(चालू घडामोडी) Current Affairs | 26 November 2019

 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार :

 • खगोलीय घटनांमध्ये दुर्मीळ समजले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण एक महिन्याने गुरुवार, 26 डिसेंबर रोजी भारतातून दिसणार आहे. यापूर्वी, 15 जानेवारी 2010 रोजी नऊ वर्षांपूर्वी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती.
 • 26 डिसेंबरला होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ तामिळनाडू येथील काही, भागांतून दिसेल. उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल, असे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
 • तसेच सोमण म्हणाले की, खग्रास सूर्यग्रहणात चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकते. परंतु जर त्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही.
 • अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा आपल्याला दिसते, त्यालाच ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. अक्षरश: ‘फायर रिंग’चे दर्शन आपल्याला होते. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी न पाहता चष्म्याचा वापर करावा, असे ते म्हणाले.

अमेरिकेचे नौदल प्रमुख स्पेन्सर यांची हकालपट्टी :

 • नेव्हीसील (नौसैनिक) प्रकरण योग्य प्रकारे न हाताळल्याने लष्करी अधिकारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण झाले असा आरोप करून अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी नौदल प्रमुख रिचर्ड स्पेन्सर यांना पदावरून काढून टाकले.
 • इराकमध्ये एडवर्ड गॅलघर या नेव्ही सीलने 2017 मध्ये इराकमध्ये प्रेताबरोबर स्वत:चे छायाचित्र काढले होते त्या प्रकरणात त्याची पदावनती करण्यात आली, पण नंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या नौदल सीलला ( नौसैनिक) परत पूर्वीच्या पदावर आणले होते.
 • ट्रम्प यांनी या प्रकरणात नौसैनिक असलेल्या गॅलघर याला 15 नोव्हेंबर रोजी माफी दिली होती. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. युद्धकाळात गुन्हे करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना माफ करण्याची ट्रम्प यांची कृती योग्य नव्हती असे त्यांचे लष्करातील काहींचे म्हणणे होते.
 • तर एस्पर यांनी रविवारी असे म्हटले होते की, नौदल प्रमुख स्पेन्सर यांनी हा वाद गोपनीय पद्धतीने मिटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांनी विश्वास गमावला आहे. संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने असे वर्तन करणे योग्य नव्हते. त्यामुळे स्पेन्सर यांना आपण पदावरू न काढून टाकत आहोत.

‘नोमुरा खाद्य असुरक्षितता निर्देशांक’मध्ये भारत 44 व्या क्रमांकावर

 • नोमुरा ग्लोबल मार्केट रिसर्च या संस्थेनी ‘नोमुरा खाद्य असुरक्षितता निर्देशांक’ (NFVI) प्रसिद्ध केला आहे. खाद्यपदार्थाच्या किंमतींमध्ये होणार्‍या मोठ्या प्रमाणातल्या बदलांच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. शीर्ष स्थान म्हणजे सुपरिस्थिती तर तळाशी म्हणजे वाईट परिस्थिती आहे.
 • दरडोई देशाची GDP; कुटुंबाच्या वापरामध्ये अन्नाचा वाटा; आणि खाद्याची निव्वळ आयात या तीन घटकांवर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे.
 • दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) कमी असेल, वापरामध्ये अन्नाचा वाटा अधिक असेल आणि खाद्यपदार्थांची निव्वळ आयात सर्वोच्च असल्यास देशातल्या खाद्यपदार्थाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असते.
 • ठळक बाबी: 110 देशांमध्ये भारत 44 व्या स्थानी आहे.
 • येत्या काही महिन्यांमध्ये जगातल्या 50 देशांमध्ये खाद्यपदार्थाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, बहुधा उदयोन्मुख देशांमध्ये ही परिस्थिती येऊ शकते. या 50 देशांची एकत्रित लोकसंख्या जगातली जवळजवळ 60 टक्के आहे.
 • खाद्यपदार्थाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये भारताची किरकोळ महागाई 16 महिन्यांच्या उच्चांकावर गेली, जी 4.6 टक्के होती. खाद्यपदार्थाच्या महागाईचा दर सुमारे 8 टक्क्यांनी वाढला आहे, जो सरसरीच्या दुप्पट आहे. डाळी (महागाई दर 12%) आणि भाज्या (महागाई दर 26%) आणि मासे व मांस (महागाई दर 10%) अश्या आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या.
 • NSSचा ‘ड्रिंकिंग वॉटर सॅनिटेशन, हायजिन अँड हाऊसिंग कंडिशन्स इन इंडिया’ अहवाल
 • सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण (NSS) याने केलेल्या 76 व्या सर्वेक्षणाच्या आधारावर ‘ड्रिंकिंग वॉटर सॅनिटेशन, हायजिन अँड हाऊसिंग कंडिशन्स इन इंडिया’ अहवाल तयार केला आहे.
 • जुलै ते डिसेंबर 2018 या कालावधीत ग्रामीण भागातले सुमारे 96 टक्के आणि शहरी भागातल्या सुमारे 63.8 टक्के कुटुंबांकडे स्वतःचे घर होते.
 • स्वतःच्या घर असलेल्या कुटुंबांपैकी, ग्रामीण भागातले जवळपास 96.7 टक्के आणि शहरी भागातले सुमारे 91.5 टक्के घराचा केवळ निवासस्थान म्हणून वापर करतात.
 • स्वतःच्या घर असलेल्या कुटुंबांपैकी, ग्रामीण भागातले 89 टक्के आणि शहरी भागातले 56.4 टक्के लोकांची स्वतंत्र घरे आहेत. तर ग्रामीण भागात सुमारे 76.7 टक्के आणि शहरी भागात सुमारे 96.0 टक्के कुटुंबांच्या घरांची रचना ‘पुक्का’ संरचनेप्रमाणे आहे.
 • घरगुती वापरासाठी वीज या बाबतीत, स्वतःच्या घर असलेल्या कुटुंबांपैकी ग्रामीण भागात जवळपास 93.9 टक्के आणि शहरी भागात सुमारे 99.1 टक्के घरगुती वापरासाठी वीज वापरतात.
 • ग्रामीण भागातले जवळपास 56.6 टक्के आणि शहरी भागातले जवळपास 91.2 टक्के कुटुंबांना स्नानगृह उपलब्ध आहे. त्यातले ग्रामीण भागात 48.4 टक्के आणि शहरी भागात सुमारे 74.8 टक्के घरांना जोडलेले स्नानगृह आहे.
 • ग्रामीण भागातले जवळपास 71.3 टक्के आणि शहरी भागातले जवळपास 96.2 टक्के कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे. शौचालयाची सुविधा असलेल्या कुटुंबामध्ये ग्रामीण भागात 94.7 टक्के पुरुष व 95.7 टक्के महिला तर शहरी भागात 98 टक्के व 98.1 टक्के महिला नियमितपणे शौचालयाचा वापर करतात.

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : स्पेनची सहाव्या विजेतेपदावर मोहोर

 • राफेल नदालने डेनिस शापोव्हालोव्हला नमवून स्पेनला रविवारी सहावे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. माद्रिद येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा २-० असा पराभव केला.
 • अंतिम सामन्यात रॉबटरे बॉटिस्टा एग्युटने फेलिक्स ऑगेर-अ‍ॅलिआसिमेचा ७-६ (७/३), ६-३ असा पराभव करून स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मग नदालने शापोव्हालोव्हला ६-३, ७-६ (९/७) असे पराभूत केले.
 • ३३ वर्षीय नदालसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले. त्याने फ्रेंच आणि अमेरिकन अशा दोन ग्रँडस्लॅम जेतेपदासहित जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे डेव्हिस विजेतेपदाने त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here