(चालू घडामोडी) Current Affairs | 23 January 2020

‘गगनयान’च्या पूर्वतयारीसाठी डिसेंबरमध्ये निर्मनुष्य अवकाश मोहीम :

 • भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेची पूर्वतयारी म्हणून या वर्षी डिसेंबरमध्ये पहिली निर्मनुष्य अवकाश मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून 2021 मध्ये होणार आहे. तर त्यानंतर 2021 मध्ये भारताचे अवकाशवीर गगनयानातून अवकाशात पाठवले जातील, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली.
 • तसेच गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे. त्यात डिसेंबर 2020 व जून 2021 मध्ये निर्मनुष्य म्हणजे मानवरहित अवकाश मोहिमा होतील. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये भारताचे अवकाशवीर अंतराळात जातील.
 • अवकाशात भारतीयांचे अस्तित्व या मोहिमातून सिद्ध होणार आहे. मानवी अवकाश कार्यक्रमाची ही भारतासाठी नवी सुरुवात आहे. गगनयान मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून निवड झालेल्या भारतीय अवकाशवीरांना बेंगळुरू येथील केंद्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • भारताच्या अवकाशवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी व्योममित्र (अवकाशमित्र) नावाच्या स्त्री अर्धयंत्रमानवास (याला पाय नसतात) गगनयानातून पाठवले जाणार आहे. पहिला अवकाशवीर युरी गागारिन याला रशियाने अवकाशात पाठवले त्याआधी इव्हान इव्हानोविच हा यंत्रमानव त्यावेळीही चाचणीसाठी पाठवण्यात आला होता.
 • तर हा स्त्री यंत्रमानव बुधवारी मानवी अवकाश मोहिमांवरील परिसंवादात सादर करण्यात आला. व्योम याचा अर्थ अवकाश असा असल्याने व्योममित्रचा अर्थ अवकाश मित्र असा आहे. तसेच या यंत्रमानव महिलेने तिचा परिचय उपस्थितांना करून देताना सांगितले की, मी व्योममित्र, यंत्रमानव, गगनयानच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेत मी अवकाश प्रवास करणार आहे.

महाराष्ट्राच्या अथर्व आणि देवेशला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’:

 • कला व संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी अथर्व लोहार, तर गणितातील सृजनात्मक कार्यासाठी देवेश भैय्या या महाराष्ट्रातील दोन बालकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर पदक, एक लाख रुपये, व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • सातारा जिल्ह्यातील फलटणच्या व सध्या अंबरनाथमध्ये राहणाऱ्या 11 वर्षांच्या अथर्वला बाल तबलावादक म्हणून कला व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार दिला. थायलंडच्या तबलावादन स्पर्धेत अथर्वने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
 • तसेच गणितज्ज्ञ देवेश भैय्या या 13 वर्षांच्या बालकाने गणितात योगदान दिले आहे. देवेश जळगावमधील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे.
 • मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनच्या होमी भाभा ज्युनियर सायन्टिस्ट परीक्षेत आणि साऊथईस्ट एशियन मॅथेमॅटिकल आॅलिम्पियाडमधे सादर केलेल्या शोध प्रबंधासाठी देवेशला सुवर्ण पदक मिळाले आहे. इग्नायटेड माइंडलॅब परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळविणारा देवेश हा पहिला भारतीय बनला आहे.

जागतिक लोकशाही सूचीमधील भारताचे स्थान घसरले – इआययूचा अहवाल

 • जागतिक लोकशाही सूचीमधील क्रमवारीत भारताची १० अंकांनी घसरण झाल्याचा एक अहवाल नुकताच सादर करण्यात आलाय. २०१९ या वर्षासाठी ही यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १६७ देशांचा समावेश आहे. ब्रिटन स्थित द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिक वृत्तपत्राच्या‘इंटेलिजन्स युनिट’द्वारे सादर करण्यात आलेल्या या अहवालामध्ये भारतातील नागरी स्वातंत्र्यात घट’झाल्याने भारताची क्रमवारी घसरल्याचं म्हंटलं आहे.
 • द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट ही जगभरातील अनेक देशांमधील राजकीय व आर्थिक परिस्थितीच्या संशोधन व विश्लेषणाद्वारे अहवाल सादर करणारी संस्था आहे. या संस्थेद्वारे सादर करण्यात आलेला जागतिक लोकशाही सूची अहवाल हा त्या देशातील निवडणूक प्रक्रिया, वैविध्य, सरकारचे कामकाज, राजकीय सहभाग, राजकीय संस्कृती, आणि नागरी स्वातंत्र्य या मुद्द्यांच्या आधारे तयार केला जातो.
 • दरम्यान, २०१८ या वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या जागतिक लोकशाही सूचीमध्ये भारत ७.२३ गुणांसह ४१व्या स्थानी होता. मात्र २०१९ या वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अहवालात भारताला ६.९० गुण मिळाल्याने भारताची ५१व्या स्थानावर घसरण झाली.
 • जागतिक लोकशाही सूची अहवालामध्ये दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताचे स्थान अव्व्ल असून श्रीलंका (६९) बांगलादेश (८०), पाकिस्तान (१०८) तर चीन (१५३) व्या स्थानावर आहेत

प्रत्यक्ष कर संकलनात 5.2 टक्के घट

 • 15 जानेवारी 2020 या तारखेपर्यंत झालेले प्रत्यक्ष कर संकलन 7.3 लक्ष कोटी रुपये होते, जे की गेल्या वर्षाच्या तुलनेत 5.2 टक्क्यांनी कमी आहे.
 • ठळक बाबी: याच कालावधीत वैयक्तिक आयकर संकलनात 6.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जे की अर्थसंकल्पात 23.3 टक्के एवढे अंदाजित केले गेले होते.
 • कॉर्पोरेट कर दर नियमित कंपन्यांकरिता पूर्वीच्या 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, तर नवीन उद्योगांसाठी हा दर 25 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
 • भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 5 टक्के एवढा अपेक्षित असल्याने, मंदावणार्‍या अर्थव्यवस्थेचा परिणाम देखील संकलणावर होणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here