(चालू घडामोडी) Current Affairs | 27 November 2019

‘इस्रो’ ची दमदार कामगिरी, ‘कार्टोसॅट-3’ अवकाशात झेपावलं :

 • चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर आता इस्रोने नव्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे इस्रोच्या नव्या मोहिमेमुळे देशाची संरक्षण सज्जता आणखी वाढली आहे. पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे आज प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार कार्टोसॅट-3 सोबत 13 नॅनो उपग्रहांचेही प्रक्षेपण झाले आहे.
 • तसेच पीएसएलव्ही-सी 47 च्या प्रक्षेपण मोहिमेच्या 26 तासांच्या उलटमोजणीला आज सकाळी 7.28 वाजता श्रीहरिकोटात सतीश धवन स्पेस सेंटरवर सुरुवात झाल्याची माहिती इस्रोने दिली होती. तर यंदाच्या वर्षात इस्रो कार्टोसॅट-3 उपग्रह सोडला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने कार्टोसॅट-3 महत्त्वाची भूमिका बजावेल. अवकाशातून भारतीय जमिनीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने कार्टोसॅट-3 चे प्रक्षेपण करण्यात आले.
 • नैसर्गिक आपत्तीची सूचना देण्याचं, विकासकामांना सहाय्य करण्याचं काम हा उपग्रह करेल. यासोबतच देशाच्या सीमांवर नजर ठेवण्याची जबाबदारीदेखील कार्टोसॅट-3 पार पाडणार आहे. तर या उपग्रहाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी तळांवर नजर ठेवणं सोपं होणार आहे.
 • पाकिस्तानच्या जमिनीवरील अगदी बारीकसारीक हालचाली टिपण्याची क्षमता कार्टोसॅट-3 मध्ये आहे. याचा मोठा फायदा भारतीय सैन्याला होईल. कार्टोसॅट-3 हा कार्टोसॅट मालिकेतील नववा उपग्रह आहे. या उपग्रहातील कॅमेरा अतिशय शक्तीशाली असेल. जमिनीवर असलेल्या माणसाच्या मनगटावरील घड्याळातील वेळ दाखवू शकेल, इतकी क्षमता कार्टोसॅट-3 मधील कॅमेऱ्यात असेल.
 • तसेच फेब्रुवारीमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कार्टोसॅट उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. विविध वातावरणात पृथ्वीची छायाचित्र घेण्याची क्षमता कार्टोसॅट-3 मध्ये आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्याचं कामदेखील हा उपग्रह करेल.

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : आनंदकडून निराशा; कार्लसन विजेता

 • टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले.
 • मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी २७ गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षांच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी कोस्ट) येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने २६.५ गुण मिळवले होते.
 • तो विक्रम कार्लसनने मोडीत काढला. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने २३ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर वेस्ली सो (अमेरिका) आणि अनिश गिरी (नेदरलँड्स) या दोघांनी प्रत्येकी १८.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

आशियाई तिरंदाजी स्पर्धात भारताला तीन कांस्यपदके :

 • आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक रीकव्‍‌र्ह प्रकारात भारताच्या अतानू दाससह तीन खेळाडूंनी मंगळवारी कांस्यपदके जिंकली. याचप्रमाणे किमान तीन रौप्यपदकांची निश्चिती केली.
 • भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घालण्यात आल्यामुळे अतानू हा त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाला होता.
 • तर कांस्यपदकाच्या लढतीत त्याने कोरियाच्या जिन हायेक ओहचा 6-5 असा पराभव केला. मग दासने तरुणदीप राय आणि जयंत तालुकदार यांच्या साथीने पुरुष सांघिक गटात चीनचा 6-2 असा पराभव करून दुसरे कांस्यपदक पटकावले.
 • त्यानंतर, महिलांच्या रीकव्‍‌र्ह सांघिक गटात दीपिका कुमारी, लैश्राम बोम्बायला देवी आणि अंकिता भाकट यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कांस्यपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला.

छत्तीसगडचे गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान ‘व्याघ्र प्रकल्प’ घोषित करण्याचा निर्णय

 • छत्तीसगड राज्य सरकारने कोरीया जिल्ह्यातल्या गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यानाला राज्यातला चौथा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • राज्यात आधीच तीन व्याघ्र प्रकल्प आहेत, ते म्हणजे – उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प, इंद्रावती व्याघ्र प्रकल्प व अचानकमार व्याघ्र प्रकल्प.
 • बैठकीत याव्यतिरिक्त लेमरू हत्ती संरक्षण प्रकल्प तयार करण्याचा निर्णय देखील घेतला गेला. या प्रकल्पात कटघोरा, कोरबा, रायगड आणि सुरगुजा जिल्ह्यातला वन प्रदेश आणि कोरबाचा धरमजीगड व सुरगुजा वनविभाग हा भूप्रदेश एकत्र केला जाणार आहे.

दोन केंद्रशासित प्रदेश एक होणार

 • मण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र करून एकच केंद्रशासित बनविण्याचे विधेयक केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेमध्ये सादर केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी हे विधेयक मांडले. जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी केल्यानंतर तीन महिन्यांनी केंद्राने दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र करण्याचे प्रस्तावित केले आहे.
 • नव्या केंद्रशासित प्रदेशाचे नाव ‘दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव’ आणि प्रदेशाचे मुख्यालय दमण आणि दीव असण्याची शक्यता आहे. गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावरील या दोन केंद्रशासित प्रदेशाचे एकत्रीकरण हे अधिक चांगल्या प्रशासनाकरिता होणार आहे.
 • सध्या दोन्ही प्रदेश एकमेकांपासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर असूनही दोन्ही प्रदेशांचा वेग‌ळा अर्थसंकल्प आणि वेगळे सचिवालय आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीनंतर देशात सध्या नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here