(चालू घडामोडी) Current Affairs | 3 November 2019

जम्मू व काश्मीर, लडाख येथे बांबू टेक्नॉलॉजी पार्क उभारले जाणार :

 • 31 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेल्या घोषणेनुसार, नव्याने तयार झालेल्या जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये बांबूच्या शेतीला व्यवसायिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने तीन ‘बांबू टेक्नॉलॉजी पार्क’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू, श्रीनगर आणि लेह येथे हे तीन केंद्र उभारण्यात येणार आहेत.
 • जम्मू व काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आणि शेजारच्या पंजाबमधील हिमालयाच्या पायथ्याशी जिल्ह्यात बांबू नैसर्गिकरित्या वाढतात आणि त्या भागात बांबूच्या शेतीचा फायदा घेतला जाण्याची मोठी शक्यता आहे.
 • ईशान्य परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेले गुवाहाटी येथले केन अँड बांबू टेक्नॉलॉजी सेंटर (CBTC) हा प्रकल्प राबविणार आहे.
 • ‘बांबू टेक्नॉलॉजी पार्क’ याचा उद्देश्य बांबूचा विविध क्षेत्रांमध्ये होणारा वापर पाहता त्यापासून विविध उपयोगी वस्तूंची निर्मिती करणे हा आहे.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : क्रूसच्या निर्णायक गोलमुळे माद्रिदचा पहिला विजय :

 • इस्तंबूल : मध्यरक्षक टॉनी क्रूसने साकारलेल्या निर्णायक गोलच्या बळावर माजी विजेत्या रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये ‘अ’ गटातील सामन्यात गॅलेटसॅरे संघाला १-० असे पराभूत केले. या हंगामातील माद्रिदचा हा पहिलाच विजय ठरला.
 • तुर्क टेलिकॉम एरिनावर रंगलेल्या या सामन्यात माद्रिदने लुका मॉड्रिचला विश्रांती दिली होती. परंतु एडिन हॅझार्ड, करिम बेन्झेमा यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या समावेशामुळे माद्रिदने नेहमीप्रमाणेच आक्रमणावर भर दिला. १८व्या मिनिटाला हॅझार्डने गोलजाळ्याच्या डाव्या दिशेने दिलेल्या पासचे क्रूसने अप्रतिमरीत्या गोलमध्ये रूपांतर करून माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
 • मध्यंतरानंतरही गॅलेटसॅरेला बरोबरी साधण्यात अपयश आल्यामुळे माद्रिदच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांपैकी एका लढतीत माद्रिदला पराभव पत्करावा लागला होता, तर एक सामना त्यांना बरोबरीत सोडवण्यात यश आले. या विजयासह माद्रिदचे तीन सामन्यांतून चार गुण झाले असून पॅरिस सेंट जर्मेनने सर्वाधिक नऊ गुणांसह गटात अग्रस्थान मिळवले.

हेजमडी टोल नाक्यावर ‘फास्टॅग’ सुविधा प्रायोगिक तत्त्वावर चालू :

 • कर्नाटक राज्यातल्या उडुपी जिल्ह्यात हेजमडी गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावर सर्व 12 लेनसाठी ‘फास्टॅग’ (FASTag) सुविधा प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात आली आहे.
 • फास्टॅग – इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) योजनेच्या अंतर्गत ही सुविधा अंमलात आणली जात आहे.
 • फास्टॅग सुविधा: ‘फास्टॅग’ सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलित करण्यात येत आहे. फास्टॅग ऑनलाइन रिचार्ज केले जाऊ शकते.
 • रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानावर ही सुविधा चालते. गाडीच्या वाहकाला ऑनलाइन पद्धतीने ‘फास्टॅग’चे टॅग मिळते. त्याच्या खात्यात वाहक काही रक्कम टाकणार. नाक्यावरचे टॅग रीडर प्रत्येक वेळी वाहकाने वाहनावर चिपकवलेले टॅग वाचणार आणि त्यातून टोल रक्कम वजा होणार.
 • देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) राबवविणार आहे.
 • स्वयंचलित पद्धतीने तात्काळ होणारा व्यवहार वाहनांच्या दळणवळणाला गती देणार. त्यामुळे वाहनांच्या रांगा नाक्यावर दिसणार नाहीत. उभ्या अवस्थेत असलेल्या चालू गाड्यांमुळे वायफळ जाणार्‍या इंधनाची बचत होण्यास मदत मिळणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here