(चालू घडामोडी) Current Affairs | 24 December 2019

हर्षवर्धन श्रिंगला भारताचे नवे परराष्ट्र सचिव

 • भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रिंगला देशाचे नवे परराष्ट्र सचिव होणार आहेत. पुढील वर्षी २९ जानेवारी रोजी सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून ते पदभार स्विकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला आहे.
 • हर्षवर्धन श्रिंगला हे १९८४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. आपल्या ३५ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्याशिवाय हर्षवर्धन यांनी बांगलादेश व थायलंड या देशांमध्ये उच्चायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
 • त्याशिवाय व्हिएतनाम, इस्राएल आणि दक्षिण आफ्रिका या देशातही त्यांनी भारताच्यावतीने महत्त्वाची पदांवरील जबाबदारी पार पाडली. सध्या हर्षवर्धन श्रिंगला हे अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.

फोर्ब्स इंडियाच्या यादीत मराठमोळ्या जोडीचा समावेश :

 • फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रीटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे. तर या यादीत अजय-अतुलची जोडी 22 व्या क्रमांकावर असून या जोडीची वार्षिक कमाई 77.91 कोटी आहे. फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रीटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे.
 • पण पहिल्यांदाच या यादीत एका मराठमोळ्या संगीतकाराच्या जोडीची वर्णी लावली आहे. हे संगीतकार दुसरे कोणीही नसून मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल आहेत. या यादीत ही जोडी 22 व्या क्रमांकावर असून या जोडीची वार्षिक कमाई 77.91 कोटी आहे.
 • फोर्ब्स इंडियाच्या यादीत पहिल्या स्थानावर भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीची वार्षिक कमाई 252.72 कोटी आहे. तर दुसऱ्या स्थानावर अभिनेता अक्षय कुमारने स्थान मिळवले आहे. अक्षयची वार्षिक कमाई 293.25 कोटी रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान आहे. सलमानची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.

क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 • जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्विक रिअॅक्शन क्षेपणास्त्राची (क्यूआरएसएएम) सोमवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळून यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या निर्मितीदरम्यानच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून २०२१पर्यंत हे क्षेपणास्त्र सशस्त्र दलांमध्ये दाखल होणार आहे.
 • डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेले हे क्षेपणास्त्र ओडिशातील बालासोरजवळील चंडिपूर येथे असलेल्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरून सोमवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी डागण्यात आले.
 • या क्षेपणास्त्राने हवेतच लक्ष्याचा वेध घेतला आणि चाचणीचे उद्दिष्ट पूर्ण केले. या संपूर्ण चाचणीवर ग्राउंड टेलिमेट्री सिस्टिम, रेंज रडार सिस्टिम आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टिम यांच्याआधारे देखरेख ठेवण्यात आली.

कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धात राष्ट्रीय विक्रमांसह राखीला कांस्यपदक :

 • भारताची वेटलिफ्टिंगपटू राखी हॅल्डरने कतार आंतरराष्ट्रीय चषक वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या 64 किलो गटात कांस्यपदक मिळवताना दोन राष्ट्रीय विक्रम नोंदवले.
 • राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राखीने राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील स्नॅच आणि एकूण वजन उचलण्याचे दोन विक्रम मोडीत काढले. तर तिने एकूण 218 किलो वजन उचलले.
 • भारताने या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत एकूण तीन पदकांची कमाई केली. माजी विश्वविजेत्या मिराबाई चानूने सुवर्णपदक मिळवले, तर जेरेमी लालरिनुंगाने रौप्यपदक पटकावले.
 • 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने या स्पर्धेतील गुण महत्त्वाचे ठरणार आहे.

अमेरीका आणि चीन यांच्यात लवकरच पहिल्या टप्प्यासाठी व्यापार करार

 • अमेरिका आणि चीन लवकरच पहिल्या टप्प्यासाठीच्या व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबत झालेल्या चर्चेअंती अनेक मुद्‌द्‌यांवर एकमत झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये बराच काळ चाललेले व्यापारयुध्द संपवण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांकडून प्रयत्न झाले. त्यानंतर याच महिन्यात पहिल्या टप्प्यासाठीच्या व्यापार करारावर सहमती झाल्याची घोषणा करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
 • दरम्यान अमेरिकेने “स्पेस फोर्स’ नावाच्या नव्या सैन्यदलाची घोषणा केल्यानंतर अमेरिका ब्रह्मांडाचे रुपांतर रणांगणात करत असल्याची टीका चीनने केली आहे. अमेरिकेच्या या आगामी वाटचालीबाबत चीनने अमेरिकेला इशाराही दिला आहे.
 • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी 2020 च्या राष्ट्रीय संरक्षण कायद्यावर स्वाक्षरी केली. यानुसार अंतराळ ही अमेरिकेच्या सैन्याची नवीन शाखा असणार आहे. याविरोधात चीनबरोबरच रशियानेही चिंता व्यक्‍त केली आहे.

त्रिपुरा राज्याला पहिले विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) मिळाले

 • कृषी-पूरक उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने त्रिपुरा राज्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) तयार करण्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. ते राज्यातले पहिलेच विशेष आर्थिक क्षेत्र असेल.
 • त्रिपुरा राज्यामधले प्रस्तावित विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) पश्चिम जलेफा (सबरूम, दक्षिण त्रिपुरा जिल्हा) येथे स्थापन केले जाणार. हे ठिकाण राजधानी आगरतळा या शहरापासून 130 कि.मी. अंतरावर आहे.
 • ठळक बाबी: प्रकल्पातली अंदाजे गुंतवणूक सुमारे 1550 कोटी असणार आहे. या क्षेत्राच्या विकासामुळे 12,000 कुशल रोजगार तयार होण्याचा अंदाज आहे.
 • या क्षेत्राचा विकास त्रिपुरा औद्योगिक विकास महामंडळ (TIDC) करणार आहे.
 • या क्षेत्रात अन्नप्रक्रियेसाठीचे उद्योग उभारले जातील. अन्नप्रक्रियेसोबतच रबर उद्योग, वस्त्रोद्योग, बांबू उद्योगांची या क्षेत्रात भर असेल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here