आशियाई तिरंदाजी स्पर्धात अभिषेक-ज्योतीला सुवर्ण :
- अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी कंपाऊंड मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या खात्यावर सातवे पदक जमा झाले.
- अभिषेक-ज्योती जोडीने अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या यि-सुआन चेन आणि चेह-लूह चेन जोडीचा 158-151 असा पराभव केला. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली.
- दिवसाच्या पूर्वार्धात अभिषेकने फक्त एका गुणाच्या फरकाने कंपाऊंड सांघिक सुवर्णपदक गमावले. कोरियाने 233-232 असा पराभव केल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिषेक, रजत चौहान आणि मोहन भारद्वाज या त्रिकुटाने पहिल्या सत्रातसुद्धा अप्रतिम खेळ करीत बरोबरी साधली.
- परंतु दुसऱ्या सत्रात जाईवॉन यांग, याँगची चॉय आणि ईऊन-क्यू चोय यांनी सामन्यावरील नियंत्रण सोडले नाही. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती, मुस्कान किरार आणि प्रिया गुर्जर यांनी कोरियाकडून 215-231 अशी हार पत्करल्याने जेतेपद गमावले.
दूरसंचार कंपन्यांना दरवाढीला मुभा :
- घोषित निर्णयाप्रमाणे तीन दिवसांनी होणाऱ्या दूरसंचार दरवाढीबाबत हस्तक्षेपास स्पष्टपणे नकार देत नियामक यंत्रणेने एकप्रकारे खासगी कंपन्यांना दरवाढीस मुभा दिली आहे. कंपन्यांना दर निश्चितीसाठी आपण काहीही सुचविणार नाही, असेही दूरसंचार प्राधिकरणाने स्पष्ट केले.
- तसेच व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल यांनी गेल्याच आठवडय़ात येत्या 1 डिसेंबरपासून त्यांच्या मोबाईलधारकांवर दरवाढ लादण्याचे जाहीर केले. पाठोपाठ रिलायन्स जिओनेही दरवाढीचा निर्णय घेतला. खासगी दूरसंचार कंपन्यांकडून प्रत्यक्षात किती दरवाढ होईल, हे येत्या तीन दिवसांतच स्पष्ट होईल.
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या सूत्रानुसार मात्र खासगी कंपन्यांच्या दरवाढीच्या निर्णयात हस्तक्षेप होणार नाही. तसेच या कंपन्यांना दरवाढीचा किमान स्तर निश्चित करण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
- तर दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वीच दरवाढीचा निर्णय जाहीर केला असल्याने त्यांना ही वाढ किती असावी हे निश्चित करण्याबाबत या घडीला काही सांगणे उचित ठरणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. प्रत्यक्षात दरवाढ लागू झाल्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती लक्षात घेतली जाईल, असेही सांगण्यात आले.
दूरसंचार कंपन्यांना दरवाढीला मुभा :
- घोषित निर्णयाप्रमाणे तीन दिवसांनी होणाऱ्या दूरसंचार दरवाढीबाबत हस्तक्षेपास स्पष्टपणे नकार देत नियामक यंत्रणेने एकप्रकारे खासगी कंपन्यांना दरवाढीस मुभा दिली आहे. कंपन्यांना दर निश्चितीसाठी आपण काहीही सुचविणार नाही, असेही दूरसंचार प्राधिकरणाने बुधवारी स्पष्ट केले.
- व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल यांनी गेल्याच आठवडय़ात येत्या १ डिसेंबरपासून त्यांच्या मोबाईलधारकांवर दरवाढ लादण्याचे जाहीर केले. पाठोपाठ रिलायन्स जिओनेही दरवाढीचा निर्णय घेतला. खासगी दूरसंचार कंपन्यांकडून प्रत्यक्षात किती दरवाढ होईल, हे येत्या तीन दिवसांतच स्पष्ट होईल.
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या सूत्रानुसार मात्र खासगी कंपन्यांच्या दरवाढीच्या निर्णयात हस्तक्षेप होणार नाही. तसेच या कंपन्यांना दरवाढीचा किमान स्तर निश्चित करण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
ई-सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर :
- लोकसभेमध्ये बुधवारी ई-सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकाचे कायद्यामध्ये रुपांतर झाल्यानंतर ई-सिगारेटचे उत्पादन, आयात आणि विक्री गुन्हा ठरणार आहे.
- यावर्षी सप्टेंबर महिन्यात ई-सिगारेटवर बंदी घालणारा अध्यादेश काढण्यात आला होता. तर आता ई-सिगारेटच्या उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्रीला मज्जाव करणारे नवीन विधेयक या अध्यादेशाची जागा घेईल. सर्वच पक्षाच्या बहुसंख्य खासदारांचा या विधेयकाला पाठिंबा होता.
- तसेच फक्त ई-सिगारेटवर बंदी घालून थांबू नका तर तंबाखूजन्य सिगारेटही शरीराला हानीकारक आहे. त्यामुळे ई-सिगारेटप्रमाणे त्यावरही बंदी घालावी अशी बहुसंख्य खासदारांची मागणी आहे.
13 सूक्ष्म उपग्रहांसहित भारताच्या ‘कार्टोसॅट-3’चे प्रक्षेपण यशस्वी
- दिनांक 27 नोव्हेंबर 2019 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी 1625 किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. PSLV C-47 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे 102 वे उड्डाण आहे.
- ‘कार्टोसॅट-3’ सह अमेरिकेचे 13 व्यवसायिक अतीसूक्ष्म उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले.