(चालू घडामोडी) Current Affairs | 16 January 2020

मायकेल पात्रा: RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर

 • भारतीय रिझर्व्ह बँकेनी डॉ. मायकेल पात्रा ह्यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेणार आहेत.
 • विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य ह्यांनी राजीनामा दिला असून 23 जुलै 2020 रोजी आचार्य ह्यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारणार आहेत. ते पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदी राहणार. भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध विभागात 35 वर्षांचा पात्रा यांना अनुभव आहे.
 • डॉ. मायकेल पात्रा: IIT मुंबईमधून अर्थशास्त्रात पीएचडी केलेले डॉ. पात्रा हे 2005 सालापासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागात काम करीत आहेत. 1985 साली ते भारतीय रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. त्यांनी हावर्ड विद्यापीठात आर्थिक स्थैर्य या विषयावर संशोधनात्मक लिखाण केले. आंतररराष्ट्रीय पातळीवरील वित्त, पैसा आणि धोरणे याविषयी आर्थिक विश्लेषण आणि धोरणे विभागाचे ते सल्लागार राहिले आहेत.

ए. पी. माहेश्वरी: CRPFचे नवे महानिदेशक

 • केंद्रीय IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी ह्यांची 13 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • उत्तरप्रदेश संवर्गातून 1984च्या तुकडीचे IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी सध्या केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) आहेत.
 • 31 डिसेंबर 2019 रोजी आर. आर. भटनागर निवृत्त झाल्यानंतर CRPF महानिदेशक हे पद रिक्त होते.

दीपक चहरच्या हॅटट्रिकला ICC चा पुरस्कार

 • क्रिकेट जगतातील सर्वोच्च मंडळ असलेल्या जागतिक क्रिकेट परिषदेने (ICC) 2019 या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये भारताच्या दीपक चहरला टी २० क्रिकेटमधील वर्षभरातील सर्वोत्तम कामगिरीचा (T20I Performance of the Year) पुरस्कार मिळाला.
 • बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत त्याने ७ धावांत ६ बळी टिपले. त्या कामगिरीसाठी दीपक चहरला पुरस्कार मिळाला.

रोहित शर्मा, विराट कोहली याला ICC कडून पुरस्कार

 • टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याला ICC कडून सर्वोकृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूच्या (ODI Cricketer of the Year) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१९ या वर्षात दमदार खेळी करत रोहितने सर्वाधिक एकदिवसीय धावा ठोकल्या.
 • एका वर्षात त्याने एकूण सात शतके लगावली. त्यापैकी पाच शतके त्याने World Cup 2019 मध्ये झळकावली होती. रोहितच्या एकदिवसीय क्रिकेटमधील वर्षभराच्या कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 • याशिवाय भारतीय कर्णधार विराट कोहली याला त्याने केलेल्या एका स्तुत्य कामगिरीसाठी ICC चा खिलाडूवृत्तीचा सन्मान करणारा पुरस्कार (ICC spirit of cricket) देण्यात आला आहे.

रस्ते सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी न्या. सप्रे

 • रस्ते सुरक्षा समितीवर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधिश ए. एम. सप्रे यांची निवड केली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले. माजी. न्यायाधिश आणि या समितीचे सध्याचे प्रमुख के.एस.पी राधाकृष्ण यांनी या पदावर कार्यरत राहण्यास असमर्थता व्यक्त केल्याने त्यांच्या जागी सप्रे यांची निवड करण्यात आली.
 • या समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळण्यात काही अडचणी असल्याचे न्यायाधिश (निवृत्त) राधाकृष्णन यांनी 16 ऑक्‍टोबर 2019 रोजी कळवले होते, असे सरन्यायाधिश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

SCOच्या 8 आश्चर्यांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा समावेश

 • जगातला सर्वात उंच पुतळा म्हणजेच गुजरातमधले ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ याचा शंघाई सहकार संघटना (SCO) यांच्या ‘8 वंडर्स ऑफ SCO’ या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
 • सदस्य राष्ट्रांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी SCOने हा पुढाकार घेतला आहे.

इतर सात आश्चर्य –

 • तमगलीचा भूप्रदेश (Archaeological Landscape of Tamgaly), कझाकस्तान
 • डॅमिंग पॅलेस, चीन
 • इसिक-कुल तलाव, किर्गिस्तान
 • मुघल घराण्याचा वारसा, पाकिस्तान
 • गोल्डन रिंग, रशिया
 • कोही नवरोझ पॅलेस, ताजिकिस्तान
 • बुखाराचे ऐतिहासिक केंद्र, उझबेकिस्तान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here