(चालू घडामोडी) Current Affairs | 4 November 2019

The Prime Minister, Shri Narendra Modi and the Chancellor of the Federal Republic of Germany, Dr. Angela Merkel witnessing the exchange of agreements between India and Germany, at Hyderabad House, in New Delhi on November 01, 2019.

‘हिटमॅन’ने केला धमाकेदार पराक्रम; धोनीला टाकले मागे :

 • भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी २० सामना दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली असूनही भारत-बांगलादेश सामना हलवण्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत उभय संघ हा सामना खेळत आहेत.
 • पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाकडून विविध खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन याच्या अनुपस्थितीत ही मालिका खेळत आहे.
 • या सामन्यात रोहित शर्माने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा विक्रम मोडला. रोहित शर्मा सामन्यासाठी मैदानात उतरला, तेव्हाच त्याने धोनीला मागे टाकले. रोहित शर्माचा हा ९९ वा टी २० सामना आहे. या आधी भारताकडून पुरुष क्रिकेट संघात धोनीने सर्वाधिक ९८ आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट सामने खेळले होते. तो विक्रम रोहितने मोडला.
 • भारताकडून सर्वाधिक टी २० क्रिकेट सामने हरमनप्रीत कौर (१००) हिने खेळले आहेत. पुढील सामन्यात रोहितला तिच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. पुरुष क्रिकेटमध्येदेखील जगात केवळ शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदी या दोघांनीच रोहितपेक्षा जास्त टी २० सामने खेळले आहेत.

निर्भया निधीतून सर्व पोलीस ठाण्यांत महिला मदत केंद्रे :

 • निर्भया निधीचा उपयोग देशातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत केंद्रे व सर्व जिल्ह्य़ांमध्ये मानवी तस्करी विरोधी विभागांच्या  स्थापनेसाठी करण्यात येईल, असे महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सांगित
 • १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत एका मुलीवर बलात्कार करून खून  करण्यात आल्याच्या देश हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर २०१३ मध्ये निर्भया निधीची स्थापना करण्यात आली होती. सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा उद्देश हा निधी स्थापन करण्यात होता.
 • इराणी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘मानवी तस्करी विरोधी विभाग हे सर्व जिल्ह्य़ात स्थापन केले जातील तसेच सर्व पोलीस ठाण्याच महिलांसाठी मदत केंद्रे सुरू करण्यात येतील. त्यासाठी संचित निधीचा वापर केला जाणार आहे. महिलांची सुरक्षा वाढवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा हेतू त्यात आहे.

जर्मनीच्या चॅन्सेलर यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार

 • जर्मनीच्या चॅन्सेलर डॉ. अँजेला मर्केल यांच्या नेतृत्वात जर्मन प्रतिनिधी मंडळ भारत भेटीवर आले होते. 1 नोव्हेंबर 2019 रोजी दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ग्रीन अर्बन मोबॅलिटीसाठी इंडो-जर्मन भागीदारीकरिता हेतू दर्शक संयुक्त घोषणापत्र (गृहनिर्माण व नागरी कल्याण मंत्रालय) वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • जर्मनी हा युरोप खंडाच्या मध्यभागी असलेला एका देश आहे. देशाची राजधानी बर्लिन हे शहर आहे आणि युरो हे राष्ट्रीय चलन आहे. येथे प्रामुख्याने जर्मन भाषा बोलली जाते.
 • आंतर-सरकारी चर्चेच्या भूमिकेची प्रशंसा करत या आगळ्या यंत्रणेमुळे नव आणि अद्ययावत तंत्रज्ञान, ई-मोबॅलिटी, फ्युएल सेल टेक्नॉलॉजी, स्मार्ट सिटीज्‌, किनारी व्यवस्थापन, नद्यांची सफाई आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी मदत झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार

 • इस्रो आणि जर्मन एरोस्पेस सेंटर यांच्यात कर्मचारी आदान-प्रदान करण्याविषयीच्या व्यवस्थेची अंमलबजावणी
 • हवाई वाहतूक क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
 • आंतरराष्ट्रीय स्मार्ट सिटी नेटवर्क सहकार्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
 • कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण सहकार्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
 • स्टार्ट अप क्षेत्रात आर्थिक सहकार्य दृढ करण्याबाबत इरादा
 • कृषी बाजार विकासाबाबत द्विपक्षीय सहकार्य प्रकल्प उभारण्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
 • व्यवसायामुळे उद्‌भवणारे रोग, पुनर्वसन या क्षेत्रात सामंजस्य करार
 • आंतरदेशीय किनारी सागरी तंत्रज्ञान सहकार्याबाबत सामंजस्य करार
 • वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन सहकार्याला प्रोत्साहन देऊन विस्तार करण्यासाठीचा सामंजस्य करार
 • आयुर्वेद,योग आणि ध्यानधारणा यामध्ये शैक्षणिक सहकार्य करण्याबाबतचा सामंजस्य करार
 • उच्च शिक्षण क्षेत्रात भारत-जर्मनी भागीदारी मुदत वाढवणारा सामंजस्य करार
 • ॲग्रीकल्चर एक्सेंटेंशन मॅनेजमेंट राष्ट्रीय संस्था आणि जर्मनीची कृषी अकादमी यांच्यामध्ये कृषी तंत्रज्ञान आणि व्यावसायिक प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार
 • सिमेन्स आणि एमएसडीई आणि आर्थिक सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी कौशल्य विकास मंत्रालय, जर्मनी यांच्यात इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
 • उच्च शिक्षण क्षेत्रात इंडो-जर्मन भागीदारीची मुदत वाढवणारा सामंजस्य करार
 • ग्रहालय क्षेत्रात सहकार्याबाबतचा सामंजस्य करार
 • अखिल भारतीय फुटबॉल संघटना आणि जर्मनीची डॉयशे फुटबॉल यांच्यात सामंजस्य करार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here