(चालू घडामोडी) Current Affairs | 8 December 2019

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कारांचे वितरण

 • भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 5 डिसेंबर 2019 रोजी एका समारंभात ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार देऊन 36 जणांचा सन्मान करण्यात आला.
 • त्यामध्ये, केरळच्या कोझिकोड येथल्या दिवंगत लिनी साजीश ह्यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे. कर्तव्य बजावत असताना त्यांना निपाह रोगाची लागण होऊन त्या मरण पावल्या.

खासगी लघू वित्त बँकांसाठी कधीही परवाना मिळावा त्यासाठी RBIची नवी मार्गदर्शके

 • भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘खासगी क्षेत्रातल्या लघू वित्त बँकांचा (SFB) परवाना’ याच्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
 • नवीन मार्गदर्शके पुढीलप्रमाणे आहेत,: सर्व पात्रता निकष पूर्ण केल्यास पेमेंट्स (देयक) बँकांना पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर लघू वित्त बँकेमध्ये रूपांतरीत होण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
 • किमान पेड-अप व्होटिंग इक्विटी कॅपिटल म्हणजेच आवश्यक असलेले भांडवल 200 कोटी रुपये असावे.
 • परवाना मिळविण्यासाठी RBI कडील सुविधा मुक्तपणे उघडली जाणार आहे. मुक्तपणाच्या सुविधेमुळे RBI वर्षभर बँकांचे अर्ज स्वीकारू शकणार आणि परवाना देणार आहे.
 • याव्यतिरिक्त, विशिष्ट अटी पूर्ण केल्यास इच्छुकांना कोणत्याही वेळी सार्वत्रिक बँकेसाठी परवाना मिळविण्यासाठी अर्ज करण्याची मुभा आहे.

मुंबई सेंट्रल ठरले देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक :

 • मुंबई सेंट्रल हे देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक ठरले आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, पौष्टिक आहाराची उपलब्धता, अन्नपदार्थ तयार करताना योग्य हाताळणी, कचरा व्यवस्थापन अशा विविध पातळ्यांवर देशातील पहिले ‘इट राइट’ (खाण्यासाठी योग्य) स्थानकाचा मान मुंबई सेंट्रलला मिळाला आहे.
 • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) द्वारे मुंबई सेंट्रलला ‘इट राइट स्थानक’ म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. त्याला 4 स्टारचे रेटिंग मिळाले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
 • भारतीय रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आहार उपलब्ध करून देण्यासाठी एफएसएसएआयने ‘इट राइट स्थानक’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ‘इट हेल्दी’ आणि ‘इट सेफ’ अशा दोन टप्प्यांत स्थानकाचे आॅडिट करण्यात येते. या अभियानात मुंबई सेंट्रल हे एकमेव स्थानक सहभागी झाले होते.
 • देशातील अन्य कुठलेही स्थानक अद्याप या अभियानात सहभागी झालेले नाही. स्थानकावरील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, पौष्टिक आहाराची उपलब्धता, अन्नपदार्थ तयार करताना योग्य हाताळणी, कचरा व्यवस्थापन आदींचे आॅडिट करून स्थानकाला देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक म्हणून घोषित करण्यात आले.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचे पदकांचे द्विशतक :

 • भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी पदकांच्या सुवर्णशतकासह द्विशतकाचा टप्पा ओलांडण्याची किमया साधली. जलतरण आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमधील वर्चस्वाच्या बळावर शनिवारी भारताने 29 सुवर्णपदकांसह 49 पदकांची कमाई केली.
 • तर भारताच्या खात्यावर आता 214 पदके (110 सुवर्ण, 69 रौप्य, 35 कांस्य) जमा आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या यजमान नेपाळने एकूण 142 पदके जिंकली आहेत.
 • कुस्तीपटूंनी ‘सॅफ’ अभियानाला शानदार प्रारंभ करताना चार सुवर्णपदकांची कमाई केली. सत्यवर्त कडियान, सुमित मलिक, गुरशरणप्रीत कौर आणि सरिता मोर यांनी सोनेरी यश मिळवले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या सत्यवर्तने पाकिस्तानच्या ताबियार खानचा पराभव केला.
 • भारतीय नेमबाजांनी वर्चस्वाची यशोमालिका कायम राखताना तीन सुवर्णपदके प्राप्त केली. पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अनिश भानवालाने सुवर्णपदक पटकावले. मग त्याने भाबेश शेखावत आणि आदर्श सिंगच्या साथीने पुरुषांचे सांघिक विजेतेपद पटकावले. 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात मेहुली घोष आणि यश वर्धन यांनी सुवर्णपदक मिळवले.

‘पॉक्सो’ गुन्हेगारांचा दयेच्या अर्जाचा अधिकार काढून घ्यावा: राष्ट्रपती

 • महिलांवरच्या राक्षसी हल्ल्यांमुळे देशाच्या विवेकालाच हादरा बसला आहे त्यामुळे ज्यांना पॉक्सो कायद्याखाली दोषी ठरवण्यात आले आहे त्यांचा दयेच्या अर्जाचा (याचिकेचा) अधिकार काढून घेतला पाहिजे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. देशातील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी जळजळीत भाष्य करताना ठोस संदेश दिला.
 • अशा आरोपींचा दयेच्या अर्जाचा अधिकार नाकारायचा की नाही याचा निर्णय संसदेने घ्यायचा आहे, त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. पण आमचा सर्वाचा विचार आता त्या दिशेने आहे, असे त्यांनी माउंट अबू येथे महिला सुरक्षेवर आयोजित कार्यक्रमात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here