(चालू घडामोडी) Current Affairs | 27 December 2019

सुप्रशासनात महाराष्ट्र दुसरा

 • देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकीय कारभाराचे मोजमाप करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुप्रशासन निर्देशांकास (गुड गव्हर्नस इंडेक्स) प्रारंभ करण्यात आला असून, त्याची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत तमिळनाडूने प्रथम क्रमांक पटकाविला असून, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहे. कार्मिक मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
 • सुप्रशासन निर्देशांकाच्या साह्याने राज्या-राज्यांच्या कारभाराची तुलना करण्यात येईल; तसेच प्रशासनात सुधारणा करण्यासाठी व उद्दिष्टाप्रत पोहोचण्यासाठी सुयोग्य धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. निर्देशांकासाठी काही घटक विचारात घेण्यात आले आहेत. उदा. मोजमाप करणे सोपे असावे, नागरिककेंद्री असावे; तसेच अंतिमत: सुधारणा हे उद्दिष्ट असावे आणि ते सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी अंमलबजावणी करता येण्यासारखे असावे.
 • क्रमांक राज्य: एक तमिळनाडू, दोन महाराष्ट्र, तीन कर्नाटक, चार छत्तीसगड, पाच आंध्र प्रदेश, सहा गुजरात, सात हरियाणा, आठ केरळ, नऊ मध्य प्रदेश, दहा पश्चिम बंगाल, अकरा तेलंगण, बारा राजस्थान , तेरा पंजाब, चौदा ओडिशा, पंधरा बिहार, सोळा गोवा, सतरा उत्तर प्रदेश, अठरा झारखंड.

अटल भूजल योजनेचा प्रारंभ

 • 25 डिसेंबर 2019 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अटल भूजल योजना (अटल जल) याचा प्रारंभ केला गेला.
 • या मोहिमेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे ही 2024 सालापर्यंत देशातल्या प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा प्रयत्न साध्य करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे.
 • जल शक्ती मंत्रालयाच्या नेतृत्वात ही योजना राबवली जाणार आहे. लोकसहभागाने जल संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न केले जाणारा आहेत. घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या दिशेने कार्य केले जात आहे.

सुशासन निर्देशांक 2019

 • 25 डिसेंबर 2019 रोजी सुशासन दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारतर्फे ‘सुशासन निर्देशांक’ (GGI) जाहीर करण्यात आला. हा निर्देशांक प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग आणि सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स या संस्थांद्वारे तयार करण्यात आला.
 • हा निर्देशांक तयार करण्यासाठी गृहीत धरण्यात आलेल्यांमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरण संरक्षण आणि कायदेशीर संरक्षण आणि न्यायालयीन सेवा या मुख्य घटकांचा समावेश आहे.
 • शेती व संबंधित क्षेत्रे, वाणिज्य व उद्योग, मनुष्यबळ विकास, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि उपयोगिता, आर्थिक प्रशासन, समाज कल्याण आणि विकास, न्यायालयीन आणि सार्वजनिक सुरक्षा, पर्यावरण आणि नागरिक-केंद्रित शासन या 10 क्षेत्रांचा निर्देशांक तयार करताना विचार केला गेला आहे.
 • ठळक बाबी: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तीन गटांमध्ये विभागले गेले आहे, ते आहेत – मोठे राज्य, ईशान्य आणि डोंगराळ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश.
 • मोठ्या राज्यांमध्ये तामिळनाडू राज्य अव्वल ठरले आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशाचा क्रमांक लागतो.
 • ओडिशा, बिहार, गोवा आणि उत्तरप्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये सुशासनाच्या बाबतीत प्रदर्शन कमकुवत होते. या निर्देशांकात झारखंडचा शेवटचा क्रमांक होता.
 • ईशान्य आणि डोंगराळ राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ उत्तराखंड, त्रिपुरा, मिझोरम आणि सिक्कीम यांचा क्रमांक लागतो.
 • वाईट कामगिरी करणार्‍या राज्यांमध्ये जम्मू व काश्मीर, मणीपूर, मेघालय, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

IAF चा पराक्रमी ‘बहादूर’ होणार निवृत्त

 • इंडियन एअर फोर्सचं अत्यंत घातक विमान MIG-27 आज सेवानिवृत्त होणार आहे. राजस्थानमधील जोधपूर एअरबेसवरुन मिग-27 विमानांची तुकडी शेवटचं उड्डाण करणार आहे.
 • मिग-27 फायटर विमाने इंडियन एअर फोर्सच्या वैभवशाली परंपरेची साक्षीदार आहेत. मागच्या चार दशकापासून ही फायटर विमाने इंडियन एअर फोर्सचा कणा होती.
 • जोधपूर एअर बेसवर मिग-27 ची शेवटची स्क्वाड्रन तैनात असून या स्क्वाड्रनमध्ये सात विमाने आहेत. “मिग-27 चे स्क्वाड्रन आज आपले शेवटचे हवाई कौशल्य सादर करेल. त्यानंतर ही विमाने निवृत्त होईल. देशभरात पुन्हा कुठेही ही विमाने उड्डाण करणार नाहीत.
 • भारताने 1980 च्या दशकात तत्कालिन सोव्हिएत युनियन म्हणजे आताच्या रशियाकडून ही फायटर विमाने विकत घेतली होती.
 • कारगिल युद्धातील मिग-27 ची कामगिरी पाहून हे विमान चालवणाऱ्या फायटर वैमानिकांनी या विमानाला ‘बहादूर’ हे टोपण नाव दिले होते.
 • शक्तीशाली इंजिन असलेल्या मिग-२७ मध्ये मोहिमेच्या गरजेनुसार काही बदल करता यायचे.
 • कॉकपीटसह विमानातील अत्याधुनिक सिस्टिममुळे वैमानिकाला अत्यंत अचूकतेने शत्रूवर प्रहार करणे शक्य झाले.
 • 20 वर्षांपूर्वी 1999 साली पाकिस्तान बरोबर लढल्या गेलेल्या कारगिल युद्धात मिग-27 ने अत्यंत उत्कृष्ट भूमिका बजावली.
 • कारगिल युद्धात हजारो फूट उंच शिखरावर दडून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर या विमानातून अत्यंत अचूकतेने बॉम्बफेक करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला आपल्या चौक्या सोडून पळ काढावा लागला. मागच्या काही वर्षात मिग-27 च्या अपघातामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे 2017 सालापासून भारतीय हवाई दलाने टप्प्याटप्प्याने या विमानांचा वापर बंद केला.
 • मिग-27 ने ऑपरेशन पराक्रमसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवायतींमध्ये सहभाग घेतला होता.
 • आयएएफची 29 क्रमांकाची स्क्वाड्रन फक्त अपग्रेडेड मिग-27 ऑपरेट करते. 10 मार्च 1958 साली ही स्कवाड्रन स्थापन झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here