(चालू घडामोडी) Current Affairs | 25 November 2019

लेफ्टनंट शिवांगी: भारतीय नौदलातली पहिली महिला वैमानिक

 • 4 डिसेंबर या नौदल दिनाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार आहेत. त्यासोबतच, त्या भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार्‍या पहिल्या महिला वैमानिक ठरणार.
 • शिवांगी या मुळच्या बिहारमधील मुझफ्फरपूरच्या आहेत. भारतीय नौदलाकडून घेण्यात आलेल्या 27 NOC अभ्यासक्रमामध्ये त्यांनी एझिमाला इथल्या नौदल अकादमीत प्रशिक्षण घेतले. ज्यानंतर 2018 साली जून महिन्यात वाईस अॅडमिरल ए. के. चावला यांच्याकडून त्यांना नौदलात सामावून घेण्यात आले.
 • सध्या भारतीय नौदलाच्या साऊथर्न नेव्हल कमांड येथे प्रशिक्षणार्थी म्हणून शिवांगी कार्यरत आहेत. त्यांना 2 डिसेंबर 2019 रोजी सागरीक्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘डॉर्नियर’ विमानाच्या उड्डाणाची अधिकृत परवानगी मिळणार.
 • भारतीय नौदलातल्या एव्हिएशन विभागात हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) विभागात अधिकाऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश असतो. ‘ऑब्जर्व्हर’ म्हणून रुजू असणाऱ्या या महिला अधिकारी या काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी जबाबदार असतात.

किपचोगे, मुहम्मद जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटू :

 • दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा पहिला धावपटू ईलूड किपचोगे आणि 400 मीटर अडथळा शर्यतीमधील विश्वविजेती डॅलिया मुहम्मद यांना जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 • जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेतर्फे मोनॅको येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात 35 वर्षीय किपचोगेला सन्मानित करण्यात आले. त्याने गेल्या महिन्यात 42.195 किलोमीटरचे मॅरेथॉन शर्यतीचे अंतर एक तास 59 मिनिटे आणि 40.2 सेकंदांत पूर्ण करून इतिहास घडवला.
 • अमेरिकेच्या डॅलियानेही जुलै महिन्यात लोवा येथे अमेरिकन चाचणी शर्यतीत 52.2 सेकंदांचा विश्वविक्रम नोंदवला. मग दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने 52.16 सेकंदांचा नव्या विश्वविक्रम साकारला.

माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे निधन

 • मध्य प्रदेशचे पहिले काँग्रेसेतर मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश जोशी (९१) यांचे रविवारी निधन झाले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाचे ते मुख्यमंत्री होते.

नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) – ‘भारतनेट’ प्रकल्प

 • मार्च 2020 पर्यंत दोन लक्ष ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 1 लक्ष 28 हजार ग्रामपंचायती या सेवांनी सज्ज आहेत.
 • ठळक बाबी: आतापर्यंत 45,000 ग्रामपंचायतींमध्ये वाय-फाय हॉटस्पॉट प्रस्थापित करण्यात आले आहेत.
 • सध्या, 16 हजार पंचायतींना सेवा पुरविली जात आहे.
 • प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2017 मध्ये पूर्ण झाला ज्याने एक लक्ष ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड जोडणी दिली गेली. द्वितीय टप्प्यात उर्वरित ग्रामपंचायती जोडण्यात येत आहेत.
 • प्रकल्पाविषयी: नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) – ‘भारतनेट’ या प्रकल्पाच्या माध्यमातून देशातल्या सर्व 2 लक्ष 50 हजार ग्रामपंचायतींना जोडले जात आहे आणि सर्व ग्रामपंचायतींना किमान 2 Mbps ते 20 Mbps गतीसह इंटरनेट सेवा प्रदान केली जाणार आहे.
 • हा प्रकल्प भारत सरकारच्या महत्वाकांक्षी डिजिटल भारत कार्यक्रमाचा एक भाग आहे. देशाला डिजिटल रूपाने ज्ञानसंपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये बदलणे हा याचा हेतू आहे.
 • सन 2011 मध्ये प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला होता. प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात 1 लक्ष ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्कवर ब्राडबॅंड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
 • BSNL, रेलटेल आणि पॉवर ग्रीड या तीन सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या संयुक्तपणे हा प्रकल्प राबवावीत आहे.
 • या प्रकल्पाला युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) कडून निधी मिळालेला आहे.
 • इंटरनेट सेवा देण्यासाठी एकच ऑप्टिकल फायबर केबलचा वापर करण्यासाठी गिगाबिट पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क तंत्रज्ञान वापरले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here