(चालू घडामोडी) Current Affairs | 19 November 2019

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली :

 • दिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भारतीय संसदेच्या राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. या वर्षीचे हे अखेरचे सत्र आहे तसेच राज्यसभेचे 250 वे अधिवेशन आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.
 • अधिवेशनात सरकार बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारी देशांमधून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता अन्य धर्मीय (हिंदी, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन) स्थलांतरित लोकांना नागरिकत्व देणारे दुरुस्ती विधेयक मांडण्याचा विचार करीत आहे आणि हिवाळी अधिवेशनातच ते संमत केले जाण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टोक्ती दिली.
 • इलेक्टिक सिगरेटची आयात, उत्पादन, जाहिरात आणि वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली असून त्यासंदर्भातही विधेयक केलेला आहे. हे विधेयकही मंजूर करून घेण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे.
 • या हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. शिवसेना NDA युतीतून अधिकृतरीत्या बाहेर पडली आहे. महाराष्ट्र राज्यातला सत्ता संघर्ष चिघळल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे संबंध संपुष्टात आले आहेत. मुख्यमंत्री पदाचे आश्वासन भाजपने न पाळल्याने शिवसेनेने भाजपशी युती तोडत कॉंग्रेस आघाडीकडे संपर्क केला आहे. त्यामुळे सरकारकडून शिवसेनेची संसदेत विरोधी बाकावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

डॉ. रवी रंजन: झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

 • दिनांक 17 नोव्हेंबर 2019 रोजी न्यायमूर्ती डॉ. रवी रंजन ह्यांनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मी ह्यांनी राजभवनात एका सोहळ्यात त्यांना पदाची शपथ दिली.
 • न्यायमूर्ती डॉ. रवी रंजन झारखंड उच्च न्यायालयाचे 13 वे मुख्य न्यायाधीश ठरले आहेत. माजी मुख्य न्यायाधीश अनिरुद्ध बोस ह्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्यावर हे पद मे 2019 या महिन्यापासून रिक्त होते.

एअर इंडिया, भारत पेट्रोलिअम चार महिन्यांत विकणार :

 • कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
 • भारत पेट्रोलिअम कॉर्पोरशन लिमिटेडने (बीपीसीएल) सचिवांच्या एका गटाने ऑक्टोबरमध्ये सरकारची पूर्ण 53.29 टक्के हिस्सा विक्रीसाठी सहमती व्यक्त केली होती. बीपीसीएलचा बाजार भांडवल सुमारे 1.02 लाख कोटी रुपये आहे. तर याची 53 टक्के हिश्याच्या विक्रीसह 65000 कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध होईल अशी सरकारला आशा आहे.

अमेरिकेकडून भारताला मिळणार फायटर ड्रोन विमाने

 • भारताला अमेरिकेकडून सी गार्डीयन आर्म्ड ड्रोन्स, पाणबुडीविरोधी पी-८आय आणि टेहळणी विमाने मिळणार आहेत. भारत आणि अमेरिकेमध्ये लष्करीसंबंध बळकट होत असून भारत लवकरच अमेरिकेबरोबर नवीन संरक्षण करार करार करणार आहे. या करारातंर्गत भारताला अमेरिकेकडून सी गार्डीयन आर्म्ड ड्रोन्स, पाणबुडीविरोधी पी-८आय आणि टेहळणी विमाने मिळणार आहेत. हा संपूर्ण करार ७ अब्ज डॉलर्सचा आहे.
 • “अमेरिकेकडून मिळणाऱ्या सी गार्डीयन आर्म्ड ड्रोन्समध्ये भारतीय नौदल, एअर फोर्स आणि लष्कराला आपल्या गरजेनुसार काही बदल करुन हवे आहेत. त्यासाठी त्यांची चर्चा सुरु आहे” अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही देशांच्या सरकारादरम्यान हा करार होणार आहे.
 • ट्रम्प प्रशासनाने यावर्षी जून महिन्यात भारताला मिसाइल आणि अन्य शस्त्रांसह आर्म्ड ड्रोन्स विकण्यास मंजुरी दिली. तिन्ही सशस्त्र दलांमध्ये आधी फक्त नौदलाला खरेदीमध्ये इच्छा आहे असे वाटत होते. पण आता तिन्ही सैन्य दलांनी खरेदीची इच्छा प्रगट केली आहे असे सूत्रांनी सांगितले.

थिएमला नमवून त्सित्सिपास अजिंक्य :

 • ग्रीकच्या स्टेफानोस त्सिसिपासने अंतिम फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमला पराभूत करून एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
 • ग्रीकच्या २१ वर्षीय त्सित्सिपासने रविवारी अंतिम फेरीत थिएमला ६-७ (६/८), ६-२, ७-६ (७-४) असा पराभव करून ही स्पर्धा सर्वात कमी वयात जिंकण्याचा बहुमान मिळवला. याअगोदर २००१ मध्ये लेटॉन हेविटने हा पराक्रम केला होता.
 • त्सित्सिपासने यंदाच्या मोसमातील हे तिसरे विजेतेपद पटकावले आहे. त्सित्सिपासने सहा वेळचा विजेता रॉजर फेडररला उपांत्य सामन्यात सरळ फेरीत पराभूत केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here