(चालू घडामोडी) Current Affairs | 29 December 2019

रशियाकडे जगातील पहिली हायपरसोनिक मिसाईल :

 • रशियाने आज आवाजाच्या वेगापेक्षा 27 पटींनी जास्त वेगवान असलेल्या हायपरसोनिक मिसाईलला त्यांच्या सैन्दलाकडे सुपूर्द केले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी याची घोषणा केली आहे. ही मिसाईल अण्वस्त्र क्षमता ठेवते.
 • तर या हायपरसोनिक मिसाईलचा वेगच एवढा प्रचंड आहे की त्याच्याशी कोणतीच डिफेन्स प्रणाली टक्कर देऊ शकत नाही. 27 डिसेंबरला ही मिसाईल रशियन सैन्याला देण्यात आली. या मिसाईलची तैनाती कुठे असेल याबाबत कोणतीही माहिती नसून यूरलच्या डोंगररांगांमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
 • हायपरसोनिक मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षा (1235 किमी) कमीत कमी 5 पटींनी जास्त वेगाने जाऊ शकते. म्हणजेच 6174 प्रति तास वेग. या मिसाईलमध्ये क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाईल या दोन्हींचे गुण आहेत.
 • तसेच हे मिसाईल लाँच झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणार आहे. त्यानंतर तेथून अंतर कापत लक्ष्याकडे झेपावणार आहे. यामुळे या मिसाईलला रोखणे कठीण असणार आहे. वेगही प्रचंड असल्याने सध्याचे रडार या मिसाईलला शोधण्यात कुचकामी ठरणार आहेत.
 • तर या मिसाईलची धक्कादायक बाब म्हणजे हे मिसाईल तब्बल दोन अब्ज किलो अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. यामुळे एखादा मोठा देश काही क्षणांत बेचिराख होऊ शकतो. या मिसाईलच्या टप्प्यात अमेरिकाही येते. 2018 मध्ये या मिसाईलची टेस्टिंग करण्यात आली होती. तेव्हा 6000 किमीवरील लक्ष्यभेद करण्यात आला होता.

UPSC मार्फत रेल्वेमध्ये सर्व नवीन भरती करण्यात येणार

 • भारतीय रेल्वेमध्ये होणारी सर्व नवीन भरती आता पुढे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत केली जाणार आहे. याबाबत सुधारणा करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या आठ संवर्गांचे एकाच मंडळात विलीनीकरण करून नवे ‘भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा’ (IRMS) हा संवर्ग तयार करण्याला मान्यता दिली आहे.
 • मंडळाविषयी: IRMS मंडळ ही एकमेव संस्था असेल जी उमेदवाराद्वारे अर्ज भरताना सूचित केलेली पसंती लक्षात घेणार.
 • नवीन व्यवस्थेनुसार, नव्या विस्तारीत मंडळात रेल्वे मंडळाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असणार. त्याव्यतिरिक्त रेल्वेकडेचे 4 सदस्य आणि उर्वरित स्वतंत्र सदस्य असणार. हे सदस्य वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि उद्योग क्षेत्रातली 30 वर्षांचा अनुभव असलेले अत्यंत प्रतिष्ठित व्यवसायिक असणार आहेत.
 • स्वतंत्र सदस्य मंडळाच्या बैठकीत उपलब्ध असणार परंतू ते रेल्वेच्या दैनंदिन कारभारात नसणार.
 • पुढे होणारी सेवा भरती सुलभ करण्यासाठी ‘कार्मिक व प्रशिक्षण विभाग’ आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्याशी सल्लामसलत करून नवीन सेवा तयार केली जाणार आहे.

रायपूरमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाला सुरुवात झाली

 • छत्तीसगड राज्याचे राजधानी शहर रायपूर येथे 27 डिसेंबर 2019 रोजी वार्षिक ‘राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव’ याचा शुभारंभ झाला. कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.
 • ठळक बाबी: हा वार्षिक कार्यक्रम केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालय आणि छत्तीसगड सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे.
 • छत्तीसगड राज्यामध्ये प्रथमच राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
 • तीन दिवस चालणार्‍या या नृत्य महोत्सवात देशातल्या 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले 1300 हून अधिक कलाकारांनी भाग घेतला आहे. या कार्यक्रमात सहा देशांनीही भाग घेतला आहे.
 • कार्यक्रमात 29 आदिवासी गटांनी चार वेगवेगळ्या नृत्य प्रकारांच्या 43 पेक्षा जास्त शैली सादर करत आहेत.
 • आदिवासी कलेचे प्रदर्शन घडावे यासाठी भारत सरकारच्या वतीने हा वार्षिक कार्यक्रम आयोजित केला जातो.

विजयी मेरी कोमची अखिलाडूवृत्ती!

 • देशातील क्रीडाक्षेत्राचे लक्ष वेधलेल्या बॉक्सिंग लढतीत शनिवारी सहा वेळा विजेत्या एमसी मेरी कोमने निखत झरीनला नामोहरम केले आणि पुढील वर्षी चीनला होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान पक्के केले.
 • तर 36 वर्षीय मेरी कोमने 23 वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या झरीनचा 9-1 असा पराभव केला. मेरी कोमसाठीसुद्धा निवड चाचणीचा निकष असायला हवा, अशी मागणी करीत या लढतीविषयीची उत्कंठा झरीनने वाढवल्याने बॉक्सिंग हॉलमधील वातावरण तणावपूर्ण शांततेचे होते.
 • तसेच अन्य लढतींत, 57 किलो वजनी गटात आशियाई पदकविजेत्या साक्षी चौधरीने दोन वेळा रौप्यपदक विजेत्या सोनिया लाथेरला नमवले.
 • 60 किलो गटात राष्ट्रीय विजेत्या सिम्रनजीत कौरने माजी विश्वविजेत्या एल. सरिता देवीचा पराभव केला. दोन वेळा जागतिक पदकविजेत्या लव्हलिना बोर्गोहेनने 69 किलो गटात ललिताला सहज पराभूत केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या पूजा राणीने 75 किलो गटात नूपुरला नामोहरम केले.

यंदाचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे

 • भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि १९८३ चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य कृष्णमाचारी श्रीकांत आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांना बीसीसीआयकडून देण्यात येणारा यंदाचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या १२ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणार असून या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
 • श्रीकांत आणि अंजुम यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • बीसीसीआयने एकमताने या पुरस्कारांसाठी दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचेही स्पष्ट केले गेले आहे. श्रीकांत यांनी १९८१ ते १९९२ यादरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here