(चालू घडामोडी) Current Affairs | 30 November 2019

विकासदराचा नीचांक ; अर्थगती ४.५ टक्क्यांवर

 • आर्थिक आघाडीवर सुरू असलेल्या चिंताजनक वातावरणामध्ये आणखी भर पडली असून चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीने गेल्या सहा वर्षांतील नीचांक गाठला.
 • जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान आर्थिक विकासाचा प्रवास ४.५ टक्क्यांवर स्थिरावला. देशातील निर्मिती, कृषी क्षेत्रातील सुमार स्थिती उपाययोजनांनंतरही अद्याप कायम असल्याचे त्यामु़ळे अधोरेखित झाले आहे.
 • भांडवली व्यवहारानंतर ५ टक्क्यांखालील सकल राष्ट्रीय उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाली. वित्त वर्ष २०१९-२० च्या एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीतील भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग ४.८ टक्के आहे. तोदेखील वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ७.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
 • रिझव्‍‌र्ह बँकेने चालू एकूण वित्त वर्षांकरिता ६.१ टक्के राष्ट्रीय सकल उत्पादन अपेक्षित केले. आधी ते ६.९ टक्के असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
 • मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण येत्या आठवडय़ात जाहीर होणार असून ताजी अर्थस्थिती पाहता रेपो दरात आणखी कपात होण्याची अटकळ अर्थतज्ज्ञ, आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

वैश्विक मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019

 • सिडनीच्या लोवी इंस्टीट्यूट या संस्थेनी नुकताच ‘वैश्विक मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019’ (Diplomacy Index) प्रसिद्ध केला आहे. या यादीत 61 देशांना क्रम दिला आहे.
 • यादीत भारत 12 व्या क्रमांकावर आहे. 2019 साली भारताचे जागतिक पातळीवर 123 दूतावास आणि उच्च आयोग आणि 54 वाणिज्य दूतावास आहेत.
 • अन्य ठळक बाबी: वर्ष 2019 मध्ये, चीनचे जगात 276 दूतावास आणि वाणिज्य दूतावास असून हा देश या यादीत प्रथम स्थानी आहे तर द्वितीय क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत तीन दूतावास कमी आहेत.
 • या देशांच्या पाठोपाठ पहिल्या पाचमध्ये फ्रान्स, जापान आणि रशिया यांचा क्रमांक लागला आहे.
 • तैवानच्या मुत्सद्दी पदांमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे, जी 2016 सालाच्या 22 दूतावासांवरून यावर्षी 15 वर आहे.

भारतीय खाद्यान्न महामंडळाचे अधिकृत भांडवल वाढविण्यात आले.

 • 27 नोव्हेंबर 2019 रोजी अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय खाद्यान्न महामंडळाचे (FCI) अधिकृत भांडवल विद्यमान 3500 कोटी रुपयांवरून 10 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
 • हे भांडवल भारतीय खाद्यान्न महामंडळाकडे (FCI) असणार्‍या अन्नधान्याच्या साठ्यामध्ये वृद्धी करण्यासाठी वापरले जाणार आहे. यासाठी लागणारा निधी केंद्रीय अर्थसंकल्पातून पुरविला जाणार आहे.
 • या गुंतवणुकीमुळे FCI वर असलेले कर्ज कमी होण्यास मदत होणार, ज्यामुळे त्याचा व्याज खर्च वाचणार आणि परिणामी अन्नधान्यावरील अनुदान कमी होणार.
 • FCI विषयी: भारतीय खाद्यान्न महामंडळ (FCI) याची स्थापना सन 1965 मध्ये झाली. सरकारचे खाद्यान्न धोरण राबवविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘खाद्यान्न महामंडळ कायदा-2019’ अंतर्गत महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

सिंगापूर-भारताचा संयुक्त हवाई सराव :

 • सिंगापूरच्या हवाई दलाने भारतासमवेत प्रशिक्षण सरावासाठी प्रगत एफ १६ लढाऊ विमाने तैनात केली असून भारतीय हवाई दलाची सहा सुखोई लढाऊ विमाने या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.
 • पश्चिम बंगालमधील कलाईकुडा हवाई दल केंद्रावर संयुक्त लष्करी सराव करण्यात येणार असून रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्स व भारतीय हवाईदल यांचा त्यात समावेश आहे. १२ डिसेंबपर्यंत हा सराव चालणार आहे.
 • संयुक्त लष्करी कवायतींचे हे दहावे वर्ष असून यात हवाई सागरी प्रशिक्षणाचा समावेश आहे. भारतीय नौदलाची यंत्रणा यात वापरली जाणार आहे, असे सिंगापूरच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
 • रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्सने सहा एफ १६ सी/डी लढाऊ विमाने तैनात केली असून भारतीय हवाई दलाने सहा एसयू ३० एमके आय लढाऊ विमाने तैनात केली आहेत.
 • या वर्षीच्या संयुक्त सरावाचे महत्त्व सांगताना सिंगापूर हवाईदलाचे ब्रिगेडियर जनरल हो कुम ल्युएन यांनी सांगितले की, पहिला संयुक्त सराव हा २००८ मध्ये झाला होता.

आर्थिक विकासासाठी भारत श्रीलंकेला देणार ४५ कोटी डॉलर्सचे कर्ज

 • श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला ४५ कोटी डॉलर्सच कर्ज देण्याचा निर्णय जाहीर केला. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कर्जाद्वारे आर्थिक मदतीचा हा निर्णय घेतला आहे.
 • ४५ कोटी डॉलर्समध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्सचा समावेश आहे. गोताबाया राजपक्षे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये समाधानकारक चर्चा झाली. राजपक्षे भारत दौऱ्यावर आले आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा राजपक्षे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
 • श्रीलंकेतील तामिळ जनतेच्या विषयासह सुरक्षा, व्यापार आणि मच्छीमारांच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. विकासाच्या मार्गावर श्रीलंकेला पूर्ण सहकार्य करण्याचे मोदींनी आश्वासन दिले आहे. श्रीलंकेतील विविध विकास प्रकल्पांसाठी ४० कोटी डॉलर्स तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्स देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here