(चालू घडामोडी) Current Affairs | 24 November 2019

दिविना मलौम आणि ग्रेटा थुनबर्ग यांना ‘आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक 2019’ मिळाला

 • कॅमरून देशाची 15 वर्षांची दिविना मलौम आणि स्वीडनची 16 वर्षांची ग्रेटा थुनबर्ग यांना यावर्षीचा ‘आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक’ जाहीर झाला आहे.
 • 20 नोव्हेंबर 2019 रोजी जगातील बाल दिनाच्या निमित्ताने हेग (नेदरलँड्स) येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात या पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
 • विजेत्यांविषयी: 2014 साली दिविना मलौमने ‘चिल्ड्रेन फॉर पीस’ नावाची संस्था उघडली. बाल हक्कासाठी झटणारी दिविना मलौम हिने देशातल्या शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांना बोको हरामसारख्या दहशतवादी गटांमध्ये सहभागी होऊ नये असा संदेश दिला तसेच मुलांच्या त्यांच्या हक्कांविषयी जागृती देखील केली.
 • स्वीडनची पर्यावरणवादी ग्रेटा थुनबर्ग हिने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी केलेल्या क्रांतीसाठी तिला हा पुरस्कार दिला गेला आहे.

जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह (डब्ल्यूएएडब्ल्यू) 2019

 • जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह (डब्ल्यूएएडब्ल्यू) यावर्षी 18-24 नोव्हेंबर 2019 पर्यंत साजरा केला जाईल. हे संयुक्त राष्ट्राच्या सर्वात महत्वाच्या जागतिक घटनांपैकी एक आहे ज्यात अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर) चा समावेश जागतिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे.
 • यावर्षी, वर्ल्डअन्टीबायोटिक ए जागरूकता सप्ताह # एएमआर संबोधित करण्याच्या जागतिक प्रयत्नांविषयी जागरूकता वाढवित आहे.
 • आशिया आणि पॅसिफिकमध्ये, 2019WAAW सुधारित जागरूकता आणि एएमआर जोखीम समजून घेण्यासाठी, देखरेख आणि संशोधन, चांगल्या पद्धती आणि अन्न आणि शेतीद्वारे पुराव्यावर आधारीत एएमआर-शमन रणनीती मजबूत करणे  मध्ये प्रतिजैविकांच्या न्याय्य वापरास प्रोत्साहित करण्यासाठी.

कॅनडा मंत्रिमंडळात चार जण भारतीय वंशाचे

 • कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या ३७ जणांच्या मंत्रिमंडळात चार भारतीय वंशाच्या उमेदवारांचा समावेश झाला आहे. ट्रुडो यांनी गुरुवारी आपल्या कॅबिनेटमधील सात नव्या चेहऱ्यांचा परिचय करून दिला. त्यामध्ये अनिता आनंद (५०), नवदीप बेन्स (४२), बार्दिश चागर (३९) आणि हरजित सज्जन (४९) या चौघांचा समावेश आहे.
 • भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची पहिल्यांदाच वर्णी लागली आहे. आनंद या टोरोन्टो विद्यापीठात कायदा विषयाच्या माजी प्राध्यापिका होत्या. त्या ऑन्टॉरिओ येथील ओकव्हिलचे प्रतिनिधित्व करतात. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या फेडरल निवडणुकीत पहिल्यांदाच ३३८ जागांच्या हाउस ऑफ कॉमन्समधील सदस्यांमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे. ‘सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्री’ म्हणून आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • लिबरल पक्षाच्या ४७ वर्षीय ट्रुडो यांनी बुधवारी ओट्टावा येथील रिड्यूओ येथील हॉलमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवराला ‘रामसर’ चा दर्जा मिळणार

 • नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर व बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला लवकरच ‘रामसर’चा दर्जा मिळणार असल्याचे संकेत येथे सुरू असलेल्या पाणथळ आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मिळाले.
 • बॉम्बे नॅचरल सोसायटी (बीएनएचएस)ने ही परिषद आयोजित केली आहे. नवेगाव बांध, माहुल (शिवडी खाडी), हतनूर धरण, ठाणे खाडी, नांदूर मधमेश्वर, लोणारसह जायकवाडी धरण परिसराला ‘रामसर’चा दर्जा मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता.
 • नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या 265 प्रजातींची नोंद झाली आहे. रामसरमध्ये आढळणाऱ्या 148 स्थलांतरित पक्ष्यांपैकी 88 प्रजाती नांदूर मधमेश्वरमध्ये आढळतात. या अभयारण्यात एकूण 5 हजार 687 पक्षी आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here