(चालू घडामोडी) Current Affairs | 31 December 2019

जनरल बिपिन रावत पहिले संरक्षणप्रमुख :

 • तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) जनरल बिपिन रावत यांची सोमवारी निवड करण्यात आली. तर त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे मंगळवारी सूत्रे स्वीकारतील.
 • जनरल रावत हे आज लष्करप्रमुखपदावरून निवृत्त होत असून, याच दिवशी ते संरक्षणप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
 • तसेच संरक्षणप्रमुखपदावरून सेवानिवृत्तीसाठी 65 वष्रे ही वयोमर्यादा आहे. संरक्षणप्रमुख हे संरक्षणमंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार असतील. गेल्या आठवडय़ात संरक्षणप्रमुख पदनिर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात या पदनिर्मितीची घोषणा केली होती.

शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात केरळ अव्वल :

 • निती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात 2019 मध्ये पुन्हा केरळच पहिल्या क्रमांकावर आले असून या शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ती योजनेत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची सामाजिक, आर्थिक, पर्यावरण क्षेत्रातील कामगिरी तपासली जात असते.
 • तर एसडीजी इंडिया निर्देशांक 2019 अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यात उत्तर प्रदेश, ओदिशा, सिक्कीम या राज्यांनी बरीच प्रगती केल्याचे दिसून आले.
 • तसेच गुजरातमध्ये 2018 च्या क्रमवारी तुलनेत काही प्रगती झाली नाही. केरळने पहिला क्रमांक कायम राखला असून 70 गुण प्राप्त केले. चंडीगड केंद्रशासित प्रदेशात प्रथम क्रमांकावर असून त्याला 70 गुण मिळाले.
 • हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला. बिहार, झारखंड, अरुणाचल यांची कामगिरी खराब झाली आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा अहवाल जारी करताना सांगितले की, संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 पर्यंत साध्य करताना त्यात भारताची मोठी भूमिका असणार आहे.

नौदलात बनवणार सहा अण्वस्त्र पाणबुडया :

 • पाण्याखालून हल्ला करण्याची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय नौदलाची 24 पाणबुडया बांधणीची योजना आहे.
 • तर यात सहा अण्विक पाणबुडयांचा समावेश असेल. नौदलाने संसदीय समितीला ही माहिती दिली. सागरी क्षेत्रात पाकिस्तान आणि चीनचे आव्हान वाढत चालले आहे. नौदलाच्या ताफ्यात सध्या 15 पाणबुडया आणि दोन अण्विक पाणबुडया आहेत. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस चक्र या दोन अण्विक पाणबुडया सेवेमध्ये आहेत.
 • तसेच अरिहंत स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे तर, चक्र रशियाकडून भाडयावर घेतली आहे. बहुतांश पारंपारिक पाणबुडया 25 वर्ष जुन्या आहेत.
 • 13 पारंपारिक पाणबुडया 17 ते 31 वयोगटातील आहेत. प्रोजेक्ट 75 अंतर्गत सहा नवीन पाणबु़डया बांधण्याच्या योजनेवर नौदल काम करत आहे. हिंद महासागर हे भारतीय नौदलाचे कार्यक्षेत्र असून मागच्या काही वर्षात या भागात चिनी नौदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. भारतीय नौदलाने आधुनिकीकरणावर भर दिला आहे. अनेक नव्या युद्ध नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत.

सरकारने प्रथमच ‘औषध किंमत नियंत्रण अध्यादेश-2013’ लागू केला

 • सरकारने प्रथमच ‘औषध किंमत नियंत्रण अध्यादेश-2013’ लागू केला असून, त्याद्वारे औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी किंमती नियंत्रणाच्या अंतर्गत असलेल्या 21 औषध वा औषधी-घटकांच्या किंमतीत वाढविण्यात येत आहे.
 • नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) यांच्या नियंत्रणात असलेल्या औषधांच्या सध्याच्या कमाल मर्यादेच्या किंमतींमध्ये 50 टक्के वाढ केली जाणार आहे. ही वाढ एकदाच केली जाणार.
 • या निर्णयामुळे, BCG लस, पेनिसिलिन, मलेरिया आणि कुष्ठरोगावरील औषधे (डॅप्सोन), फ्युरोसेमाइड सारखी जीवनरक्षक औषधे (हृदय, यकृत किंवा मूत्रपिंडाच्या आजारामध्ये वापरली जाणारी), ‘क’ जीवनसत्त्व, काही प्रतिजैविके आणि अँटी-अलर्जी औषधे यासारख्या औषधांच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे.

श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना ‘सी. के. नायडू जीवनगौरव’

 • भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि 1983 चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य कृष्णमाचारी श्रीकांत, भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांना बीसीसीआयकडून देण्यात येणारा यंदाचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या 12 जानेवारी 2020 रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणार असून या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
 • श्रीकांत आणि अंजुम यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

देशात सुरु होणार आता ‘5G’ पर्व; टेलिकॉम कंपन्यांना चाचण्यांसाठी सरकारची मंजुरी :

 • भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे देशातील सर्व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आता 5Gच्या चाचण्या घेणार आहेत.
 • सरकार टेलिकॉम क्षेत्रातील सर्व कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम वाटणार आहे. त्यासाठी आम्ही 5G तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याचे ठरवले आहे. यापुढे 5Gचं आता भविष्य आहे. या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणार आहोत. सर्व टेलिकॉम कंपन्या या तंत्रज्ञानाच्या चाचणीमध्ये सहभागी होऊ शकतात, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here