(चालू घडामोडी) Current Affairs | 24 January 2020

कलक्कडू-मुंडनथुरै व्याघ्र अभयारण्यात वन्यप्राण्यांची वार्षिक गणना होत आहे

 • तामिळनाडू राज्यात असलेल्या ‘कलक्कडू-मुंडनथुरै व्याघ्र अभयारण्य’ येथे वन्यप्राण्यांची वार्षिक गणना केली जात आहे. 22 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीत ही गणना केली जात आहे.
 • वन्यप्राण्यांची गणना हे देशातल्या मौल्यवान चल संपत्तीचे संरक्षण करण्यासाठीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण साधन आहे.
 • ‘वन्यजीवन संख्या यांची स्थिती’ यासंदर्भातल्या केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा समावेश केला जाणार आहे.
 • ठळक बाबी: अभयारण्याच्या संपूर्ण 60 हजार हेक्टर क्षेत्रफळामध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार असून हे काम दोन टप्प्यात होणार आहे.
 • सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात वाघ, लांडगा इत्यादी मांसाहारी प्राणी तर द्वितीय टप्प्यात हत्ती, हरिण इत्यादी शाकाहारी प्राण्यांची गणना करण्यात येणार.
 • या कार्यक्रमात वन अधिकारी, वन्यपशू तज्ज्ञ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने तीनशेहून अधिक कर्मचारी सहभागी आहेत.
 • वन पर्यावरणाची स्थिती आणि त्यामुळे वन्य प्राण्यांच्या वास्तव्यावर होणार्‍या परिणामांचीही या पाहणीत नोंद घेतली जाणार आहे. सर्वेक्षण करताना मानव-प्राणी संघर्षाची शक्यता देखील ओळखली जाणार आणि अश्या घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले सुचविली जाणार आहे.

अमेरिकेत येणाऱ्या गर्भवती महिलांना आता व्हिसा नाही :

 • अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना आता अमेरिकेचा व्हिसा देण्यात येणार नाही. ट्रम्प प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
 • तर अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना टेंपररी व्हिजिटर (बी1-बी2) व्हिजा येणार नाही. अमेरिकेतील ‘बर्थ टूरिझम’ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तसेच नव्या नियमांचा संबंध आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशीही आहे. तसंच ‘बर्थ टूरिझम’द्वारे होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करणंदेखील यात समाविष्ट असल्याचं ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं.
 • नव्या नियमांनुसार गर्भवती महिलांना प्रवासी व्हिसावर अमेरिकेत प्रवास करणं कठीण होणार आहे. गर्भवती महिलांना अमेरिकेत जायचं असल्यास त्यांना अमेरिकेत जाण्याचं कारण काऊन्सिलर अधिकाऱ्याला पटवून द्यावं लागणार आहे.

कंपन्यांच्या ‘सीएसआर’ खर्चात १८ टक्के वाढ

 • राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये सामाजिक दायीत्व उपक्रम अर्थात ‘सीएसआर’वर ११,९६१ कोटी रुपये खर्च केले, जे आधीच्या वर्षांच्या तुलनेत १८ टक्के अधिक होते. २०१७-१८ मध्ये याच कंपन्यांनी १०,१७९ कोटी रुपये खर्च केले होते. उल्लेखनीय म्हणजे या रकमेपैकी ४,४४० कोटी रुपये हे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर कंपन्यांकडून खर्च करण्यात आले आहेत.
 • एनएसई आणि प्राइम डेटाबेस यांनी संयुक्तपणे स्थापित केलेल्या ‘एनएसई इन्फोबेस डॉट कॉम’ या कंपनीने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, एनएसईवर सूचिबद्ध कंपन्यांकडून मागील पाच वर्षांत, सामाजिक उपक्रमांवरील खर्चात वार्षिक सरासरी १७ टक्के दराने दमदार वाढ होत आली आहे.
 • विविध सामाजिक उपक्रमांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या अव्वल १० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, इंडियन ऑइल, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, इन्फोसिस, टाटा स्टील, आयटीसी, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. या १० कंपन्यांचा एकूण खर्चात ३६ टक्के वाटा असल्याचे ‘एनएसई इन्फोबेस’चा अहवाल सांगतो.

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धात थीम, वॉवरिका यांचे विजय :

 • ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम आणि स्वित्र्झलडचा स्टॅनिस्लास वॉवरिंका यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत संघर्षपूर्ण विजयाची नोंद करून पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली.
 • तर त्याशिवाय राफेल नदाल, अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह, सिमोना हॅलेप आणि अँजेलिक कर्बर यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर सहज मात करून विजयी घोडदौड कायम राखली.
 • मेलबर्न एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित थीमने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स बोल्टला 6-2, 5-7, 6-7 (5-7), 6-1, 6-2 असे पराभूत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here