(चालू घडामोडी) Current Affairs | 6 November 2019

नेमबाजपटू दिपक कुमार टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र :

  • दोहा शहरात सुरु असलेल्या १४ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दिपक कुमारने कांस्यपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीसह दिपकने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दिपक दहावा भारतीय नेमबाजपटू ठरला आहे.
  • पात्रता फेरीत २२७.८ गुणांची कमाई करत दिपकने अंतिम ८ जणांमध्ये प्रवेश मिळवला. यानंतर पदकांच्या शर्यतीत ६२६.८ गुणांची कमाई करत दिपकने कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. २०१८ साली झालेल्या नेमबाजी विश्वचषकात दिपकने कांस्यपदकाची कमाई केली होती.

पॅरिस करारातून अमेरिकेची माघार :

  • पॅरिस हवामान करारातून अमेरिका माघार घेत असल्याची अधिकृत सूचना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांना दिली आहे. या करारातून माघार घेत असल्याचे त्यांनी पूर्वीच जाहीर केले असले तरी त्यावर अखेर सोमवारी  शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • या करारातून माघार घेण्याची घोषणा ट्रम्प यांनी जून 2017 मध्येत केली होती पण त्याची प्रक्रिया सोमवारी संयुक्त राष्ट्रांना अधिकृत सूचना देऊ न सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अमेरिका नोव्हेंबर 2020 मध्ये या करारातून मुक्त होणार आहे.
  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी सांगितले की, अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू केली आहे. या करारातील अटीनुसार अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना या करारातून बाहेर पडत असल्याची सूचना पाठवली आहे. त्यानंतर एक वर्षांने अमेरिका या करारातून संपूर्णपणे बाहेर पडे
  • न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांना करारातून माघार घेत असल्याबाबत पहिली सूचना ४ नोव्हेंबर २०१९ रोजी दिली होती. पॅरिस करार १२ डिसेंबर २०१५ रोजी झाला होता. त्यावर अमेरिकेने २२ एप्रिल २०१६ रोजी स्वाक्षरी केली होती व ३ सप्टेंबर २०१६ रोजी कराराचे पालन करण्यास अनुमति दिली होती. करारातून माघार घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर डेमोक्रॅटिक पक्षाने टीका केली आहे. फ्रोन्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रान यांनी यांनी सांगितले की, अमेरिकेचा हा निर्णय दुर्दैवी आहे.

‘आरसेप’बाबत भारताचे प्रश्न सोडविण्यास चीन इच्छुक :

  • भारताने काही प्रश्न उपस्थित करीत ‘आरसेप’मधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्यानंतर चीनने यावर परस्पर समझोत्यावर आधारित तोडगा काढण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत.
  • आरसेप खुले आहे, परस्पर समझोत्याचे तत्त्व पाळण्यास आम्ही तयार आहोत आणि भारताने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यास तयार आहोत, भारत आरसेपमध्ये सहभागी झाल्यास स्वागतच आहे, असे चीनने म्हटले आहे.
  • दरम्यान, अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेत असल्याचे संयुक्त राष्ट्रांना अधिसूचित केल्याबाबत चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, अमेरिका हवामानाच्या मुद्दय़ावर जास्त जबाबदारी घेऊन काम करील अशी आशा आहे. हवामान बदल हे मोठे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here