(चालू घडामोडी) Current Affairs | 28 December 2019

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी UGCने पाच दस्तऐवज तयार केली

 • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेनी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन मिळावे यासाठी पाच घटकांवर तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजांचे अनावरण करण्यात आले आहे.
 • हे पाच घटक म्हणजे – मूल्यांकन विषयक सुधारणा; पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत विद्यापीठ परिसर; मानवी मूल्ये आणि व्यवसायिक नीतीशास्त्र; शिक्षकांची नियुक्ती आणि शैक्षणिक संशोधनातली अखंडता.
 • अन्य ठळक बाबी: उच्च शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘उच्च शिक्षण गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम मार्गदर्शके’ स्वीकारली आहेत. उच्च शिक्षण प्रणाली विकसित करणे आणि देशाच्या येणार्‍या पिढीला जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक असलेली कौशल्ये, ज्ञान आणि नैतिकता प्रदान करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.
 • “उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत परिसर विषयक SATAT-कार्यचौकट” परिसराची पर्यावरणविषयक गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि त्याच्या भविष्यात हरित आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यासाठी परिणामकारक धोरणे आणि पद्धतींचा अवलंब करण्यास विद्यापीठांना प्रोत्साहन देते.
 • शैक्षणिक संस्थांमध्ये मानवी मूल्ये व नैतिकतेस प्रोत्साहन देण्याची गरज ओळखून, UGCने एक धोरण आखले आहे, ज्याचे नाव “मूल्य प्रवाह – उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मानवी मूल्ये आणि व्यवसायिक नैतिकता संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे” असे आहे.
 • याव्यतिरिक्त, “गुरु-दक्षता – शिक्षक नियुक्ती कार्यक्रमासाठी मार्गदर्शन” हे धोरण आखले गेले आहे.
 • विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) बाबत: विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही भारतातली विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातली सर्वोच्च संस्था आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत हा आयोग कार्य करतो.
 • या आयोगाची स्थापना दि. 28 डिसेंबर 1953 रोजी झाली. 1956 साली झालेल्या कायद्यानुसार, ‘UGC’ ला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता राखणे हे UGC चे उद्दिष्ट आहे.

देशाच्या प्रथम संक्रमण-उन्मुख विकास प्रकल्पाचे बांधकाम नवी दिल्लीत सुरू

 • काम किंवा करमणुकीसाठी कराव्या लागणार्‍या प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या आणि शहरी विकासाला अधिक शाश्वत बनविण्याच्या उद्दीष्टांना दृष्टीपथात ठेवत, राजधानी दिल्लीमध्ये देशातल्या पहिल्या संक्रमण-उन्मुख विकास (Transit-oriented development -TOD) प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
 • केंद्रीय गृह व शहरी कल्याण मंत्रालय आणि दिल्ली विकास प्राधिकरण यांच्या TOD धोरणाच्या अंतर्गत चालणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.
 • ठळक बाबी: स्मार्ट शहर उभे करण्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीत भारतातली पहिली रीजनल रॅपिड ट्रांझिट सिस्टम (RRTS) उभारली जात आहे. हा प्रकल्प त्याचा एक भाग आहे.
 • मेट्रो स्थानके, निवासस्थाने आणि कामाचे ठिकाण तसेच संग्रहालये, ग्रंथालये यासारख्या मनोरंजक जागा यांना एकत्र जोडून प्रवास सुकर करण्याच्या उद्देशाने एकात्मिक विकास केला जात आहे. हा प्रकल्प 2023 सालापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
 • एका नियोजनबद्ध पद्धतीने मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानक, आंतरराज्यीय बस सेवा स्थानके, सौर ऊर्जा केंद्रे आणि पुनर्वापरासाठी जलप्रक्रिया यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे.

मिलर मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत

 • सात ऑलिम्पिक पदकविजेती अमेरिकेची नामांकित कलात्मक जिम्नॅस्टिक्सपटू शॅनन ली मिलरची १७व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • मुंबई मॅरेथॉन स्पर्धा १९ जानेवारी, २०२० या दिवशी होणार असून अमेरिकेच्या ऑलिम्पिक ‘हॉल ऑफ फेम’ने दोन वेळा गौरवण्यात आलेली ४२ वर्षीय मिलर ही एकमेव महिला क्रीडापटू आहे. तिला २००६मध्ये वैयक्तिक, तर २००८मध्ये सांघिक कामगिरीसाठी या सन्मानाने गौरवण्यात आले होते

अखेरची भरारी घेतलेल्या ‘मिग-२७’ ची तीन दशके अविस्मरणीय कामगिरी! निवृत्ती

 • वीस वर्षांपूर्वी १९९९ च्या कारगिल युद्धात मोठी भूमिका पार पाडणारी मिग २७ विमाने शुक्रवारी सेवेतून काढून घेण्यात आली. या विमानांनी शुक्रवारी येथील विमानतळावरून शेवटचे उड्डाण केले.
 • भारतात ‘बहादूर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानांनी शांतता व युद्धकाळात मोठी भूमिका पार पाडली असून कारगिल युद्धात शत्रूच्या ठिकाणांवर बॉम्ब टाकण्यात आघाडीवर होती. ‘ऑपरेशन पराक्रम’मध्ये ती सहभागी होती.
 • मिग २७ विमानांचा वापर काही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सरावांमध्ये करण्यात आला होता.
 • रशियन बनावटीचे हे विमान असून त्याचे इंजिन शक्तिशाली होते. त्याच्या पंखांची भौमितिक रचना ही वैमानिकाला पंखाचा कोन सहज बदलता येईल अशा तऱ्हेने केलेली होती.
 • आता ही विमाने ३१ मार्च २०२० रोजी हवाई दलाच्या संग्रहालयात ठेवली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here