(चालू घडामोडी) Current Affairs | 5 December 2019

लोकसभेत ‘कर आकारणी (दुरुस्ती) विधेयक-2019’ याला मंजूरी

 • संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभेत ‘कर आकारणी (दुरुस्ती) विधेयक-2019’ याला मंजूरी देण्यात आली आहे. हा कायदा सप्टेंबर 2019 मध्ये राष्ट्रपतींनी लागू केलेल्या अध्यादेशाची जागा घेणार आहे.
 • विधेयकाने ‘उत्पन्न कर कायदा-1961’ आणि ‘वित्त कायदा-2019’ या दोन्हीमध्ये दुरूस्ती करण्यात येणार आहे.
 • ठळक बाबी: या विधेयकाने कॉर्पोरेट कर कमी करण्यात आला असून तो विना अनुदानाशिवाय 22 टक्के एवढा करण्यात आला आहे आणि नवीन उत्पादन संस्थांसाठी 15% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
 • वर्तमानात, वार्षिक 400 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या स्थानिक कंपन्या 25 टक्के या दराने उत्पन्न कर भरीत आहेत. तर इतर स्थानिक कंपन्यांसाठी कर दर 30 टक्के आहे. या विधेयकामुळे उत्पादन क्षेत्रात अधिक गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.
 • शिवाय, देशात गुंतवणूक वाढविण्यासाठी कॉर्पोरेट कराचे दरही 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. गेल्या 28 वर्षांमध्ये झालेली ही सर्वात मोठी कपात आहे.

पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; १००० किलोची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता

 • भारताने जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची मंगळवारी रात्री यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या बालासोर येथील प्रक्षेपण केंद्रावरुन ही चाचणी करण्यात आली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे ही चाचणी घेण्यात आली.
 • २० नोव्हेंबर रोजी पृथ्वी-२ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. काल झालेल्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली असून त्याने सर्व आवश्यक मानकं पूर्ण केली आहेत. या क्षेपणास्त्रामध्ये ५०० ते १००० किलो वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे.
 • या क्षेपणास्त्रामध्ये लिक्विड प्रोपल्शन इंजिन वापरण्यात आले आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किमीपर्यंत आहे. यामध्ये अडव्हान्स गाईडन्स सिस्टिमही बसवण्यात आली आहे. ही यंत्रणआ आपल्या लक्ष्याचा अचूनकतेने वेध घेते.

इंग्लंडचे माजी कर्णधार बॉब विलिस यांचे निधन :

 • सहा फूट, सहा इंच उंचीचे वेगवान गोलंदाज आणि इंग्लंडचे माजी कर्णधार बॉब विलिस यांचे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.
 • विलिस यांनी वयाच्या 21व्या वर्षी 1971च्या अ‍ॅशेस मालिकेत पदार्पण केले. अ‍ॅलन वॉर्डला दुखापत झाल्यामुळे विलिस यांना ही संधी चालून आली. मग ते मालिकेतील उर्वरित चारही सामने खेळले.
 • तर इंग्लंडने सात सामन्यांची ती मालिका 2-0 अशी जिंकली होती. तसेच 1971 ते 1984 या कालावधीतील 90 कसोटी सामन्यांत 325 बळी मिळवले.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा आराखडा केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

 • पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथील गैरमुस्लीम निर्वासितांचा त्या देशांमध्ये धार्मिक छळ होत असल्यास त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद असलेल्या नव्या विधेयकाच्या आराखडय़ाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे वादग्रस्त नागरिकत्व (सुधारणा) विधेयक संसदेत मांडले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • विरोधी पक्षांनी हे विधेयक फुटीरवादी आणि सांप्रदायिक असल्याचे सांगून त्याच्यावर टीका केली असली, तरी भाजपच्या वैचारिक प्रकल्पाचा तो महत्त्वाचा भाग आहे. भारतात राहणाऱ्या गैरमुस्लीम, विशेषत: हिंदू निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा त्यात प्रस्ताव असून; बेकायदा स्थलांतरितांना ओळखण्यासाठी केंद्र सरकार राबवू इच्छित असलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) मोहिमेतही त्यांना संरक्षण मिळणार आहे.

‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सुंदर पिचाई यांची नियुक्ती :

 • गुगलची मुख्य मातृकंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ‘गुगल’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • तर यापूर्वी इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुगल कंपनीचे संस्थापक लॅरी पेज व सर्जेई ब्रिन हे अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष या पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
 • तसेच पिचाई हे सध्या गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून अनेक वर्षे त्यांनी हे पद सांभाळले. आता ते अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतील.
 • तसेच पिचाई हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एका शक्तिशाली पदावर पोहोचले आहेत. ड्रोन, इंटरनेट बिमिंग बलून, जाहिराती, स्मार्टफोन सॉफ्टवेअर, नकाशे, ऑनलाइन व्हिडिओ या सर्व सेवांची सूत्रे त्यांच्या हातात असतील.
 • गुगल कंपनीसमोर सध्या मोठा आकार, माहितीची सुरक्षितता व समाजावर परिणाम या मुद्दय़ांवर अनेक आव्हाने असताना पिचाई हे सूत्रे हाती घेत आहेत. अल्फाबेट ही कंपनी आता चांगली प्रस्थापित झालेली असून ‘गुगल’ व ‘अदर बेटस’या दोन कंपन्याही चांगले काम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here