(चालू घडामोडी) Current Affairs | 4 December 2019

“राष्ट्रीय शीख खेळ 2020” दिल्लीत खेळवले जाणार

 • 9 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय राजधानी दिल्लीत विविध ठिकाणी “राष्ट्रीय शीख खेळ 2020” अंतर्गत विविध क्रिडास्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.
 • दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने जप जाप सेवा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेतर्फे शीख मुला-मुलींसाठी हा उपक्रम प्रथमच भारतात राबवविला जाणार आहे. अश्या स्वरूपाची स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केल्या जाणार्‍या शीख स्पर्धांवरून लक्षात घेण्यात आली आहे.
 • या स्पर्धेत देशातल्या 10 राज्यांमधून सुमारे 2500 खेळाडू भाग घेण्याचे अपेक्षित आहे आणि ते 16 हून अधिक क्रिडाप्रकारामध्ये भाग घेणार आहेत. या स्पर्धेत बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, बुद्धीबळ, मैदानी खेळ, रस्सीखेच, नेमबाजी, सायकलिंग, पॉवरलिफ्टिंग इत्यादी क्रिडा प्रकारांचा समावेश आहे.

एक देश, एक रेशन कार्ड योजनेची 1 जूनपासून अंमलबजावणी :

 • स्थलांतरित कामगार आणि रोजंदारी मजूर यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची 1 जून 2020 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.
 • तर या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे.
 • बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पासवान यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
 • तसेच या योजनेचा लाभ मुख्यत्वे स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर यांना होणार आहे, हा वर्ग रोजगारासाठी सातत्याने देशभरात फिरतीवर असतो.

‘स्वच्छता रँकिंग’मध्येसिम्बायोसिस’ला स्थान

 • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘स्वच्छता रॅकिंग’मध्ये पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने स्थान पटकावले आहे.
 • मात्र, देशात शिक्षणात १०व्या क्रमांकावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या स्पर्धेत सहभागच घेतला नसल्याची माहिती पुढे आली आहे. यासोबतच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अनिवासी विद्यापीठांच्या (यूजीसी) यादीत चौथे स्थान पटकावले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते तिसऱ्या स्वच्छता रँकिंग पुरस्कारांचे वितरण मंगळवारी नवी दिल्लीत करण्यात आले.
 • यंदाच्या स्वच्छता रँकिंगसाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) एकूण नऊ गटांमध्ये ४८ विद्यापीठे आणि कॉलेजांची निवड केली आहे. निवासी विद्यापीठांच्या प्रवर्गात पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने तिसरा, तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने नववा क्रमांक मिळवला आहे.
 • पहिल्या क्रमांकावर कोनेरू लक्ष्मी एज्युकेशन फाउंडेशनचे विद्यापीठ आहे. यासोबतच ‘एआयसीटीई’च्या अंतर्गत येणाऱ्या अनिवासी कॉलेजांमध्ये ‘पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ने तिसरे स्थान पटकावले आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरचे ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ आहे.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात भारताची 27 पदकांची लयलूट :

 • भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी अ‍ॅथलेटिक्स आणि नेमबाजी या क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवत 11 सुवर्णपदकांसह एकूण 27 पदकांची लयलूट केली आहे.
 • त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या खात्यावर 18 सुवर्ण, 16 रौप्य आणि 9 कांस्यपदकांसह एकूण 43 पदके जमा आहेत.
 • तर पहिल्या स्थानावरील यजमान नेपाळच्या खात्यावर 44 पदके (23 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्य) जमा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here