(चालू घडामोडी) Current Affairs | 18 December 2019

‘36व्या आंतरराष्ट्रीय भू-शास्त्रीय परिषद’चे दिल्लीत आयोजन होणार

 • 2-8 मार्च 2020 या कालावधीत राजधानी दिल्लीत भारत ‘36व्या आंतरराष्ट्रीय भू-शास्त्रीय परिषद’ (International Geological Congress -IGC) या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
 • यावर्षी परिषदेचा विषय आहे, ‘जिओसायन्सेस: द बेसिक सायन्स फॉर ए सस्टेनेबल डेव्हलपमेंट’. ही परिषद ‘ऑलंपिक ऑफ जिओसायन्स’ म्हणून लोकप्रिय आहे.
 • इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी (INSA) आणि बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळ व श्रीलंका या राष्ट्रीय विज्ञान अकादमींच्या सहकार्याने खाण मंत्रालय आणि भू-शास्त्र मंत्रालय या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (GSI) संस्था ही नोडल एजन्सी आहे.
 • आगामी ‘IGC’ शाश्वत विकास, ऊर्जा संकट, जलसंकट, हवामान बदल, पर्यावरणविषयक प्रश्न आणि संसाधन व्यवस्थापन यासंबंधी समस्या सोडविण्यासाठी मदत करणार.

सम्मेद शेटे बनला कोल्हापूरचा पहिला बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मास्टर

 • मलेशिया मधील पिनांग हेरीटेज सिटी आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापुरच्या सम्मेद शेटेने आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा तिसरा नॉर्म मिळवून आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्यासाठीची पात्रता पूर्ण केली आहे. याचसोबत सम्मेदने स्पर्धेत नऊ पैकी सात गुण मिळवून तिसरा क्रमांकही पटकावला. त्यामुळे सम्मेद कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला आंतरराष्ट्रीय मास्टर ठरला आहे.
 • बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय नॉर्म बुद्धिबळ स्पर्धेत खेळल्यानंतर ठराविक आवश्यक कामगिरी करावी लागते.
 • तीन नॉर्म व २४०० आंतरराष्ट्रीय गुणांकनाचा टप्पा पार करणे आवश्यक असते. या दोन्ही अटी पूर्ण झाल्यावर आंतरराष्ट्रीय मास्टर किताब जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून (फिडे) बहाल करण्यात येतो. सम्मेदने २४०० गुणांकनाचा टप्पा सहा महिन्यापूर्वीच पार केला होता.

सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी :

 • ओदिशाच्या चांदीपूर तळावर मंगळवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण दलातील सूत्रांनी ही माहिती दिली. चांदीपूरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्पलेक्स 3 मध्ये मोबाइल लाँचरवरुन जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणाऱ्या ब्रह्मोसच्या आवृत्तीची चाचणी घेण्यात आली.
 • तर या चाचणीने सर्व निकष पूर्ण केले आहेत असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) सांगण्यात आले.
 • ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. युद्धनौका, पाणबुडी, मोबाइल लाँचर आणि फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते.
 • ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो.
 • तसेच सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. 2020 पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.
 • ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.

स्त्री-पुरुष असमानतेच्या बाबतीत भारत 112 व्या क्रमांकावर आहे: WEFचा ‘जेंडर गॅप रीपोर्ट’

 • जागतिक आर्थिक मंच (WEF) या संस्थेनी ‘जेंडर गॅप रीपोर्ट’ प्रकाशित केला आहे. महिलांचे आरोग्य व अस्तित्व आणि आर्थिक सहभागाच्या संदर्भातली स्त्री-पुरुष असमानता याबाबतीत जगभरातल्या देशांचे मूल्यांकन करून त्यासंबंधी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासंबंधी एक यादी तयार करण्यात आली आहे.

अहवालातल्या ठळक बाबी

भारत

 • स्त्री-पुरुष असमानतेच्या बाबतीत यादीत भारत 112 व्या क्रमांकावर आहे. यावेळी असमानतेच्या बाबतीत भारताची चार स्थानांनी घसरन झाली आहे. दोन घटकांच्या बाबतीत भारत आता तळाशी पाचव्या स्थानी आहे.

भारताचा क्रमांक –

 1. राजकीय क्षेत्र – 18 वा
 2. आरोग्य आणि अस्तित्व –  150 वा
 3. आर्थिक सहभाग आणि संधी – 149 वा
 4. शैक्षणिक प्राप्ती – 112 वा

जागतिक:

 • आइसलँड हा स्त्री-पुरुष समानता राखण्याच्या बाबतीत जगातला सर्वात तटस्थ देश आहे.
 • यादीत पहिल्या दहामध्ये अनुक्रमे आइसलँड, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन, निकाराग्वा, न्युझीलँड, आयर्लंड, स्पेन, रवांडा आणि जर्मनी हे देश आहेत.
 • येमेन (153 वा) हा स्त्री-पुरुष असमानतेच्या बाबतीत सर्वात वाईट देश (तळाशी) आहे. त्यापूर्वी इराक (152 वा) आणि पाकिस्तान (151 वा) हे देश आहेत.
 • जागतिक पातळीवर, स्त्रियांकडे संसदेतल्या कनिष्ठ गृहाच्या 25.2 टक्के जागा आणि मंत्रीपदाच्या 21.2 टक्के जागा आहेत.
 • आर्थिक संधीची दरी आणखीनच खालावली असून ती गेल्या वर्षीच्या 202 वर्षांच्या तुलनेत यावर्षी 257 वर्षे झाली आहे. भारत (35.4 टक्के), पाकिस्तान (32.7 टक्के), येमेन (27.3 टक्के), सिरिया (24.9 टक्के) आणि इराक (22.7 टक्के) या देशांमध्ये महिलांसाठी आर्थिक संधी अत्यंत मर्यादित आहेत.
 • गेल्या वर्षीच्या 107 वर्षांच्या तुलनेत राजकीय लिंगभेदातली तफावत दूर होण्यास 65 वर्षे लागतील. वर्ष 2019 मध्ये ही असमानता 99.5 वर्षे लागतील.
 • कंपनीच्या संचालक मंडळावर महिलांचे प्रतिनिधित्व कमी असलेल्या देशांमध्ये  भारत (13.8 टक्के) देखील आहे, तर चीनमध्ये (9.7 टक्के) त्याहूनही वाईट स्थिती आहे.

पहिली जागतिक पाली परिषद पुण्यात

 • ‘सरहद’ संस्थेच्या वतीने २ ते ४ जानेवारी दरम्यान पुण्यामध्ये पहिली जागतिक पाकृत आणि पाली परिषद आयोजित करण्यात आली आहे.
 • यानिमित्ताने बौद्ध धम्मगुरू दलाई लामा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
 • २ जानेवारी रोजी दोन्ही मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
 • स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कायकर्ते गिरीश गांधी यांची निवड करण्यात आली आहे.
 • जैन आणि बौद्धांनी आपल्या ग्रंथलेखनासाठी व धर्मतत्त्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी याच भाषांचा उपयोग केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here