(चालू घडामोडी) Current Affairs | 7 January 2020

वैभव जाधव ‘कनिष्ठ मुंबई-श्री’चा मानकरी :

 • शुभम धुरी आणि खुशाल सिंग यांचे कडवे आव्हान पार करत आपल्या पीळदार शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करणाऱ्या हेल्थ रूटीन फिटनेसच्या वैभव जाधव याने ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरले.
 • तर ‘दिव्यांगांच्या मुंबई-श्री’ स्पर्धेत परब फिटनेसच्या सुदिश शेट्टीने बाजी मारली तर फॉच्र्युन फिटनेसच्या अभिषेक पाडगावकरने ‘नवोदित मुंबई-श्री’चा मान पटकावला.
 • तसेच मालाड पूर्वेला झालेल्या या स्पर्धेत चार विविध प्रकारांमध्ये झालेल्या 200 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ किताबासाठी सहा गटविजेत्यांमध्ये कडवी लढत रंगली होती. अखेर पंचांनी वैभव, शुभम आणि खुशाल यांच्या शरीरसौष्ठवाची तुलना केली. काही मिनिटांच्या चर्चेनंतर त्यांनी वैभव जाधवला किताब विजेता घोषित केले.
 • तर दोन गटांत झालेल्या ‘दिव्यांग-श्री’ स्पर्धेत 16 स्पर्धकांनी कमावलेली शरीरसंपदा पाहून प्रेक्षकही थक्क झाले. 50 आणि 55 किलो वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत सुदिश शेट्टीने यश संपादन केले. 50 किलो गटात माँसाहेब जिमचा प्रथमेश भोसले पहिला आला.

कर्नाटकच्या NIT येथे ISROचे चौथे शैक्षणिक केंद्र

 • अंतराळ क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी एक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक  राज्यातल्या सुरथकल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) याच्या परिसरात एक प्रादेशिक शैक्षणिक केंद्र उघडणार आहे. त्यासंदर्भात 3 जानेवारीला दोन्ही संस्थांमध्ये एक सामंजस्य करार झाला.
 • NIT-सुरथकल इथले केंद्र हे ISROचे चौथे प्रादेशिक शैक्षणिक केंद्र असणार. इतर केंद्रे मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जयपूर), गुवाहाटी विद्यापीठ आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ येथे आहेत.
 • केंद्राविषयी: या ठिकाणी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनुप्रयोगांमधील संशोधन आणि विकास कार्ये NIT सह संयुक्तपणे केले जाणार आहे.
 • ISRO या केंद्राच्या कामकाजासाठी व प्रशासकीय खर्चासाठी वर्षाकाठी 2 कोटी रुपयांचे वार्षिक अनुदान देणार आहे.
 • कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश असलेल्या दक्षिणेकडील प्रदेशात अंतराळ तंत्रज्ञानाच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र मदतनीस म्हणून काम करणार.
 • भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या भविष्यातल्या गरजांसंबंधित क्षेत्रांमध्ये प्रगत संशोधन हे केंद्र करणार आहे.
 • क्षमता बांधणी, जनजागृती आणि ISROच्या संशोधन व विकास कामांसाठी हे केंद्र एक दूत म्हणून काम करणार आहे.
 • या केंद्रामध्ये NITचे प्राध्यापक आणि संशोधक तसेच भेट देणारे वैज्ञानिक आणि ISROचे तज्ज्ञ असणार. एक संयुक्त धोरण व व्यवस्थापन समिती या केंद्राच्या अंतर्गत चालणार्‍या उपक्रमांचे मार्गदर्शन करणार.
 • या केंद्राच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पाच्या कालावधी दरम्यान संशोधन पाठ्यवृत्ती (फेलोशिप) देखील दिली जाणार.

‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’: भारत सरकारतर्फे दिला जाणारा नवा पुरस्कार

 • केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते 7 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्लीत 30 संस्थांना प्रथमच ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’ या पुरस्कारांचे वाटप केले जाणार आहे.
 • पुरस्काराविषयी: देश-परदेशात योगच्या प्रचार-प्रसारामध्ये भरीव कामगिरी केलेल्या माध्यमांच्या सकारात्मक व जबाबदारीपूर्ण भूमिकेची नोंद म्हणून भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’ याची जून 2019 मध्ये स्थापना केली.
 • पदक, पट्टिका, चषक व प्रशस्तिपत्रक असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
 • मंत्रालयाला प्राप्त झालेल्या प्रवेशिकांचे परीक्षण सहा सदस्यांच्या परीक्षक मंडळाकडून केले जाणार, ज्याचे प्रतिनिधित्व ‘भारतीय पत्र परिषद (PCI)’ याचे अध्यक्ष (वर्तमानात सी. के. प्रसाद) करणार.
 • दरवर्षी 30 सन्मान दिले जाणार आहेत. सदर सन्मान खालील वर्गात दिले जाणार आहेत:
 • ‘योगला बातमीदारीत सर्वोत्कृष्ठ स्थान देणारे वर्तमानपत्र’ – 11 सन्मान
 • ‘योगला बातमीदारीत सर्वोत्कृष्ठ स्थान देणारी वृत्तवाहिनी’ – 8 सन्मान
 • ‘योगला बातमीदारीत सर्वोत्कृष्ठ स्थान देणारी रेडिओ वाहिनी’ – 11 सन्मान

ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’

 • राज्याला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील पहिली संस्था सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या रूपात मुंबईत स्थापन झाली.
 • राज्यातील कलाकारांनी कला क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त केला आहे. त्यानुसार, दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाºया ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
 • राज्यात दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणाºया ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ दरवर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असणार आहे.
 • तर हा पुरस्कार दृश्यकलेच्या एका ज्येष्ठ व नामवंत कलाकार यांना दरवर्षी, क्रमनिहाय प्रदान करण्यात येईल. त्यात अनुक्रमे रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला आणि कला व शिल्प (अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम, धातूकाम) या विभागांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here