(चालू घडामोडी) Current Affairs | 30 December 2019

सायबर गुन्हे रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय संधीचा मसुदा तयार करण्यासाठी  संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता

 • सायबर गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने एक आंतरराष्ट्रीय संधी करण्यासाठी त्याचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी त्यासंबंधी एक ठराव मंजूर केला आहे.
 • हा ठराव रशियाने मांडला. आता सर्व जगाचे प्रतिनिधित्व करणारी एक तज्ञ समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी देशांमध्ये माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानात मदत व्हावी यासाठी पाळावयाच्या शिष्टाचारांचे विस्तृत वर्णन करणार.
 • युरोपीय संघ (EU), अमेरिका आणि इतर देशांच्या आक्षेपांवरून संयुक्त राष्ट्रसंघाकडे यासंदर्भात वारंवार मागणी होत आली आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA): आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना करण्यात आली.
 • दुसर्‍या महायुद्धानंतर दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली. UNचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.
 • सध्या या संघटनेचे जगभरात 193 सदस्य देश आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधल्या सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्वाचा हक्क दिला गेला आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

 • चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं.
 • चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही.

जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतपद भारताच्या हम्पीनं पटकावलं

 • रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपदावर भारताच्या कोनेरू हम्पीनं नाव कोरलं. हम्पीनं चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव केला. महिला गटातील विजेतेपद हम्पीनं मिळवलं, तर पुरूष गटातील विजेतेपद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसह यांनं पटकावलं आहे.
 • पहिला फेरीमध्येच हम्पीचा पराभव झाला, त्यानंतर दुसऱ्या फेरीत मुंसडी मारत पुनरागमन केलं. त्यानंतर झालेल्या १२व्या फेरीपर्यंत हम्पीनं नऊ गुण मिळवत ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. हम्पी आणि टिंगजीचे गुण समान झाल्यामुळे विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीने करण्यात आला. अखेरच्या निर्णायक गेमसह हम्पीनं विजेतेपद पटकावले.

रतन टाटा: गुगलच्या अहवालानुसार सर्वाधिक शोधले गेलेले उद्योगपती

 • गुगल कंपनीने त्यांचा ‘इयर इन सर्च 2019’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, टाटा सन्स उद्योगाचे अध्यक्ष रतन टाटा हे 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती आहेत.
 • उद्योगपतींच्या या यादीत रतन टाटा ह्यांच्यापाठोपाठ प्रथम दहामध्ये समाविष्ट झालेले व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत –
 • विप्रो कंपनीचे अझीम प्रेमजी
 • पोलाद उद्योगातल्या आर्सेलर मित्तल कंपनीचे लक्ष्मी मित्तल
 • लस निर्मितीच्या क्षेत्रातल्या पूनावाला समूहाचे सायरस एस. पूनावाला
 • महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा
 • HCL टेक्नोलॉजीज कंपनीचे शिव नादर
 • अदानी समूहाचे गौतम अदानी
 • बायोकोन फार्मास्युटिकल्स एंटरप्राइझ कंपनीच्या किरण मजुमदार-शॉ
 • कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक
 • डी-मार्ट किरकोळ दुकाने चालविणार्‍या एव्हेन्यू सुपरमार्ट्स कंपनीचे राधाकिशन दमानी
 • तर, भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान हे सर्वात जास्त शोधले गेलेले व्यक्तिमत्त्व आहे.

हेमंत सोरेन बनले झारखंडचे 11वे मुख्यमंत्री :

 • झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली. राजधानी रांचीतील मोरहाबादी मैदानावर हा शपथविधीसोहळा पार पडला. तसेच राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
 • तर यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.
 • हेमंत सोरेन हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. सोरेन यांच्यासह काँग्रेसचे विधिमंडळ नेते आलमगिर आलम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरान आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सत्यानंद भोक्त यांनी देखील यावेळी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here