(चालू घडामोडी) Current Affairs | 6 January 2020

बेन स्टोक्सचा क्षेत्ररक्षणात विक्रम

 • एका डावात सर्वाधिक वेळा पाच झेल टिपणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
 • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याने ऑनरिख नॉर्कीएचा झेल टिपला. दुसऱ्या स्लिपमध्ये स्टोक्सने हे पाचही झेल टिपले.
 • तर इंग्लंडच्या 1019 सामन्यांमध्ये एका डावात चार झेल टिपण्याची किमया 23 वेळा घडली आहे.
 • जागतिक कसोटी सामन्यांमध्ये पाच झेल पकडणारा स्टोक्स हा 11वा खेळाडू आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने एका डावात पाच झेल टिपले होते.

ओडिशातल्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांची गणना

 • ओडिशा राज्यातल्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातल्या जलकुंभात खार्‍या पाण्यातल्या इस्टुराइन मगरींची गणना पूर्ण करण्यात आली आहे. अहवालानुसार, त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
 • ठळक बाबी: भितरकनिका राष्ट्रीय उद्यान केंद्रपाडा जिल्ह्यात आहे.
 • गणनेत 1,757 मगरी मोजल्या गेल्या आहेत.
 • गेल्या वर्षी या भागात 1,742 मगरी मोजल्या गेल्या होत्या.

बिहारच्या भागलपूर वनविभागात कासवांसाठी एक पुनर्वसन केंद्र उभारणार

 • ताज्या पाण्यातल्या कासवांसाठी नव्या प्रकारचे पहिलेच असे एका पुनर्वसन केंद्राची उभारणी बिहार राज्याच्या भागलपूर वनविभागात केली जात आहे.
 • हे पुनर्वसन केंद्र अर्धा हेक्टरवर पसरलेले आहे आणि ते एकावेळी 500 कासवांना आश्रय देण्यास सक्षम असणार आहे.
 • बचाव पथकांनी तस्करांकडून वाचवले असता अनेक कासव गंभीर जखमी आणि आजारी असल्याचे आढळल्यानंतर असे केंद्र उभारण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.

निवडणूक आयोगाची नवी यंत्रणा: “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)”

 • अर्जदारांना अर्जांची स्थिती जाणून घेता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)” नावाची नवी यंत्रणा कार्यरत केली आहे.
 • 1 जानेवारी 2020 पासून याबाबतचे नवीन नियम लागू झाले. त्याच्या अंतर्गत, 1 जानेवारीपासून राजकीय निवडणूक पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करणारे अर्जदार विनंतीची प्रगती मागू शकतात आणि SMS व ई-मेलद्वारे स्थिती प्राप्त करू शकण्यास सक्षम झाले आहेत.
 • नोंदणी करणार्या संघटनेच्या स्थापनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अर्ज सादर करावा लागणार.
 • https://pprtms.eci.gov.in या संकेतस्थळावर अर्जाची स्थिती जाणून घेता येणार आहे.
 • राज्यघटनेतले कलम 324 आणि ‘लोकप्रतिनिधी कायदा-1951’ याच्या कलम 29 (अ) अन्वये राजकीय पक्षांची नोंदणी प्रकिया नियंत्रित केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here