(चालू घडामोडी) Current Affairs | 3 December 2019

आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन: 3 डिसेंबर

 • 1992 सालापासून, जगभरात दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन (International Day of Persons with Disabilities -IDPD) म्हणून साजरा केला जात आहे.
 • या वर्षी हा दिवस ‘प्रोमोटिंग द पार्टिसिपेशन ऑफ पर्सन्स वीथ डिसअॅबिलिटीज अँड देयर लीडरशिप: टेकिंग अॅक्शन ऑन द 2030 डेव्हलपमेंट अजेंडा’ या विषयाखाली साजरा केला गेला.
 • तथ्ये व आकडे: जगात दिव्यांगांची लोकसंख्या: जवळपास 7 अब्ज
 • जगातल्या 1 अब्ज लोकांना विविध स्वरुपात दिव्यांगत्व आहे.
 • दिव्यांगांमध्ये वयाने लहान असलेल्या मुलामुलींची संख्या 100 दशलक्षपेक्षा अधिक आहे.
 • 80% दिव्यांग लोकसंख्या विकसनशील देशात वास्तव्यास आहे.
 • 50% दिव्यांग व्यक्तींना आरोग्य सेवा घेणे परवडत नाही.

थायलँडची जागतिक वारसा समितीच्या सभासदपदी निवड झाली

 • नुकतीच, थायलँडची UNESCOच्या जागतिक वारसा समितीच्या (World Heritage Committee) सभासदपदी निवड करण्यात आली आहे.
 • 27 नोव्हेंबर 2019 रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे भरविण्यात आलेल्या जागतिक वारसा परिषदेच्या सदस्यांच्या महासभेच्या 22 व्या सत्रात 193 देशांनी 21 सभासदांच्या जागतिक वारसा समितीमधील रिक्त असलेल्या 9 जागा भरण्यासाठी मतदान केले.
 • या निवडणुकीमधून समितीच्या आशिया-प्रशांत क्षेत्रासाठी उपलब्ध जागेवर थायलँडची निवड झाली. याच्या व्यतिरिक्त अन्य रिक्त जागी सौदी अरब, इजिप्त, इथिओपिया, माली, नायजेरिया, ओमान, रशिया आणि दक्षिण आफ्रिका यांची निवड केली गेली.
 • वर्तमानात समितीवर सभासदपदी असलेले देश – ऑस्ट्रेलिया, बहरीन, बोस्निया व हर्झगोव्हिना, ब्राझील, चीन, ग्वाटेमाला, हंगेरी, किर्गिझस्तान, नॉर्वे, सेंट किट्स व नेव्हिस, स्पेन आणि युगांडा.

विक्रम लँडरचा ठिकाणा नासानं शोधला :

 • भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-2 मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली. चंद्रापासून 2.1 कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर विक्रम लँडरचा पत्ता लागला आहे.
 • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं ठिकाण शोधले असून, याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. नासाच्या ऑर्बिटरला चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रमचे अवशेष सापडले आहे.
 • चंद्रावरील सपाट भूमीवर उतरत असताना ज्या ठिकाणी विक्रम लँडर आदळले त्या भूमीपासून ७५० मीटर लांब अंतरावर विक्रम लँडरचे तीन अवशेष आढळले, असल्याचा दावा नासानं केला आहे. नासानं एक किलोमीटर इतक्या अंतरावरून विक्रमची छायाचित्र टिपली आहेत.

नौदलाला मिळणार देशातील पहिली महिला पायलट

 • हवाई दलानंतर आता नौदलालादेखील देशातील पहिली महिला पायलट मिळणार आहे. बिहारची शिवांगी स्वरूप ही देशातील पहिली नौदल पायलट बनणार आहे. तीने कोच्चीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिला ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॅच लावण्यात येणार आहे.
 • नौदल कोच्चीच्या ऑपरेशन ड्यूटीमध्ये शिवांगी सहभागी होईल. ती फिक्स्ड विंग डोर्नियर सर्विलांस विमान उडवेल. हे विमान कमी अंतराच्या समुद्री मिशनसाठी पाठवले जाते. यामध्ये आधुनिक सर्विलांस, रडार, नेटवर्किंग आणि इलेक्ट्रॉनिक सेंसर आहेत. शिवांगीला मागील वर्षी जूनमध्ये व्हाइस एडमिरल एके चावला यांनी औपचारिकरित्या नौदलात सहभागी केले होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here