(चालू घडामोडी) Current Affairs | 17 January 2020

ISRO ची आणखी एक यशस्वी कामगिरी :

 • इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. जीसॅट-30 (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. आज, शुक्रवारी पहाटे दोन वाजून 35 मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले. तर GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे.
 • तसेच GSAT-30 या उपग्रहाचं वजन सुमारे 3,100 किलो आहे. लाँचिंगपासून 15 वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. या उपग्रहामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे.
 • तर यापूर्वी 2015 मध्ये इनसॅट-4ए हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. त्याची मर्यादा संपुष्टात आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे GSAT-30 हा दुरसंचार उपग्रह इस्रोनं लॉन्च केला आहे. जीसॅट-30 हा उपग्रह इनसॅट-4एच्या जागी काम करेल.
 • GSAT-30 हा दुरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.

नवी दिल्लीत ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ प्रदर्शनी

 • 15 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ या नावाने महिनाभर चालणार्‍या एका विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच तिथे  दोन दिवस चालणारा ‘आंतरराष्ट्रीय वारसा’ विषयक परिसंवाद देखील आयोजित करण्यात आला आहे.
 • हा कार्यक्रम भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्ली यांच्या सहकार्याने विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने आयोजित केला आहे.
 • प्रदर्शनाची वैशिष्ट्ये: प्रदर्शनात अभ्यागतांना सामाजिक व सांस्कृतिक जीवनाची पुनर्रचना आणि हंपीची परंपरा, अनेक महत्वाच्या वास्तूंचे वास्तुशास्त्र आणि संकल्पनिय पुनर्रचना आणि बर्‍याच भित्तीचित्रांचे विलोपन अनुभवता येणार आहे.
 • या ठिकाणी वारसाच्या डिजिटल स्वरूपासोबतच वास्तविकतेवर आधारित वारसांच्या भौतिक प्रतिकृती प्रदर्शनास मांडलेल्या आहेत.
 • 3-डी लेझर स्कॅन डेटा, AR, होलोग्राफिक प्रोजेक्शन आणि 3-डी फॅब्रिकेशन्स अश्या तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल संरचना तयार करणे आणि भारतीय वारसाचे गौरव दर्शविणारे संवादात्मक आणि विस्तृत अनुभव प्रदान करणे हे या प्रकल्पांचे उद्दीष्ट आहे. तिथे हंपी आणि वाराणसीचे काशीविश्वनाथ मंदिर, ताजमहाल, कोणार्कचे सूर्य मंदिर, हंपीचे रामचंद्र मंदिर, आणि पाटणचे राणी की वाव या आश्चर्यजनक वास्तूंची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.

मराठमोळे हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीचे वकील :

 • आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.
 • ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मराठमोळे हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे.
 • हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून काम पाहतील. 16 मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होईल.
 • तसेच कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये महत्वाची आणि मोठी कामगिरी करणाऱ्यांना ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते. साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रातील मोठे योगदान असल्याने त्यांना हा बहुमान मिळाला आहे, अशी माहिती शाही घराण्याच्या सूत्रांनी दिली.

“आनंदी गोपाळ’ चित्रपटाला संत तुकाराम आंतरराष्ट्रीय पुरस्कार

 • पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार समारोप सोहळा पार पडला. या वेळी ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने या वर्षीच्या ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.
 •  तर ‘अ सन’ या ‘ट्युनिशियन चित्रपटाने ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ पटकावला. या पुरस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली.
 • रोख रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’चे तर रोख रुपये दहा लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप आहे.
 •  हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात. सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आईला’ या चित्रपटाने परीक्षकांची पसंती पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा, सिनेमॅटोग्राफी (छायाचित्रण) व प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार मिळाला.

सामान्य ज्ञान

 • भारतीय भुदलाची अधिकृत स्थापना – 1 एप्रिल 1895.
 • भारतीय हवामान विभाग (IMD) – स्थापना: वर्ष 1875; मुख्यालय: दिल्ली.
 • नेपाळ – राजधानी: काठमांडू; राष्ट्रीय चलन: नेपाळी रुपया.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना: वर्ष 1909 (15 जून); मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here