्यांदा लघुग्रहाचे छायाचित्र घेतले.
 • NASAची ही मोहीम 2023 साली लघुग्रहाचे नमुने घेऊन पृथ्वीवर पोहचणार आहे. यापूर्वी जापान आणि युरोप यांनीही अशी मोहीम राबवलेली होती, मात्र यावेळी प्रथमच एखाद्या लघुग्रहाचे नमुने गोळा केले जाणार आहे.
 • ‘बेन्नू’ लघुग्रहाचा व्यास सुमारे 500 मीटर इतका आहे. हा सध्या सर्वात प्राचीन अंतराळ घटक आहे. सध्या हा लघुग्रह अंतराळयानापासून सुमारे 2.3 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. हा एक कार्बन-समृद्ध लघुग्रह आहे.

जमैकाची टोनी सिंह विश्वसुंदरी :

 • विश्वसुंदरी स्पर्धेत जमैकाच्या टोनी अ‍ॅन सिंह हिने विश्वसुंदरी 2019 किताब पटकावला असून भारताची सुमन राव तिसऱ्या क्रमांकावर राहिली. तर जमैकाची तेवीस वर्षीय टोनी अ‍ॅन सिंह हिला विजेती घोषित करण्यात आले.
 • ब्रिटिश दूरचित्रवाणीवरील पीअर्स मॉर्गन यांनी या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. टोनी अ‍ॅन सिंह ही इंडो कॅरेबियन वडील ब्रॅडशॉ सिंह व आफ्रिकन कॅरबियन आई जारिन बेली यांची कन्या असून ती फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत महिला अभ्यास व मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे.
 • तर स्पर्धेच्या वेळी तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिने व्हिटनी ह्य़ूस्टनचे ‘आय हॅव नथिंग’ हे गाणे सादर केले. तसेच गतवर्षीची विजेती मेक्सिकोची व्हॅनेसा पॉन्स द लिऑन हिने तिच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट ठेवला.
 • टोनी सिंह ही जमैकाची चौथी विजेती आहे यापूर्वी तिच्या देशाला 1963, 1973, 1993 या वर्षी विजेतेपद मिळाले होते. फ्रान्सची ऑफले मेझिनो ही उपविजेती,तर भारताची सुमन राव तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

मनरेगाचा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती जिल्ह्याला जाहीर :

 • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत सन 2018-19 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमरावती जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर या पुरस्काराचे वितरण नवी दिल्लीच्या सुब्रमण्यम सभागृहात 19 ते 20 डिसेंबरला होणार आहे.
 • सन 2018-19 या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी मनरेगा आयुक्तालय नागपूर यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. तर महाराष्ट्र राज्यातून सदर पुरस्कारासाठी अमरावतीसह यवतमाळ, गोदिंया, गडचिरोली या चार जिल्ह्यांचे नामांकण सादर करण्यात आले होते. त्यानुसार दिल्ली येथे अवार्ड समितीसमोर सादरीकरणासाठी जिल्ह्याची निवड करून बोलविण्यात आले होते.
 • त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तत्कालीन सीईओ मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हाधिकारी मिताली सेठी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी माया वानखडे यांनी अंमलबजावणीचे सादरीकरण २९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे केले होते.
 • तसेच त्या आधारे केंद्र सरकारच्या चमूने 7 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील भातकुली, चिखलदारा, चांदूर बाजार या तीन तालुक्यांत प्रत्यक्ष भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली.

सम्मेद शेटे बनला कोल्हापूरचा पहिला बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मास्टर :

 • मलेशिया मधील पिनांग हेरीटेज सिटी आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापुरच्या सम्मेद शेटेने आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा तिसरा नॉर्म मिळवून आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्यासाठीची पात्रता पूर्ण केली आहे.
 • तर याचसोबत सम्मेदने स्पर्धेत नऊ पैकी सात गुण मिळवून तिसरा क्रमांकही पटकावला. त्यामुळे सम्मेद कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला आंतरराष्ट्रीय मास्टर ठरला आहे.
 • बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय नॉर्म बुद्धिबळ स्पर्धेत खेळल्यानंतर ठराविक आवश्यक कामगिरी करावी लागते. तीन नॉर्म व 2400 आंतरराष्ट्रीय गुणांकनाचा टप्पा पार करणे आवश्यक असते. या दोन्ही अटी पूर्ण झाल्यावर आंतरराष्ट्रीय मास्टर किताब जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून (फिडे) बहाल करण्यात येतो.
 • तसेच सम्मेदने 2400 गुणांकनाचा टप्पा सहा महिन्यापूर्वीच पार केला होता. गतवर्षीच्या दिल्ली ग्रँडमास्टर अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत सम्मेदचा पहिला नॉर्म झाला त्यानंतर रशिया मधील एरोफ्लोट आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा नॉर्म कमविला व अंतिम तिसरा नॉर्म शुक्रवारी कमावत सम्मेदने आपल्या आंतरराष्ट्रीय मास्टर किताबावर शिक्कामोर्तब केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here