(चालू घडामोडी) Current Affairs | 7 December 2019

साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान :

 • यंदा 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे 10 ते 12 जानेवारी दरम्यान होत आहे.तर दर वर्षी संमेलनामध्ये एक प्रकाशक आणि एका साहित्यिकाचा विशेष सन्मान केला जातो. साहित्य संमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान केला जाणार आहे.
 • तसेच शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांना संमेलनात गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचाही सन्मान होणार आहे.साहित्य संमेलनात महिला साहित्यिकांना अध्यक्षपद भुषवण्याची संधी खूप कमी वेळा मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून एक साहित्यिक आणि एक प्रकाशक यांचा संमेलनात विशेष सन्मान केला जातो.

भारत 2022 साली इंटरपोल महासभेचे आयोजन करणार

 • सन 2022 मध्ये ‘इंटरपोल’ या संस्थेच्या 91व्या महासभेचा आयोजक म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
 • भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक ऋषी कुमार शुक्ला यांनी भारताकडून याबाबत प्रस्ताव मांडला होता आणि प्रचंड बहुमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
 • आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL) ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग संघटना आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्सच्या ल्योन या शहरात असून इतर 187 कार्यालये जगभरात आहेत.
 • इंटरपोल ही 194 सदस्य-देश असलेली आंतरराष्ट्रीय संस्था असून पोलीस क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याचा संस्थेला 100 वर्षांचा अनुभव आहे.
 • ही संघटना प्रामुख्याने सुरक्षा, दहशतवाद, संगठीत गुन्हेगारी, मानवता-विरोधी गुन्हे, पर्यावरण-विषयक गुन्हे, युद्ध-विषयक गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानव तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, संगणक-विषयक गुन्हे यावर काम करते.

अझीम प्रेमजी ठरले आशियातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती

 • विप्रो कंपनीचे एके काळचे प्रमुख अझीम प्रेमजी हे आशियातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले. फोर्ब्ज मासिकाने आशियातील 30 दानशूर व्यक्तींची यादी प्रकाशित केली असून, त्यात प्रथमच स्थानावर अझीझ प्रेमजी आहेत.
 • तर या 30 दानशूरांच्या यादीत भारतातील किरण मजुमदार-शॉ, त्यांचे पती जॉन शॉ व हेक्सावेअर टेक्नॉलॉजीचे संस्थापक व चेअरमन अतुल निशार यांचीही नावे आहेत.
 • तसेच अझीम प्रेमजी सुमारे 50 वर्षे विप्रोचे कार्यकारी संचालक होते. ते जुलैमध्ये निवृत्त झाले. नंतर त्यांनी आपण दानधर्म व समाजसेवा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी अझीम प्रेमजी फाऊडेशनला 760 कोटींचे समभाग देणगीपोटी दिले आहेत.
 • ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करीत आहे. त्यांनी 21 अब्ज डॉलर्सची संपत्ती देणगीच्या स्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे.
 • बायकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण मजुमदार शॉ व त्यांचे पती जॉन शॉ यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोला 53 कोटी 45 हजार लाखांची देणगी दिली. त्यांनी अन्य संस्थांना दिलेल्या देणग्यांची रक्कम ४0 कोटी रुपयांहून अधिक आहे.

RBI पतधोरणात समितीने रेपो दर 5.15 टक्क्यांवर कायम ठेवला

 • दिनांक 5 डिसेंबर 2019 रोजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय रिझर्व्ह बँकेनी द्विमाही पतधोरणात समितीच्या पाचव्या बैठकीत रेपो दर स्थिर म्हणजेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर 5.15 टक्क्यांवर कायम राहणार आहे.
 • भारतीय रिझर्व्ह बँकेकडून गेल्या बैठकीत 0.35 टक्क्याची म्हणजेच 35 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली होती.
 • बैठकीत स्पष्ट झालेल्या बाबी: रिव्हर्स रेपो दर 4.90 टक्के आणि बँक दर 5.40 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे.
 • चालू आर्थिक वर्षासाठी विकास दराच्या अंदाजातही रिझर्व्ह बँकेने बदल केला आहे. आधी विकासदर 6.1 टक्के इतका राहणार, असा अंदाज होता. परंतू, सुधारित अंदाजानुसार तो 5 टक्के इतकाच राहणार आहे. आतापर्यंत RBIने गेल्या आठ महिन्यांमध्ये पाच वेळा दरात कपात केलेली होती.
 • लक्ष्यित महागाईचा दर 4 टक्के आहे.
 • किरकोळ महागाईचा अंदाज वाढवीत तो आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीसाठी 5.1-4.7 टक्के आणि 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी 4.0-3.8 टक्क्यांपर्यंत केला आहे.
 • देशांतर्गत व बाह्य मागणी कमकुवत असल्या कारणाने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी GDP वृद्धीदराचा अंदाज ऑक्टोबरच्या धोरणातल्या 6.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला.
 • मुख्यत्वेकरून कमी उत्पादनामुळे, भारताची आर्थिक वृद्धी चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत गेल्या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरलेली असून ती त्याचा दर 4.5 टक्के आहे.
 • परकीय चलन साठा 3 डिसेंबरपर्यंत 451.7 अब्ज डॉलर एवढ्या उच्चांकी पातळीवर पोहचलेला होता.
 • आर्थिक क्रियाकलाप आणखी कमकुवत झाले आहेत आणि उत्पन्नामधील तफावत नकारात्मक असणार. तथापि, सरकारने आधीच उपाययोजना केलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here