(चालू घडामोडी) Current Affairs | 25 December 2019

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धात मनूला दुहेरी सुवर्णपदके :

 • मनू भाकरने राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली.
 • तर 17 वर्षीय मनूने वरिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत 243 गुण मिळवले, तर कनिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत 241 गुण मिळवले. युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मनूने पात्रता फेरीत 588 गुण मिळवले.
 • वरिष्ठ गटात देवांशी धामाने रौप्य आणि यशस्वी सिंग देशवालने कांस्यपदक पटकावले. मनू आणि यशस्वी यांनी 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील स्थाने आधीच पक्की केली आहेत.

संरक्षणप्रमुख पदाला मंत्रिमंडळाची मंजुरी

 • तीनही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी संरक्षण प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) हे नवे पद निर्माण करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. संरक्षणविषयक मंत्रीगटाने हा प्रस्ताव सादर केला होता. संरक्षण प्रमुख हे सरकारचे प्रमुख संरक्षण सल्लागारही असतील.
 • १९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर संरक्षण दलांच्या फेरआढावा समितीने संरक्षण प्रमुख या पदाची निर्मिती करण्याची शिफारस केली होती. संरक्षण प्रमुख ही चार तारे असलेल्या जनरलच्या बरोबरीची श्रेणी असेल.
 • लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांमध्ये समन्वय साधणे, संरक्षण मंत्रालयाला गरजेनुसार सल्ला देणे, संरक्षणविषयक वित्तीय मुद्दय़ावर सल्ला देणे ही कामे त्यांना करावी लागतील. तीन दलांच्या संयुक्त कारवाईचा निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांना असेल.

QataInternationalCup : भारतीय वेटलिफ्टर राखीने पटकावले कांस्यपदक

 • भारतीय महिला वेटलिफ्टर राखी हाल्देरने कतार इंटरनॅशनल कप स्पर्धेमध्ये ६४ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. यासह तिने दोन नवे राष्ट्रीय विक्रमही नोदंवले आहेत.
 • राखीने स्नॅचमध्ये ९५ किलो आणि क्लिन अँड जर्कमध्ये १२३ किलो असे एकूण २१८ वजन उचलून नवे राष्ट्रीय विक्रम नोंदवले. यापूर्वी तिने जून महिन्यात राष्ट्रकूल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिने स्नॅच आणि क्लिन अँड जर्क असे ( ९४ किलो + १२० किलो) एकूण २१४ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले होते.

संगिता रेड्डी: FICCI संस्थेचे नवे अध्यक्ष

 • अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असलेल्या संगिता रेड्डी ह्यांनी FICCI या संस्थेची अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
 • ठळक बाबी: संगिता रेड्डी सन 2019-20 या वर्षासाठी हे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. त्यांनी HSIL कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप सोमनी ह्यांच्याकडून पदभार घेतला.
 • वॉल्ट डिस्नेच्या APAC कंपनीचे भारतातले अध्यक्ष आणि स्टार अँड डिस्ने इंडियाचे अध्यक्ष उदय शंकर यांना संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून पदोन्नती दिली गेली आहे.
 • HUL कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता ह्यांनी संस्थेच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

आयसीसी जागतिक क्रिकेट क्रमवारी जाहीर :

 • भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय प्रकाराप्रमाणेच कसोटीतही ‘आयसीसी’ जागतिक फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. मात्र कसोटीचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची एका स्थानाने घसरण झाली आहे.
 • कोहलीच्या खात्यात सर्वाधिक 928 गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील स्टीव्ह स्मिथपेक्षा (911) तो 17 गुणांनी पुढे आहे.
 • त्यामुळे वर्षांखेरीसपर्यंत तरी कोहलीच्या अग्रस्थानाला कोणताही धोका नाही. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन (864) आणि भारताचा चेतेश्वर पुजारा (791) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहे. युवा मार्नस लबूशेन (786) पाचव्या स्थानावर आहे.
 • तसेच पाकिस्तानच्या बाबर आझमने (767) श्रीलंकेविरुद्ध झळकावलेल्या सलग दोन शतकांमुळे सहावा क्रमांक पटकावला असून रहाणे 759 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here