(चालू घडामोडी) Current Affairs | 18 January 2020

ब्राझील अंटार्क्टिकामध्ये नवीन संशोधन केंद्र उघडणार

 • ब्राझीलने घोषणा केली आहे की अंटार्क्टिकामध्ये ते नवीन संशोधन केंद्र उघडणार  आहेत. 8 वर्षांपूर्वी ब्राझीलचे तेथले कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशन नावाचे वैज्ञानिक संशोधन तळ नष्ट झाले होते; तिथेच नवे केंद्र उभारले जाणार आहे.
 • ब्राझीलच्या सरकारने कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशनाच्या स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी अंदाजे 100 दशलक्ष डॉलर एवढा वित्तपुरवठा केला जाणार आहे.
 • कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशन हे दक्षिण शेटलँड द्वीपसमूहातल्या सर्वात मोठ्या किंग जॉर्ज बेटावर होते. टे 48,500 चौ. फूट एवढ्या क्षेत्रात पसरलेले होते.
 • CEIEC ही चीनी सरकारी कंपनी हे नवीन केंद्र बांधणार आहे. नवीन केंद्रामध्ये 17 प्रयोगशाळा आणि 64 लोकांसाठी निवासस्थान असतील.

भारत सरकारचे ‘दुर्मिळ आजार विषयक राष्ट्रीय धोरण’

 • भारत सरकारने ‘दुर्मिळ आजार विषयक राष्ट्रीय धोरण’ तयार करीत आहे. 13 जानेवारीला त्याचा मसुदा जाहीर करण्यात आला, ज्यानुसार आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या रुग्णांना काही विशिष्ट दुर्मिळ आजारांसाठी एकदाच होणार्‍या उपचाराच्या खर्चाच्या 15 लक्ष रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार.
 • खर्चाचा हा निधी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय राष्ट्रीय आरोग्य निधी या छत्र योजनेच्या अंतर्गत प्रदान करणार.
 • या धोरणाच्या अंतर्गत 40 टक्के लोकसंख्येला लाभ देणारी आयुषमान भारत ही योजना देखील येणार आहे.
 • धोरणात समाविष्ट असलेल्या दुर्मिळ आजारांमध्ये हेमोफिलिया, थॅलेसीमिया, बालकांमधील प्रायमरी इम्युनोडिफिशियन्सी, सिकल सेल, एनेमिया, गौचर रोग, हीरशस्प्रंज रोग, हेमॅन्गिओमास आणि पोम्पे रोग यासारखे लाइसोसोमल स्टोरेज आजार आहेत.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात जलतरणात तीन सुवर्णपदके :

 • महाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेतून सोनेरी कामगिरी सलग आठव्या दिवशी सुरू ठेवली.
 • जलतरणात राज्याच्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकवले. त्याशिवाय वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले. अपेक्षेप्रमाणे खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या चारही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
 • महाराष्ट्राला जलतरणातून तीन सुवर्णपदकांची कमाई एका दिवशी करता आली. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मिहीर आम्ब्रेने 50 मीटर बटरफ्लाय आणि एरॉन फर्नाडिसने 200 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदके पटकवली.
 • मुलींमध्ये करिना शांताने 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य आणि कांस्यदेखील महाराष्ट्राच्या मुलींनाच मिळाली. अपेक्षा फर्नाडिसने रौप्य आणि झारा जब्बरने कांस्यपदक मिळवले. कियारा बंगेराने 200 मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक मिळवले.

भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं निधन :

 • भारताचे माजी क्रिकेपटू बापू नाडकर्णी यांचं मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.
 • त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे. रमेश गंगाराम नाडकर्णी असं त्यांचं नाव होतं. त्यांना बापू नाडकर्णी असं संबोधलं जाई.
 • 16 ते 21 डिसेंबर रोजी न्यूझीलंड विरोधात दिल्लीमध्ये जो कसोटी सामना झाला त्या सामन्यातून बापू नाडकर्णी यांनी क्रिकेटविश्वात पदार्पण केले. त्यांच्या गोलंदाजीच्या खास शैलीमुळे त्यांची क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण झाली होती.
 • कसोटीत सलग 21 षटकं निर्धाव (मेडन) टाकण्याचा विश्वविक्रम बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे. बापू नाडकर्णी हे डाव्या हाताने फिरकी गोलंदजी करत असत. इंग्लंडविरोधातल्या सामन्यात बापू नाडकर्णी यांनी 32 षटकं टाकली होती.
 • त्यापैकी 27 षटकं निर्धाव होती. 32 षटकांच्या त्यांनी अवघ्या पाच धावा दिल्या होत्या.

सामान्य ज्ञान

 • वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) – स्थापना: 1942 (26 सप्टेंबर); मुख्यालय: नवी दिल्ली.
 • संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) – स्थापनाः 1958; मुख्यालय: नवी दिल्ली.
 • जागतिक बँक – स्थापना: 1944; मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.
 • नॅशनल इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोग – स्थापना: 2015 (1 जानेवारी); मुख्यालय: नवी दिल्ली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here