(चालू घडामोडी) Current Affairs | 5 November 2019

आंबेडकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. महेंद्र भवरे यांची निवड :

  • मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ पुरस्कृत आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने 14 वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन 23, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, संशोधक, साहित्य इतिहासकर डॉ. महेंद्र भवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
  • संमेलनाध्यक्षपदी योग्य अशा व्यक्तीची निवड करण्याच्या दृष्टीने आयोजकांनी आंबेडकरी साहित्य विश्वातील मान्यवरांकडून नामनिर्देश आणि निवडी संबंधीच्या सूचना मागविल्या होत्या. यामध्ये प्रा.भवरे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दर्शविण्यात आली.
  • आंबेडकरी साहित्य दालनाच्या आवाहनानुसार आयोजन समितीने महेंद्र भवरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी वामनदादा कर्डक, बाबुराव बागूल, डॉ. गंगाधर पानतावणे, राजा ढाले, अविनाश डोळस, यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे अशा दिग्गजांनी या संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.

‘सौदी अरामको’ची ‘आयपीओ’ची घोषणा :

  • जगातील सर्वांत मोठी तेल उत्पादक कंपनी ‘सौदी अरामको’ने शेअर बाजारांमध्ये सूचीबद्ध होण्यासाठी ‘आयपीओ’ आणत असल्याची घोषणा रविवारी उशिरा केली. हा जगातील आजवरचा सर्वांत मोठा ‘आयपीओ’ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
  • या ‘आयपीओ’च्या माध्यमातून ‘सौदी अरामको’चे सर्वेसर्वा क्राउन प्रिन्स महंमद बिन सलमान बऱ्याच काळापासून आपल्या तेलावर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल करण्याची शक्यता आजमावून पाहणार आहेत.
  • गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांती अखेर ‘अरामको’चा समभाग रियाध स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.
  • ‘आयपीओ’च्या आकाराची आणि ऑफर प्राइसची माहिती ९ नोव्हेंबरला देण्यात येणाक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘अरामको’ १.५ ट्रिलियन डॉलर ते २ ट्रिलियन डॉलरच्या (१०६ लाख कोटी रुपये ते १४१ लाख कोटी रुपये) मूल्यांकनावर १ ते २ टक्के समभाग जारी करण्याची शक्यता आहे. दोन ट्रिलियन डॉलरच्या मूल्यांकनावर २ टक्के समभाग विकले गेल्यास ‘अरामको’चा ‘आयपीओ’ ४० अब्ज डॉलरचा (२.८३ लाख कोटी रुपये) असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा जगातील आजवरचा सर्वांत मोठा ‘आयपीओ’ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वीच्या सर्वांत मोठ्या ‘आयपीओ’चा विक्रम चीनच्या ‘अलिबाबा’ या कंपनीच्या नावावर आहे. ‘अलिबाबा’ने २०१४मध्ये सादर केलेल्या ‘आयपीओ’च्या माध्यमातून २५ अब्ज डॉलरचा निधी प्राप्त केला होता.

McDonald च्या CEO ची हकालपट्टी

  • मॅकडोनाल्डने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची हकालपट्टी केली आहे. कंपनीच्या एका कर्मचाऱ्यासोबत स्टीव्ह ईस्टरब्रुक हे रिलेशनशीपमध्ये असल्याचं उघड झाल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
  • स्टीव्ह यांचं कृत्य कंपनीच्या धोरणांच्या विरोधात असल्यामुळे ही कारवाई करत असल्याचं कंपनीच्या मंडळाने सांगितलं. ५२ वर्षीय स्टीव्ह २०१५ पासून सीईओ म्हणून काम करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here