(चालू घडामोडी) Current Affairs | 22 December 2019

‘तिरुवनंतपुरम-कासारगोड सेमी हायस्पीड रेल कॉरिडोर’ याच्या निर्मितीला केंद्राची परवानगी

 • ‘तिरुवनंतपुरम-कासारगोड सेमी हायस्पीड रेल (SHSR) कॉरिडोर’ या प्रकल्पाच्या बांधकामाला केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे.
 • केरळ सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. केंद्र आणि राज्य दोघेही या प्रकल्पाला वित्तपुरवठा करणार आहे.
 • ठळक बाबी: हा लोहमार्ग केरळ राज्यातल्या 14 पैकी 11 जिल्ह्यांमधून जाणार. या लोहमार्गामुळे तिरुवनंतपुरम ते कासारगोड पर्यंतचा प्रवास आताच्या 12 तासांच्या तुलनेत केवळ 4 तासांमध्ये पूर्ण केला जाऊ शकणार.
 • तिरुवनंतपुरम ते कासारगोड पर्यंतचा लोहमार्ग दु-मार्गी 540 किलोमीटर लांबीचा असणार.
 • केरळ रेल विकास महामंडळ (KRDCL) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. प्रकल्पासाठी सुमारे 66 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
 • सेमी हायस्पीड रेल (SHSR) हे एक अत्याधुनिक रेलगाडी-तंत्रज्ञान आहे. साधारण गाड्यांच्या तुलनेत याची गती अधिक असते. ही गाडी ताशी 200 किलोमीटर या गतीने धावते.

कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धात जेरेमीचे विक्रमासह रौप्य :

 • युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिनुंगाने विक्रमी कामगिरीची नोंद करताना कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले.
 • 17 वर्षीय जेरेमीने एकूण 306 किलो वजन उचलून स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनांचे वैयक्तिक युवा आशियाई विक्रम मोडीत काढले.
 • जेरेमीच्या खात्यावर 12 आंतरराष्ट्रीय आणि 15 राष्ट्रीय विक्रम नावावर आहेत.
 • आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा जेरेमी 62 किलो वजनी गटातून 67 किलोमध्ये समाविष्ट झाल्यापासून त्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा होत आहे.

‘मिशन शक्ती’, भारताने जगाला दाखवून दिली आपली ताकद

 • क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या दृष्टीने यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं. या दोन्ही क्षेत्रात भारताने महत्वपूर्ण यश मिळवलं. चांद्रयान-२ मध्ये विक्रम लँडरचा अपवाद वगळता ही मोहिम यशस्वी ठरली.
 • मिशन शक्ती’मुळे भारत मोजक्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळवणारा चौथा देश ठरला. यापूर्वी असे तंत्रज्ञान अमेरिका, रशिया आणि चीनने विकसित केलं आहे.
 • बालकोट एअर स्ट्राइकनंतर बरोबर एक महिन्याने २७ मार्च २०१९ रोजी भारताने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावरुन उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारताने ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये भ्रमण करणारा आपला उपग्रह A-Sat क्षेपणास्त्राद्वारे पाडला. पृथ्वीपासून २ हजार किलोमीटरपर्यंतची कक्षा ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये येते. अवकाशात पृथ्वीपासून ३०० किलोमीटरच्या कक्षेत भ्रमण करणारा आपलाच उपग्रह भारताने क्षेपणास्त्राद्वारे पाडला. डीआरडीओच्या नेृत्वाखाली ही संपूर्ण मोहिम पार पडली.
 • अमेरिकेने कधी केली चाचणी: १९८५ साली अमेरिकन हवाई दलाने एफ-१५ विमानातून A-Sat क्षेपणास्त्र डागून P78-1 हा संशोधन उपग्रह पाडला होता. पृथ्वीपासून हा उपग्रह ५५५ किलोमीटर अंतरावर होता. २००७ साली चीनने आपणही या तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचे जगाला दाखवून दिले. चीनने SC-19 A-SAT क्षेपणास्त्राने निरुपयोगी बनलेला FY-1C उपग्रह पाडला.

अफगाणिस्तानने ‘इंडियन फार्माकोपीया’ (IP) पुस्तकाला मान्यता दिली

 • अफगाणिस्तान इस्लामिक प्रजासत्ताक या देशाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला मान्यता दिली असून या पुस्तकाला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.
 • देशाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय औषधी व आरोग्य उत्पादने नियमन विभागाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला औपचारिक मान्यता दिली.
 • ‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक: इंडियन फार्माकोपीया भारताच्या ‘औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा-1940’ अन्वये असलेल्या मानकांचे अधिकृत असे मान्यताप्राप्त पुस्तक आहे.
 • हे पुस्तक औषधांची ओळख, शुद्धता आणि क्षमता यांच्या बाबतीत भारतामध्ये उत्पादित आणि विक्री केली जाणार्‍या औषधांची मानके निर्दिष्ट करते.
 • औषधांची गुणवत्ता, क्षमता आणि सुरक्षितता राखण्याच्या उद्देशाने भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) औषधी निर्मितीसाठी कायदेशीर व वैज्ञानिक मानके तयार करते आणि त्याची लिखित स्वरुपात नोंद करते.
 • दरवर्षाच्या अखेरीस ‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक प्रकाशित केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here