(चालू घडामोडी) Current Affairs | 17 December 2019

मराठमोळे मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख

 • नव्या वर्षात ले.ज. मनोज नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांनी सप्टेंबर महिन्यातच उपलष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता. आता लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत.
 • नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते देशाचे नवे लष्करप्रमुख असतील असंही त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणजे मनोज नरवणे हे होय.
 • १९८० मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीनीचे ते विद्यार्थी आहेत. त्यांचे वडील हवाईदलात अधिकारी होते. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केलंय.
 • त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवलं होत. नरवणे हे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख असतील.

विराट कोहली फलंदाजीत अव्वल स्थानी कायम :

 • भारतीय कर्णधार विराट कोहली सोमवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. तर त्याचवेळी, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.
 • कोहली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथपेक्षा 17 गुणांनी आघाडीवर आहे. तसेच चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे अनुक्रमे चौथ्या व सहाव्या स्थानी कायम आहेत.
 • ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनची क्रमवारीत आगेकूच कायम आहे. न्यूझीलंडविरुद्ध पर्थ कसोटीत 143 व 50 धावांची शानदार खेळी करणारा लाबुशेन तीन स्थानांच्या प्रगतीसह पाचव्या स्थानी दाखल झाला आहे.
 • क्रमवारीत त्याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पिछाडीवर सोडले व तो स्मिथनंतर दुसरा सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वांत मोठी कंपनी ठरली

 • मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे. फॉर्च्युन इंडियातर्फे २०१८-१९ या वर्षासाठीची पाचशे शीर्षस्थ भारतीय कंपन्यांची सूची प्रसिद्ध करण्यात आली. या सूचीत इंडियन ऑइल या सरकारी इंधन शुद्धीकरण कंपनीला मागे सारत रिलायन्सने अव्वल स्थान मिळवले.
 • या सूचीत गेल्या १० वर्षांत इंडियन ऑइल कंपनीने अग्रमानांकम कायम राखले होते. फॉर्च्युन इंडियाने दिलेल्या माहितीनुसार २०१८-१९ या आर्थिक वर्षअखेरीस रिलायन्स इंडस्ट्रीजच्या महसुलाचा आकडा ५.८१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

सातव्या आर्थिक गणनेला राजधानी दिल्लीत सुरूवात

 • दिनांक 13 डिसेंबर 2019 रोजी सातव्या आर्थिक गणनेला राजधानी दिल्लीत सुरूवात करण्यात आली.
 • आर्थिक गणना: माहितीमध्ये अचूकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, भारतात प्रथमच संपूर्ण गणना डिजिटल मंचावर एका अॅप्लिकेशनच्या सहाय्याने आयोजित केली जात आहे. त्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या ‘कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC)’ या आस्थापनेसोबत करार केला आहे.
 • दिल्ली हे 26 वा प्रदेश आहे, जेथे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली गेली आहे, तर 20 राज्यांमध्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया आधीपासूनच सुरू आहे.
 • दिल्लीत संपूर्ण प्रक्रियेस सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, जेथे गणना करणारे सुमारे 45 लक्ष आस्थापने व घरांचे सर्वेक्षण करीत आहेत.
 • आर्थिक गणनेविषयी: आर्थिक गणना केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्यावतीने केली जाते. आर्थिक गणनेत देशाच्या भौगोलिक हद्दीत येणार्‍या सर्व आर्थिक आस्थापनांची संपूर्ण गणना केली जाते.
 • आर्थिक गणनेमध्ये वस्तू आणि सेवांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या उद्योगांची गणना केली जाते. त्यामध्ये घरगुती, सूक्ष्म, लघू, मध्यम आणि मोठ्या आस्थापनांची गणना केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here