(चालू घडामोडी) Current Affairs | 6 December 2019

देशाला मिळणार पहिले केंद्रीय संस्कृत विद्यापीठ

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयकास मान्यता दिली आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकास मंजुरी देण्यात आली आहे.
 • आमच्याकडे ३ संस्कृत अभिमत विद्यापीठे आहेत, ती संस्कृत अभिमत विद्यापीठांचे एक केंद्रीय विद्यापीठ असेल. संस्कृतचे हे पहिलेच केंद्रीय विद्यापीठ असेल आणि म्हणूनच ते एक चांगले आणि महत्वाचे आहे पुढाकार आहे”.
 • महत्वाचे म्हणजे देशातील संस्कृत महाविद्यालयांमधील एकूण 709 व्याख्याते पदे रिक्त आहेत. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी स्वत: लोकसभेत ही माहिती दिली होती. रमेश पोखरियालने सांगितले होते की देशात एकूण 760 संस्कृत महाविद्यालये सुरू आहेत, त्यापैकी 468 उत्तर प्रदेशात आहेत. संस्कृत महाविद्यालयांच्या संख्येच्या बाबतीत ओडिशा 59 महाविद्यालयांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

मासात्सुगू असाकावा: आशियाई विकास बँकेचे (ADB) नवे अध्यक्ष

 • जापानचे मासात्सुगू असाकावा ह्यांची आशियाई विकास बँक (ADB) याच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. ताकेहिको नाकाओ ह्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
 • मासात्सुगू असाकावा हे आशियाई विकास बँकेचे 10 वे अध्यक्ष असणार. ते 17 जानेवारी 2020 रोजी पदभार सांभाळतील. सध्या ते जापानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करीत आहेत.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा ‘सुवर्णचौकार’:

 • दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारी चौथ्या दिवशी भारताने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात चार सुवर्णपदकांची कमाई केली.
 • तर वर्षांच्या पूर्वार्धात आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या झिल्ली दालाबेहेराने महिलांच्या 45 किलो वजनी गटात 151 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.
 • तसेच 49 किलो वजनी गटात स्नेहा सोरेनने 157 किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले. 55 किलो वजनी गटात राष्ट्रकुल अिजक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सोरोखायबाम बिंदियाराणी देवीने 181 किलो वजन उचलून अव्वल स्थान मिळवले.
 • मग पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात सिद्धांत गोगोईने 264 किलो वजन उचलत भारताच्या खात्यात चौथ्या सुवर्णपदकाची नोंद केली.

रेपो दरात कोणतीही कपात नाही, रिझर्व्ह बँकेचं आर्थिक पतधोरण जाहीर

 • व्याजदर बदलाचे अधिकार असलेल्या पतधोरण आढावा समितीच्या मंगळवारपासून सुरू असलेल्या तीन दिवसांच्या बैठकीअंती गुरुवारी रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला.
 • त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवर कायम राहिला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास हे रेपो दरात आणखी पाव टक्क्यांची कपात जाहीर करतील, अशी सार्वत्रिक अपेक्षा होती.
 • मात्र ही अपेक्षा फोल ठरली. सलग पाच वेळा रेपो दरात कपात केल्यानंतर त्याला डिसेंबरमध्ये ब्रेक लागला आहे. त्यामुळे रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्क्यांवर कायम राहिला आहे.
 • आर्थिक वर्षांतील पाचवे द्विमासिक पतधोरण रिझव्‍‌र्ह बँक गुरुवारी जाहीर केले. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत पाच टक्क्यांच्याही खाली घरंगळलेला विकास दर आणि वाढलेल्या महागाई दराच्या पूर्वपीठिका पाहून रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर कपातीचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती.

अाराेग्य क्षेत्रातील सेवेबद्दल ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारा’ने दिल्लीत सन्मान

 • महाराष्ट्रातील दाेन परिचारिकांना गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरवण्यात आले. चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील छाया पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक आशा गजरे यांचा त्यात समावेश अाहे.
 • केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार- २०१९ चे वितरण करण्यात आले. देशभरातील ३५ परिचारिकांचा यावेळी गाैरव झाला.
 • १) चंद्रपूरच्या छाया पाटील २९ वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये त्यांनी १७ वर्षे सेवा दिली, तर १० वर्षे त्या शहरी भागातील आरोग्यसेवेत कार्यरत होत्या. जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलप्रभावित भागांमध्ये पायी तर कधी सायकलवर प्रवास करून त्यांनी लसीकरण माेहीम राबवली. कुटुंब नियोजन कार्यक्रम, मलेरिया लसीकरण, रुग्णालयांत प्रसूतीसाठी प्रोत्साहनाचे उल्लेखनीय काम त्यांनी केले. २०१५-१६ लसीकरण अभियानात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
 • २) लासूर (ता. चोपडा) प्राथमिक केंद्रातील आरोग्य सहायक आशा गजरे या ३३ वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी २८ वर्षे शहरी भागात तर ५ वर्षे आदिवासी भागात आरोग्यसेवा दिली. कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम, क्षयरोग, मनोविकार, संसर्गजन्य रोग, लसीकरण आदी माेहिमांत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. लासूर आरोग्य केंद्रात त्यांनी ‘एमएमआर’ (गालगुंड, गोवर, रुबेला लसीकरण कार्यक्रमाद्वारे) शून्य टक्क्यांवर आणला तर नवजात बालकांच्या मृत्युदरावरही नियंत्रण आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here